अकल्पित.

(10)
  • 28k
  • 2
  • 12.6k

रविवार ची सकाळ होती, सगळं कसं आरामात चाललेलं होतं. सचिन आणि रामभाऊ म्हणजे सचिन चे बाबा, पेपर वाचत होते. दोन्ही मुलं सायली वय वर्षे १० आणि शेखर वय वर्षे ६ आणि साधना बाई म्हणजे सचिन ची आई, ही मंडळी कार्टून नेटवर्क बघत होती. सचिन ची बायको, वर्षा स्वयंपाकघरात रविवारचा नाश्ता बनवत होती. बाहेर सोसायटी च्या छोट्या मैदानात पोरं क्रिकेट खेळत होती. अशातच एक काही तरी जड वस्तु पडल्याचा धडाम असा आवाज आला. सचिन ने मान वर करून इकडे तिकडे पाहिलं. रामभाऊ नव्हते पण त्यात काही विशेष नाही असं समजून त्याने पुन्हा पेपर मध्ये डोक घातलं. आणि शेजारच्या सुतारकाकांची हाक आली. “सचिन खाली ये रामभाऊ गच्चीतून पडले. धाव रे” सचिनला क्षणभर काहीच कळेना पण तो लागलीच खाली धावला. चार चार पायऱ्या उतरून खाली पोचला. रामभाऊ खाली पडले होते आणि भोवती मुलांचा घोळका जमला होता. कोणीतरी त्यांना पाठीवर झोपवून पाणी मारत होतं. रामभाऊ बेशुद्ध होते आणि पाणी मारण्याचा काही उपयोग होत नव्हता. अरे अॅम्ब्युलेन्स बोलवा, कोणीतरी ओरडलं. सचिन जवळ मोबाइल नव्हता, त्यानी सभोवार नजर फिरवली, दीक्षितांच्याकडे मोबाइल होता. त्यांच्या पण लक्षात आलं त्यांनी झटकन फोन लावला. “दहा मिनिटांत येतेय” ते बोलले.

Full Novel

1

अकल्पित - भाग १

अकल्पित भाग १ रविवार ची सकाळ होती, सगळं कसं आरामात चाललेलं होतं. सचिन आणि रामभाऊ म्हणजे सचिन चे बाबा, वाचत होते. दोन्ही मुलं सायली वय वर्षे १० आणि शेखर वय वर्षे ६ आणि साधना बाई म्हणजे सचिन ची आई, ही मंडळी कार्टून नेटवर्क बघत होती. सचिन ची बायको, वर्षा स्वयंपाकघरात रविवारचा नाश्ता बनवत होती. बाहेर सोसायटी च्या छोट्या मैदानात पोरं क्रिकेट खेळत होती. अशातच एक काही तरी जड वस्तु पडल्याचा धडाम असा आवाज आला. सचिन ने मान वर करून इकडे तिकडे पाहिलं. रामभाऊ नव्हते पण त्यात काही विशेष नाही असं समजून त्याने पुन्हा पेपर मध्ये डोक घातलं. आणि शेजारच्या ...Read More

2

अकल्पित - भाग २

अकल्पित भाग २ भाग १ वरुन पुढे वाचा ........ सचिन वैतागला त्याला कळेना, की बाबा असे का वागताहेत, “बाबा अहो तुम्ही काय बोलता आहात ते तुम्हाला तरी कळलय का ?” “नाही, मलाही कळत नाहीये, पण थांब, माझ्या डोक्यात काहीतरी घडतंय. जरा थांब.” रामभाऊ म्हणाले. हॉल मध्ये विचित्र शांतता पसरली, नर्मदा रडायचं थांबली. सगळेच रामभाऊंकडे पाहू लागले. पांच मिनिटांनी रामभाऊ त्रिलोकच्या मुलीकडे बघून म्हणाले “वैशाली बेटा मला एक कागद, आणि पेन देशील” वैशालीने कागद आणि पेन आणून दिला. रामभाऊंनी त्यावर एक मोठा गोल आणि त्यांच्या आत एक छोटा गोल काढला. छोट्या गोलात त्यांनी लातूर अस लिहिलं. मोठ्या गोलात ...Read More

3

अकल्पित - भाग ३

अकल्पित भाग ३ भाग २ वरुन पुढे वाचा ........ “हॅलो साहेब मी PSI धनशेखर बोलतो आहे. एक मुलगा मेहता, तीन दिवसांपूर्वी हरवला आहे, तुम्हाला अपडेट दिलं होतं काल, त्यांचे where abouts मिळाले आहेत. सूरत च्या आसपास त्यांची लोकेशन मिळाली आहे. सूरत च्या पोलिसांना कळवून त्यांची मदत घ्यावी लागणार आहे साहेब.” “खबर पक्की आहे?” – साहेब. “हो साहेब.” – धनशेखर. “मग तातडीने हालचाल करा. सूरत पोलिसांशी बोला आणि तुम्ही पण लगेच सूरतला निघा.” – साहेब. “होय साहेब. आज रात्रीच निघतो.” – धनशेखर. “ओके. मला अपडेट देत रहा.” – साहेब. “ओके साहेब.” – धनशेखर म्हणाले, आणि ...Read More