लघुकथाए

(15)
  • 70.5k
  • 1
  • 27.5k

“मॅडम, गरीबाच्या पोटाला द्या की काही, .... ओ मॅडम!” “रवी, फटकाऊन काढीन हां आता. गप्पं बस जरा.” “आयला चिन्मयी, राव, किती गप्पं बसायचं? पूरा तास झाला आपल्याला या झाडाखाली बसून. तू त्या खोडाला टेकून बसलीस कधीची ढगांत नजर लावून, तो ढग आता बरसेल, मग बरसेल डोळ्यातून, आणि मग “झाले मोकळे आकाश” म्हणत मस्त चहा पिऊ म्हटलं तर कसलं काय ...” “रव्या............! तुला खाण्या पिण्या शिवाय दुसरं काही दिसत नाही का रे?” “घ्या आता! त्या कॅंटीन मधे मस्त कटवडा ओरपणार होतो, तेवढ्यात हाताला धरून उठवलंस, दरादरा ओढत या झाडाखाली बसवलंस, मला वाटलं माझ्यासाठी काहीतरी पाठवलंय काकूंनी, मस्त कोथिंबीर वडी किंवा कायतरी, ते तर काही देईनास, वर पोरं परत गेल्यावर ना ना प्रश्न विचारतील, की का बुवा नक्की काय केलं, तर सांगायला निदान काही चमचमीत पदार्थ तरी....” भडकून चिन्मयीने जवळ पडलेली काटकी भिरकावली रवीच्या दिशेने. मग मात्र तो मस्त गवतावर लोळत होता तो उठून बसला. “चिन्मयी, माहौल बनवणं पुरे झालं, बोला आता पोपटासारखं पटापट. काय झालय सगळ्या दुनियेची मयत झाल्यासारखं तोंड करून बसायला?”

New Episodes : : Every Monday, Wednesday & Friday

1

लघुकथाए - 1 - प्रेम हे प्रेम असतं : तुझं माझं सेम नसतं

“मॅडम, गरीबाच्या पोटाला द्या की काही, .... ओ मॅडम!” “रवी, फटकाऊन काढीन हां आता. गप्पं बस जरा.” “आयला राव, किती गप्पं बसायचं? पूरा तास झाला आपल्याला या झाडाखाली बसून. तू त्या खोडाला टेकून बसलीस कधीची ढगांत नजर लावून, तो ढग आता बरसेल, मग बरसेल डोळ्यातून, आणि मग “झाले मोकळे आकाश” म्हणत मस्त चहा पिऊ म्हटलं तर कसलं काय ...” “रव्या............! तुला खाण्या पिण्या शिवाय दुसरं काही दिसत नाही का रे?” “घ्या आता! त्या कॅंटीन मधे मस्त कटवडा ओरपणार होतो, तेवढ्यात हाताला धरून उठवलंस, दरादरा ओढत या झाडाखाली बसवलंस, मला वाटलं माझ्यासाठी काहीतरी पाठवलंय काकूंनी, मस्त कोथिंबीर वडी किंवा कायतरी, ...Read More

2

लघुकथाए - 2 - संगीत

३ संगीत पंडितजींनी तंबोरा खाली ठेवला. गेले दोन तास त्यांचा रियाज सुरू होता. मनवा त्यांचा रियाज वाटच पहात होती. तंबोरा खाली ठेवल्याच्या आवाजा सरशी ती गरम दुधाचा पेला घेऊन दिवाण खान्यात आली. पेला पंडितजींच्या हातात देऊन तंबोऱ्याला गवसणी घालण्यास तिने सुरवात केली. पहाटेचा रियाज पंडितजी एकटेच करत. दिवस सुरू झाला की शिकायला येणारे विद्यार्थी, काही कार्यक्रम असला की तबलजींबरोबरचे दुपारचे रियाज, सायंकाळ कार्यक्रम ठरवायला येणाऱ्या लोकांसाठी असे. ऐन चाळीशीत पंडित स्वरराज यानी चांगलेच नाव कमावले होते. गावी असताना रियाज भरपूर पण कार्यक्रम कमी असत. मग ते मित्राच्या सांगण्यावरून शहरी आले. इथे आल्या आल्या एका खासगी बैठकीत गाण्याची संधी ...Read More

3

लघुकथाए - 3 - चंद्रिका

ती सकाळी जरा उशीरानेच उठली. दात घासत गॅलरीत आली. सगळी चाळच आळसावलेली. कोणी अजून साखरझोपेत, रात्रीच्या श्रमांनी मोडून आलेली दुमडून रजईत पडलेली. हवा तशी गारच पडली आज. गॅलरीत पत्र्याच्या खालच्या वाशाला टांगलेल्या पत्र्याच्या डब्यातल्या तुळशीला तिने पाणी घातलं आणि चहाचं आधण चढवलं. चहाचा घोट नरड्याखाली गेल्यावर मात्र तरतरी आली तिला. चहा पोटात जाताच निसर्गाच्या हाकेला ओ देत डब्बा घेऊन खाली उतरली. नशीबाने एक दार मोकळं मिळालं . मग वर येऊन आंघोळ करून उठवलं तिने पोराला. “चल रे, उठ, उशीर होईल.” मग फरफऱ्या स्टोव्हला पंप मारून एकीकडे इडलीचा कुकर, वातीच्या स्टोव्हवर चपात्या, भाजी, चटणी, सांबार, बघता बघता झालं सगळं. डबे ...Read More

4

लघुकथाए - 4 - गण्या, मनी आणि जांभूळ

गण्या जागा झाला दचकून, घंटेच्या आवाजाने. क्षणभर कळेना त्याला, कुठे आहे ते! मग हळूहळू जाग आणि आठवण एकत्रच आली. काल संध्याकाळी पोलीस त्याला इथे सोडून गेले. ‘बा नं टांगलं सोत्ताला, आन् दोन दिसांनी आय पोलीस ठेसनात, मंदी आनी मला घिऊन ग्येली. आजाचा तिनं मुडदा पाडला शेतात, आसं म्हनली. समदं सांगितलं. पोरांना बगनारं कुनी न्हाय म्हनली. आयेला आता कुटं न्येलं काय म्हाईत. मंदीला पोरींच्या रिमांडात धाडनार हुते. मला हितं सोडलं. पन माजी मनी ऱ्हायली तितंच! आनि जांबळाचं झाड बी. त्येना कसं आननार ? बा, आजा, म्येले, आय पोलिस ठेसनात. मंदी आनि मी रिमांडात. घरला कोनीच न्हाय. मनी म्यॅंव म्यॅंव करत सोदत ...Read More

5

लघुकथाए - 5 - नि:शब्द

६ नि:शब्द लाजाळूची पानं एक एक करत मिटत गेली सईच्या नाजूक बोटांच्या स्पर्शाने. मिटता त्यांच्या कडून आलेली आनंदाची लहर सई आणि तिच्या अवती भवती रुंजी घालणाऱ्या इवलुशा पिवळ्या फुलपाखरापर्यंत पोहोचली. फुलपाखराचे पंख किंचित वेगाने फडफडले आणि सईच्या गालांवरची खळी अधिक खोल झाली. दंग्या बाजूलाच झोपलेला. ती लहर तशीच पुढे त्यालाही स्पर्शून गेली आणि जराशी मान उचलत त्याने शेपूट हलवली. मग सईने हळूच गवतफुलाला कुरवाळलं आणि परत एकदा तशीच आनंदी लहर वाऱ्यालाही सोबत घेवून सभोवतालच्या झाडा पानांवर अलगद पसरली. हलकेच पानांच्या टाळ्या वाजवून त्यांनी तो आनंद व्यक्त केला. सई, आनंदी बाईंची पाच वर्षांची पोरकी नात. मुलगा व सून ...Read More

6

लघुकथाए - 6 - न दिली वचने

७ न दिली वचने ”तू तेव्हाही मला आवडायचास जेव्हा माझं असणं तुझ्या गावीही नव्हतं. कित्ती घोळका घालायच्या तुला. कॉलेजचा हीरो होतास तू ! नाटक, गाणं, सगळीकडे तुझंच नाव. अभ्यासातही हुशार. प्रोफेसर्स पण फॅन होते तुझे. मी लांबूनच पहायची तुला. वाटायचं एक नजर तरी टाकावीस माझ्या दिशेने. नुसता लांबून दिसलास ना, तरी एक ठोका चुकायचा माझा. तुला मात्र तेव्हा माझी खबरबातही नव्हती. तू कायम त्या हायफाय मुलींच्या गराड्यात.” “वेडी की खुळी तू? त्या ‘भावल्या’ कधीच नाही भावल्या मला. तू वेगळीच होतीस सगळ्यांपेक्षा. दिसायलाही, आणि वागायलाही. लांबसडक वेणी चालताना अशी काही तालात हलायची की कलेजा खल्लास. एक ठहराव होता तुझ्यात. तुझ्याकडे ...Read More

7

लघुकथाए - 7 - जाणता राजा

८ जाणता राजा “राजन्, क्षमा असावी, अशा ऐरणीच्या प्रश्नावर सारी राज्यसभा थांबली असताना आपणास असं आत बोलावून घेतलं. पण मलाही तितक्याच महत्वाच्या विषयावर बोलायचं होतं. ही सतीची वस्त्रं आणली होती. युद्धावर जाण्यापुर्वी आपणच सर्व राण्यांना ती बहाल करावीत.” “हा काय प्रकार आहे राणीसरकार? तुमच्या सारख्या सुजाण राणीस हे असे अविचारी वागणे शोभत नाही. आम्हास विजयतिलक करावयाचा सोडून तुम्ही सतीची वस्त्रे मागवलीत? धिक्कार असो. तुम्हीच अशी इथे हार मानलीत हे सर्वोपकर्णी झाले तर सैनिकांचं मनोधैर्य कसं खच्ची पडेल हे आम्ही तुम्हास सांगण्याची गरज का पडावी परम? “ “खरय राजन्, माझं हे वागणं आपल्याला आततायी पणाचं वाटणं साहाजिकच आहे पण ...Read More

8

लघुकथाए - 8 - वर

११ वर रामच्या वडलांचा अचानक ह्रदयविकाराने मृत्यू झाला आणि रामचं कुटूंब दु:खाच्या खाईत लोटलं गेलं. तर पार मुळापासून हादरला. काहीच वेळापूर्वी आपल्या बरोबर बसून हसत खेळत नाश्ता करणारे आपले बाबा, अचानक या जगातून नाहीसे झाले. याला काय अर्थ आहे? असं कसं चालेल? काहीतरी तोडगा काढायलाच हवा. मग रामने सगळे जुने ग्रंथ धुंडाळायला सुरवात केली. कसून तपास सुरू केला. वाचनाचा सपाटा लावला. आणि शेवटी त्याला एक संदर्भ सापडला. खात्रीलायक उपाय. अतिशय अवघड, पण खात्रीचा. रामने सर्व पूर्वतयारी केली. व त्याने साधनेला सुरवात केली. घरच्यांना रामचा जिद्दी स्वभाव चांगलाच परिचयाचा होता. त्यामुळे कोणी काही बोलण्याचा प्रश्नच नव्हता. पाहता पाहता ...Read More