चौपाडी - एक भूक!

(2)
  • 39.1k
  • 0
  • 20.4k

चौपाडी - एक भूक!" ही माझी नवीन कथा. सदर कथा ही "लघुकथा संग्रह" या स्पर्धेकरिता लिहिण्यात येणार आहे. थोडक्यात कथेचा विषय हा एका अशा सामाजिक समस्येला मांडतो; ज्याविषयी कुठेच वाच्यता केली जात नाही! लोकांच्या स्थलांतरा सोबतंच अनिष्ट रूढी-परंपरा यांचे देखील स्थलांतर होऊन अमानुष कृत्य घडण्यास कसा वाव मिळतो; हे या कथेतून मांडण्याचा प्रयत्न असेल. सदर कथेला भरभरून प्रतिसाद मिळावा हीच एक इच्छा! कथेत काही शब्द नेपाळी भाषेत लिहिण्यात आले आहेत. ज्याची पूर्वकल्पना देणे येथे गरजेचे ठरते. ते शब्द खालीलप्रमाणे - आमा - आई हजुरआमा - आजी बुबा - वडील/बाबा सदर कथेतील पात्रांची नावे नेपाळी आहेत. कथा लिहिताना पुरेसे संशोधन करणे गरजेचे होतेच आणि ते अपेक्षेप्रमाणे केले गेले आहेतंच!

Full Novel

1

चौपाडी - एक भूक! - ०१

परिचय :"चौपाडी - एक भूक!" ही माझी नवीन कथा. सदर कथा ही "लघुकथा संग्रह" या स्पर्धेकरिता लिहिण्यात येणार आहे. कथेचा विषय हा एका अशा सामाजिक समस्येला मांडतो; ज्याविषयी कुठेच वाच्यता केली जात नाही! लोकांच्या स्थलांतरा सोबतंच अनिष्ट रूढी-परंपरा यांचे देखील स्थलांतर होऊन अमानुष कृत्य घडण्यास कसा वाव मिळतो; हे या कथेतून मांडण्याचा प्रयत्न असेल.सदर कथेला भरभरून प्रतिसाद मिळावा हीच एक इच्छा! कथेत काही शब्द नेपाळी भाषेत लिहिण्यात आले आहेत. ज्याची पूर्वकल्पना देणे येथे गरजेचे ठरते. ते शब्द खालीलप्रमाणे -आमा - आईहजुरआमा - आजीबुबा - वडील/बाबासदर कथेतील पात्रांची नावे नेपाळी आहेत. कथा लिहिताना पुरेसे संशोधन करणे गरजेचे होतेच आणि ते ...Read More

2

चौपाडी - एक भूक! - ०२

आतापर्यंत आपण बघीतले,नेपाळी कुटुंबाच्या स्थलांतराने केवळ त्यांच्या कुटुंबियांचेच स्थलांतर झाले नव्हते. तर, सोबतंच त्यांच्या अनिष्ट रूढी-परंपरा यांचे देखील स्थलांतर आले. त्यातीलंच एक म्हणजे, "चौपाडी प्रथा!" आता पुढे!भावरूपा जिवाच्या आकांताने ओरडत दित्याला चौपाडीवर पाठवण्याचा विरोध करू लागली!दित्या आणि भावरूपाची आई दोघींना काहीच सुचेना!"आमा, काय झाले? रडू नकोस ना तू." दित्या रडकुंडीला आली."कसं सांगू दित्या तुला, गाम्म्यासोबत जे काही घडले, त्याचा अनुभव मला चौपाडी वर असताना आला आहे!!" भावरूपा आता हुंदके देत ओक्साबोक्सी रडू लागली."काय?????" दित्या आणि हजुरआमा आश्चर्यचकित होऊन भावरूपाकडे बघू लागल्या."हो आमा, म्हणूनच मी दित्याला चौपाडी जायला नको म्हणत होते!" भावरूपाने रडतंच सांगीतले."पण, हे कधी घडले? आणि कोणी केले? ...Read More

3

चौपाडी - एक भूक! - ०३

आतापर्यंत आपण बघीतले,चौपाडी प्रथेमुळे भावरुपाने सहन केलेल्या शारीरिक यातना तिने दित्या आणि हजुरआमा समोर जिवाच्या आकांताने मांडल्या होत्या. त्या दित्याने उद्गमची विल्हेवाट लावायची युक्ती सुचवली होती! आता पुढे!सायंकाळी ०६:०० च्या सुमारास!"दित्या बाळा चल, चौपाडी जायचं आहे." शेजार पाजारच्यांना आवाज जाईल इतक्या मोठ्याने भावरूपा ओरडून म्हणाली."हो आमा." दित्या बाहेर पडली आणि भावरूपाच्या हातात हात घालून चौपाडीच्या दिशेने निघाली.तांड्यात गर्दी जमली आणि समूहात कुजबुज सुरू झाली. त्या समूहात एका व्यक्तीची त्या दोघींवर नजर होतीच!दित्याला चौपाडीवर सोडून देत भावरूपा घरी परतली.रात्री ११:०० वाजता!काळ्या रंगाची शाल फक्त डोळे उघडे राहतील अशी अंगाला गुंडाळून एक व्यक्ती चौपाडीच्या दिशेने निघाला. चौपाडीपासून काहीच अंतरावर उभं राहून ...Read More

4

चौपाडी - एक भूक! - ०४

आतापर्यंत आपण बघीतले,चौपाडीवर सहन कराव्या लागणाऱ्या शारीरिक यातना, बत्सलच्या खूनाचा बदला आणि दित्याविषयी असलेली काळजी म्हणून भावरूपाने उद्गमला संपवून मानसिकतेला संपवले होते. आता पुढे!उद्गमला दोन्ही बाजूंनी पकडत त्याचे भारी शरीर कसेबसे दोघींनी उचलून धरले. काहीच पावलांच्या अंतरावर भावरूपाच्या डोळ्यांवर एक प्रकाश पडला आणि तिचे डोळे बंद झाले. डोळ्यांवर हात ठेवत समोर बघायचा प्रयत्न करणार तोच परत एक प्रकाश डोळ्यांवर पडला. दित्याचे लक्ष त्या दिशेने गेले आणि ती जोरात किंचाळली!"आमा पुलीस!"शब्द कानावर पडताच दोघींच्या हातून उद्गमचे शव सुटले आणि दोघी स्तब्ध राहिल्या.पोलिसांची तुकडी दित्याच्या योजनेनुसार घटना स्थळी आधीच पोहचली होती. पण, त्यांची योजना पूर्णपणे फसली! कारण, दित्याच्या योजनेनुसार उद्गम रंगे ...Read More

5

चौपाडी - एक भूक! - ०५ (शेवट)

आतापर्यंत आपण बघीतले,भावरूपा आणि हजुरआमा दोघींकडून कळत-नकळत घडलेल्या गुन्ह्यात न्यायालयाकडून शिक्षा सुनावण्यात आली होती. घडलेल्या प्रकारामुळे दित्याच्या मनावर याचा परिणाम झाला होता.आता पुढे!दित्या आधीपेक्षा जास्तच शांत झाली होती. प्रशासकीय आदेशानंतर तिचे समुपदेशन करण्यात आले. तिथे तिला मानसिक स्थैर्य प्राप्त व्हावे याकरिता दिनचर्या ठरवून देण्यात आली. त्यानुसार तिने स्वतःस बदलण्याचे खूप प्रयत्न केले. पण काही जखमा कधीच भरल्या जात नसतात; याचे अनुभव दित्याला उपचार घेत असता आले. किती जरी तिने स्वतःस समजावण्याचा प्रयत्न केला असला; तरी तिची आमा गुन्हेगार आहे हे तिच्या बालमनाला पटण्यासारखे नव्हते! काहीच दिवसांत दित्या घरी परतली आणि तिची जगण्यासाठीची धडपड सुरू झाली.अशातंच तिची भेट झाली एका ...Read More