दिलदार कजरी

(57)
  • 201.5k
  • 7
  • 80.3k

त्याचे नाव दिलदारसिंग! नावाप्रमाणेच दिलदार. खरेतर एखाद्या डाकूला न शोभेल असे नाव त्याचे. दिलदार! त्याच्या जन्माच्यावेळी त्याच्या बापास, संतोकसिंगास, त्याचे पाय पाळण्यात दिसले की काय कोणास ठाऊक, भर जंगलात दिलदारने पहिला ट्यांहा केला. संतोकसिंग खूश झाला. आपल्या डाकू घराण्याचे नाव उज्वल करायला वारस मिळाला म्हणून. संतोकसिंग ठाकूर म्हणजे चंबळमधील सिनियर डाकू. रेप्युटेड म्हणावी अशी दरोडेखोरांची टोळी चालवणारा. त्याच्या क्रूरकर्मांमुळे गावागावातून प्रसिद्धीस पावलेला. नुसत्या नावानेही गावातले लोक चळचळा कापत. संतोकसिंग तसा कर्तृत्ववान. कमी वयात अंगावर टोळीची जबाबदारी येऊन पडली. संतोकसिंगाचा बाप नटवरलालसिंग एका डाक्याच्या वेळी बंदुकीची गोळी लागून गेला. त्याने देह ठेवला तेव्हा संतोक उणापुरा सोळा वर्षांचा असेल. पण आपल्या मिडिआॅकर म्हणाव्या अश्या टोळीचे दिवस संतोकसिंगाने आपल्या मेहनतीचे पालटवले. जंगलात दुसरे डाकू नटवरलालसिंगच्या उदार धोरणाने सह अस्तित्व करून होते. 'खुद खाओ.. औरोंको खाने दो' असल्या समाजवादी डाकूगिरीने उत्कर्ष होऊन होऊन किती होणार? देश परदेशातून बदलाचे वारे अर्थव्यवस्थांवरून वाहू लागले तेव्हा कदाचित त्यातील एखादी झुळूक चंबळच्या जंगलावरून वाहत गेली असावी. भांडवलशाही व्यवस्थेत खुद ज्यादा खाओ आणि इतरांना मिंधे बनवून त्यांच्याच वाटच्या चतकोर तुकड्यातील काही त्यांना उदार बनून खिलाओ अशा मताचा संतोकसिंग त्या दृष्टीने कामाला लागला. बदलती अर्थव्यवस्था.. आणि काय!

Full Novel

1

दिलदार कजरी - 1

Dr Nitin More १ दिलदार त्याचे नाव दिलदारसिंग! नावाप्रमाणेच दिलदार. खरेतर एखाद्या डाकूला न शोभेल असे नाव त्याचे. दिलदार! जन्माच्यावेळी त्याच्या बापास, संतोकसिंगास, त्याचे पाय पाळण्यात दिसले की काय कोणास ठाऊक, भर जंगलात दिलदारने पहिला ट्यांहा केला. संतोकसिंग खूश झाला. आपल्या डाकू घराण्याचे नाव उज्वल करायला वारस मिळाला म्हणून. संतोकसिंग ठाकूर म्हणजे चंबळमधील सिनियर डाकू. रेप्युटेड म्हणावी अशी दरोडेखोरांची टोळी चालवणारा. त्याच्या क्रूरकर्मांमुळे गावागावातून प्रसिद्धीस पावलेला. नुसत्या नावानेही गावातले लोक चळचळा कापत. संतोकसिंग तसा कर्तृत्ववान. कमी वयात अंगावर टोळीची जबाबदारी येऊन पडली. संतोकसिंगाचा बाप नटवरलालसिंग एका डाक्याच्या वेळी बंदुकीची गोळी लागून गेला. त्याने देह ठेवला तेव्हा संतोक उणापुरा सोळा ...Read More

2

दिलदार कजरी - 2

२. दिलाची हाक आपल्या बापाने सोडलेला हुकूम ऐकून दिलदार खरेच गोंधळला. खरेतर घाबरला म्हणावे. आजवर शहरी संस्कृती त्याने पाहिली पण देशाची प्रगती झाली तशी गावागावातून वीज खेळू लागली. म्हणजे वीज प्रत्यक्षात ही खेळू लागली नि त्यानंतर लपंडाव ही खेळू लागली. पण सदैव भुकेल्यास खायला काहीही मिळाले तरी चालते. त्यामुळे विजेचे दिवे रात्री एक तास जरी मिणमिणता उजेड पाडत असले तरी गावे खुश होती. पाठोपाठ गावात टीव्ही पोहोचला. गावच्या चावडीवर सामायिक टीव्ही नि सामायिक कार्यक्रम दर्शनाचा कार्यक्रम होऊ लागला. गावातील वारे चंबळच्या खोऱ्यात न वाहते तरच नवल. चंबळच्या डाकूवर्गात ह्या उजेड पाडणाऱ्या दिव्यांची बात पसरली नि त्या पाठोपाठ हलती चित्रे ...Read More

3

दिलदार कजरी - 3

३. दिलाच्या हाकेला दिलदारचा 'ओ' दिलाने दिलेल्या हाकेला 'ओ' देत दिलदारसिंगने पहिला निर्णय घेतला.. तो म्हणजे आधी गावच्या देवीचा घेणे.. मग गावोगावी फिरून कुठे 'कुछ कुछ होता है' का ते पाहणे. पोरं शाळा नि काॅलेजात जातात, तिथे या गोष्टींची 'सोय' आपोआप होते. पण दिलदार कधी शाळेचीही पायरी न चढलेला. त्यामुळे त्याला ही सोय नाही. त्याने कित्येक चित्रपटांतून हे ज्ञानाचे कण गोळा केलेले. शेजारील गावातल्या घंटाई देवीच्या पुढची घंटा त्याने वाजवली. डोळे मिटून हात जोडले. समशेरसिंग बरोबर होताच.. "सरदार, तुम्ही आपला घोडा गावाबाहेर सोडून चालत आलात? हाती बंदूक ही नाही .." "समशेर, अरे देवीच्या दर्शनास घोडा आणि बंदूक कशाला?" दिलदार ...Read More

4

दिलदार कजरी - 4

४. घेई छंद..! त्या नंतर दिलदारच्या दिलाने एकच आवाज दिला.. 'कजरी कजरी.' कजरी नामात तो गुंगला, गुंतला. ध्यानी मनी कजरी दिसू लागली. रोज सकाळ संध्याकाळ त्या देवळाकडे पाऊले पडू लागली. समशरेसिंगाने लाख समजावले पण दिलदार है कि मानता नहीं.. असे व्हायला लागले. रात्रंदिन तो ती दिसेल याच्या विचारात मग्न बसू लागला. लागले नेत्र ते कजरीतीरी असे काहीतरी. देवळाबाहेर नि देवळाच्या आत, चुकला फकीर मशिदीत सापडावा तसा दिलदारसिंग सापडायला लागला. न राहवून समशेर सांगे, "सरदार, तुम्ही हा नाद सोडा. ज्या गोष्टीला शेवट नाही ती अशी पुढे रेटू नका.." "समशेर, तू माझा एकुलता एक यार, तू पण असे बोलावेस?" "सरदार, हे ...Read More

5

दिलदार कजरी - 5

५. स्वप्नात रंगला तो.. शेजारचे गाव. कजरीचे. दिवालपूर. गाव मोठे. म्हणजे खाऊन पिऊन सुखी. हिरवीगार शेते. पाण्याने भरलेली तळी. देऊळ. त्याबाहेर पिंपळाचे मोठे झाड. त्याच्या बाजूचा पिंपळाचा पार. घोड्याच्या टापांचा दूरवरून आवाज येतो. हळूहळू वाढत जातो. पारावारचे गावकरी एकेक करून उठतात. आवाजाच्या दिशेने बघतात. मग धावाधाव सुरू होते. घोडे मातीचा धुरळा उडवत गावात भरधाव शिरतात. ही दिवाणसिंगाची टोळी. दिवालपूर लुटायला आलेली. दिवाणसिंग शेफारलाय हल्ली. त्याचे साथीदार हवेत गोळीबार करतात. गावकरी घाबरून घरात नि बाहेर चिडीचुप शांतता. दिवाणसिंगाची माणसं इकडेतिकडे मोकाट सुटतात. सगळीकडे धूळच धूळ. मग दिवाणसिंग स्वतः देवीच्या देवळामागच्या घरात शिरतो. कजरी त्याच्या नजरेतून सुटलेली नाही. तशी कोणाच्या नजरेतून ...Read More

6

दिलदार कजरी - 6

६. पहिले पाऊल पुढील काही दिवस गावात फेऱ्या मारून मारून दिलदार थकला. घनघोर फेऱ्या झाल्या पण गावात कजरी दर्शन नाही. देवळात देवीचे दर्शन होई. नि ती पावेल तर कजरी भेटेल.. कदाचित. विचारात मग्न दिलदारला कसलीच शुद्ध नव्हती आजकाल. समशेर आणि बाकी साथीदार तसे मोहिमा आखण्यात मग्न होते. आणि दिलदार आपल्या दुखऱ्या दिलाची मलमपट्टी करण्यात. येता जाता आता कजरीच्या गावचे पण ओळखीचे होतील की काय.. दिलदार त्या विचाराने अस्वस्थ होई, पण इतर काही न सुचून परत त्या देवळाकडे पुजारी कन्येच्या शोधात जाई. शेवटी काही दिवसांनी कजरी दिसली आणि दिलदारच्या दिलात दिल आले, म्हणजे जिवात जीव आला! थोड्याच दिवसांत मग अजून ...Read More

7

दिलदार कजरी - 7

७. लेखन वाचन मास्तरांचे शिकवणे सुरू झाले. दोन गोष्टी .. एक अक्षर ओळख, आकडे, लिहिणे वाचणे आणि दुसरे.. सायकल घोडा दौडवणे कठीण नसेल पण दुचाकी सायकलीवर तोल सांभाळत ती चालवणे मात्र कठीण. आपल्या हातातील लगामाने सारे काही कंट्रोल करण्याची सवय डाकूलोकांना. अगदी जिभेच्या लगामापासून सुरूवात. आजूबाजूच्या गावांवर दहशतीचा लगाम लावूनच इतकी वर्षे टोळी पोलिसांपासून बचावली होती. घोड्याचा लगाम म्हणजे त्या जंगलातील आयुष्याचे प्रतीक होते जणू. आणि दिलदार शिकतोय या सायकलीला तर असा लगामच नव्हता! ब्रेक मारला की थांबते ती सायकल, पण लगामासारखी 'मर्दानी' मानावी अशी गोष्टच सायकलीत नाही. टोळीत होणाऱ्या बदलाचे तर संकेत नव्हते हे? दिलदार विद्यार्थी म्हणून तसा ...Read More

8

दिलदार कजरी - 8

८. पाऊल पडते पुढे .. रात्रीची वेळ. खरेतर त्यांच्या आयुष्यात दिवस नि रात्र वेगळी काढणे कठीण. एकदा डाका घालायचा की टोळीत चैतन्य येई. दिवसरात्र न पाहता सारे कामाला लागत. आपापल्या घोड्याला प्रेमाने थोपटत खाऊ घालत. बंदुकीच्या गोळ्या व्यवस्थित भरून ठेवत. आता सरावाने सारे पटापट होत असे. दिलदार दुरून पाहात असे. या सर्वात मेहनत तर खरी. योजना आखणे पण महत्त्वाचे. गावाची निवड करणे, त्यासाठी नीट टेहळणी करून योजना आखणे, सगळ्या धामधुमीत आपली टोळी सुरक्षित ठेवणे, मग लुटालुटीची नीट व्यवस्था लावून देणे.. हे आयुष्य खरेतर खडतर आहे. पण मोहिम फत्ते केली.. गावात एखाद्याला जिवानिशी मारले की टोळीतील सारे कृतकृत्य होत. लहानपणापासून ...Read More

9

दिलदार कजरी - 9

९. पाऊल पडेल का पुढे? दिलदार परतला. समशेर त्याची जणू वाटच पाहात होता. नाही म्हटले तरी समशेरला या प्रेमकहाणीत रस वाटायला लागला होता. नेहमीच्या मारधाडीपेक्षा हे अधिक रम्य वाटायला लागले होते. दिलदारच्या दिलाची हाक नि भूक अशी गोड वाटेवर घेऊन जाणारी असेल तर हे दरोडेखोरीचे आयुष्य म्हणजे फुकट.. दिलदारच्या प्रयत्नात एक काव्य आहे. एक नाजूक भावना आहे. भले त्याचे ते स्वप्न पूर्ण होईल किंवा न होईल.. पण ती वाट वेगळी आहे. बंदुकीच्या दस्त्याहून गुलाबाच्या पाकळ्यांत जास्त ताकद आहे की काय? गुरूजींना पळवून आणले ते ही प्रेमाने बोलत होते.. त्यांना या बंदुकीच्या गोळ्यांची गरज भासत नव्हती. आणि गावातील लोक? ते ...Read More

10

दिलदार कजरी - 10

१० द्वितीयोध्याय:! प्रथमग्रासे माशीपतनाचा अनुभव खरोखरच येत राहिल असे दिलदारला वाटले नव्हते. म्हणजे गावाच्या वेशीवर त्याचा व्यवसाय बंधू दिसावा त्यामुळे सारंच बिघडू लागावे? हाती पत्रे घेऊन इकडेतिकडे न पाहाता तो देवळाबाहेर पोहोचला. सायकल उभी ठेऊन कजरी दर्शनाची वाट पाहू लागला. थोड्याच वेळात त्याला ध्यानात आले, हे असे उभे राहणे जास्त वेळ शक्य नाही कारण उभ्या उभ्या सवाल येऊ लागले, "नवीन आलाय जणू?" "मास्तर, शहरासून चिठ्ठी आली का?" "सकाळची डाक कितीला निघते?" "मास्तर, गाव कोणतं तुमचं?" असल्या प्रश्नांचा मारा चुकवायचा असेल तर इथे थांबून चालायचे नाही.. तो देवळात शिरला. घंटी वाजवून देवीला आल्याची वर्दी दिली. एक डोळा आतून कजरीदेवीचे दर्शन ...Read More

11

दिलदार कजरी - 11

११ केल्याने वेशांतर गुरूदासपूर तसे मोठे गाव. नदीतीरावर वसलेले, त्यामुळे सुपीक जमिनी, हिरवी शेते आणि पोटापाण्याचा प्रश्न सुटून आलेल्या पाठोपाठ लोकांना मग खुणावू लागते ती कला नि कलाकारी.. दशावतारी नि नौटंकीचा मिलाफ असणारी कला तिथे सादर होई. आणि सर्व पात्रे साकारणारा मेकपमॅन ही त्याच गावचा.. हिंमतलाल. समशेर त्याचे नाव ऐकून होता.. नि मग गुरूदासपुरातून येता येता हाती लागेल तसा एक ज्योतिषी .. कुडमुड्या असेल तर अधिकच उत्तम .. दोघांना उचलून आणायचे.. दिलदारची सक्त ताकीद .. हिंसेच्या बळावर आणून चालणार नाही. प्रेमाने समजावून तर ते येणार नाहीत. समशेरच्या गाठीशी तसा मास्तरांना उचलण्याचा अनुभव होताच.. त्यात ही नवीन भर! - आणि ...Read More

12

दिलदार कजरी - 12

१२ आचार्य! आज सकाळी दिलदार उठला.. चार दिवस मध्ये उलटून गेलेले. आता तो ज्योतिषी बनून पुजारीबुवांच्या घरात घुसायला तयार समशेर त्याला तयारी करून देत होता. ज्योतिषी म्हणून सायकलीवर जाऊ शकत होता तो, पण गावात कोणी ओळखली सायकल तर पंचाईत. म्हणून समशेर बरोबर घोड्यावरून स्वारी निघाली. गावाबाहेर समशेर थांबून राहिल नि तोवर दिलदार आपला पराक्रम गाजवून येईल.. "आज तरी काम होऊ दे तुझे.." "तुला इतकी माझी काळजी रे समशेर.." "तुझी नाही, स्वतःची काळजी. नाहीतर अजून काही दिवसांनी अजून नवीन काही.. नाही, अजून नव्या कोणाला तरी पळवून आणायला सांगायचास तू.. गुरुजी झाले.. आता हे दोघे.. पळवून आणायचे पण मारायचे नाही ना ...Read More

13

दिलदार कजरी - 13

१३ सब्र का फल! आता काय करावे? दिलदार पेचात पडला. जिच्यासाठी तो आला ती पुजारी कन्याच नसावी? पण हे शक्य आहे? आजवर कित्येकदा तिला इकडे पाहिलेले.. पुढे घोडे दामटत दिलदार म्हणाला, "लीलाको बुलाएंगे तो.. हम चेहरा देखकर बता देंगे.." लीला बरोबर कदाचित ती धाकटीपण यायची.. ती आपलीवालीच असेल तर नाव काही का असेना तिचे.. नावात नाहीतरी आहे काय? "लीला? ती तर पाठराखीण म्हणून गेलेली. आली होती. पण परत गेलीय. येईल आठवड्यात.." म्हणजे त्याचीवाली धाकटी पण कदाचित त्या भलीथोरलीच्या घरी, थोरलीच्या पाठोपाठ गेली असणार .. की इकडेच घरात बंद करून ठेवलीय तिला? "वैसे फोटो देखकर भी भविष्य बताते हैं हम.. ...Read More

14

दिलदार कजरी - 14

१४. पुनर्भेट "यार समशेरा, माझा विश्वास बसत नाही हे सगळे घडले त्यावर.. म्हणजे मी खरोखरच ज्योतिषी बनून गेलो नि संशय न येता सगळे काम करून आलो.. आणि कजरी भेटेल असे शेवटपर्यंत वाटत नव्हते. ती भेटली अगदी शेवटी. आणि महत्त्वाचे म्हणजे ती पण पोस्टमनची वाट पाहाते आहे.." "पण तिला कदाचित तो पोस्टमनच आवडला असेल तर?" "तर? आयुष्यभर पोस्टमनच्या वेशात सायकलीवरून फिरत राहीन.. तू कहे अगर जीवनभर सायकल चलाता जाऊं.. उद्या पोस्टमनचे काम परत आहे.." "मग तुझे ज्योतिषी बनण्याचे सगळे सामान देऊन येतो परत.." "नाही दोस्त नाही. पुढे कधी कशी गरज पडेल सांगता येत नाही. सगळे साहित्य हाताशी असलेले बरे.. सध्या ...Read More

15

दिलदार कजरी - 15

१५ भेट पहिली खडकाखाली रात्रभर दिलदार तळमळत राहिला. बाकी टोळी कुठेतरी धाड घालायला निघून गेलेली. संतोकसिंग नव्हता तरीही बाकीचे व्यवस्थित सारे पार पाडतं. संतोकसिंगच्या नेतृत्व गुणांचेच त्यातून दर्शन होत होते.व्यवस्थित लावून दिलेली शिस्त आणि टोळीची उद्दिष्टे अतिशय सुस्पष्ट असणे.. दयामाया या शब्दांना जवळ फिरकू न देणे वगैरे त्याची मूलभूत तत्वे सारेच टोळीकर कोळून प्यायले होते. सारे त्या मार्गावरून टोळीची दहशत बसवत टोळीची बरकत वाढवीत होते, तेव्हा दिलदार त्यावर हरकत घेत आपल्या दिलाची पुकार ऐकत बसलेला. त्यात आता कजरीची पडलेली भर. कजरीच्या भेटीनंतर दिलदार अजूनच सैरभैर झाला. तिला जेव्हा दिलदारच्या मुळाबद्दल कळेल तेव्हा काय होईल? दिलदार खूप विचारात पडला. समशेर ...Read More

16

दिलदार कजरी - 16

१६ हरिनाथ मास्तरांची भेट आपल्या तंबूत दिलदार पोहोचला. सारा वृत्तांत समशेरच्या कानी घातला तेव्हा दिलदारला थोडे हलके वाटायला लागले. गहन खलबतं झाली. त्या दिवशी रात्री कजरीच्या गावात घोड्यांच्या टापांचा आवाज घुमला. सारी घरे आतून कड्याकोयंडे लावून चिडीचुप्प झाली. फक्त वाड्याच्या माडीवरून एका कवाडाला किलकिले करून कजरी पाहात होती. दोन घोड्यांवरून दोन जण चाललेले.. तिचा अंदाज खरा होता. त्यातील एक तोच पोस्टमन होता.. घोड्यावरून स्वार दिलदार विचारात पडलेला.. गुरूजी कजरीला काय सांगतील? पोस्टमन नि दिलदार .. दोघांबद्दल. आणि अजून काही.. त्यांना पळवून नेले त्याबद्दल .. पण आता इलाज नव्हता. जे जे होईल ते ते पहावे म्हणत दिलदार घोडा हाकीत होता. ...Read More

17

दिलदार कजरी - 17

१७ मास्तरांचे कजरीला पत्र! मग दोघे घोडेस्वार दूरच्या रस्त्याने निघाले. इकडे सकाळचे घोडेस्वार परत येतीलच म्हणत कजरी आपल्या माडीवर पाहात बसलेली.. .. ती पार संध्याकाळपर्यंत.. तिला दुसरीकडून सायकलवरून येणारा दिलदार डाकिया दिसेपर्यंत. ती झटकन नदीकिनारी आपल्या खडकाकडे निघाली. "काय म्हणाले हरिनाथ गुरूजी?" "ठीक आहेत म्हणाले. बरी आठवण काढलीस म्हणत होते .. पण त्यांनी चिठ्ठी नाही दिली काही.." "आणि माझी चिठ्ठी?" "ती दिली.." "ती नव्हे. चार शब्दी चिठ्ठी .." इथे अखंड सावधान असणे कसे जरूरी आहे याचा प्रत्यय आला दिलदारला. ही चार शब्दी चिठ्ठी म्हणजे काय हे ठाऊक असण्याचे त्याला कारण नव्हते .. साळसूदपणे तो म्हणाला, "म्हणजे?" "तुम्हाला ठाऊक नाही?" ...Read More

18

दिलदार कजरी - 18

१८. कजरीचे दिलदारला पत्र! दिलदार रात्रभर विचारात होता, मास्तरांनी भेटायला का बोलवावे यापेक्षा त्यांनी कजरीला पत्र का लिहिले नि काय लिहिले असावे? ते त्यांना भेटूनच कळणार होते. पण कजरीच्या बोलण्यात आलेला दिलदार शब्द? तो असंच आला की मुद्दाम? तिला डाकूंच्या टोळीची भीती वाटते तर तिला सारे ठाऊक असेल तर ती अशी शांत कशी? समशेरला न सांगता दिलदार हरिनामपुरात पोहोचला. मास्तर घरात वाट पाहात बसलेले .. "ये. आलास. छान." "तुम्ही बोलावले गुरूजी?" "अरे हो. तुला बोलवायचे. पण तुला निरोप कसा देणार. मग कजरीबेटीला पत्र लिहिले." "ती म्हणाली मला. पण.." "काळजी करू नकोस.. कजरीला मी जे सांगायचे ते सांगितलेय.. तू फक्त ...Read More

19

दिलदार कजरी - 19

१९. दिलदारचे नवे पत्र दिलदारने अधीरतेने पत्र उघडले. चिठ्ठीत काय असेल? आयुष्यात आलेले हे पहिलेच पत्र. तेही प्रेमपत्र. कजरीने लिहिले असणार? कजरीने दिलदारच्या चार शब्दांचे उत्तर.. चार शब्दांतच दिलेले! मजकूर इतकाच.. 'आज तिकडे भेटायला ये..' इतकेच! तिलाही ते दिलदारचे पहिले पत्र वाचून असेच वाटले असेल.. बास? इतकेच? परतल्यावर त्याने समशेरला चिठ्ठी दाखवली.. समशेर कागद उलटापालटा करत म्हणाला,"काला अक्षर भैंस बराबर. आणि अशी दुसऱ्यांची प्रेमपत्रे वाचण्याची पद्धत नाही माझी!" दिलदार विचार करत होता.. एका दिवसात किती गोष्टी घडाव्यात.. गुरूजींशी भेट.. त्यात शरणागतीबद्दल बोललेले.. मग कजरीशी भेट नि तिचे पहिलेवहिले प्रेमपत्र.. तिला प्रत्यक्ष दिलदार म्हणून भेटायचे.. सगळ्या गोष्टींचा सोक्षमोक्ष लवकरच लागणार.. ...Read More

20

दिलदार कजरी - 20

२०. ये मेरा प्रेमपत्र.. प्रेमपत्र म्हटले की त्याचा एक साचा असतो. तीच प्रेमाची गोड गुलाबी भाषा, प्राणसखा नि प्राणप्रिये.. आणि जिवलगे.. ह्रदयाची धडकन नि काळजाची धडपड असले काही नि अजून काही नाही. त्यात सध्या झुरणे किती जोरात सुरू आहे याचे शाब्दिक चित्रण नि एखाद्या राजकीय नेत्यानेच दाखवावीत अशी भावी सुखी आयुष्याची सत्तर एम एम ची डाॅल्बी साउंड फिल्मची स्वप्ने! प्रत्येक नवथर नि नवोढ युगुलाला ते नवे नवे नि हवे हवे वाटते. आजवर असली दिव्य प्रीती कुणी न केली न कोणी या पुढे करेल यावर त्यांचा गाढ विश्वास असतो. पहिल्या प्रेमाला प्रेमपत्रातच प्रेमाचे कढ नि प्रेमाच्या उकळ्या फुटून ते प्रेम ...Read More

21

दिलदार कजरी - 21

२१. कजरी कथा कजरीने हरिकथा कथन करण् त्या दिवशीची गोष्ट. त्या संध्याकाळी हरिनाथ गुरूजी घरी आले. मी एकटीच होते. बाहेर कुठे गेलेले. गुरूजी चालत आलेले. थकून गेलेले. गावाबाहेर बस येते तिकडून पायी आलेले तर थकणारच ना. "गुरूजी तुम्ही? किती वर्षे झाली.." "हो पोरी. कामच तसे निघाले म्हणून आलो." "काम? आणि या गावात?" "गावात नव्हे पोरी." "मग?" "तुमच्या घरी." "पण सगळे बाहेर गेलेत गुरूजी. रात्री पर्यंतच येतील." "बरे झाले. काम तुझ्याकडेच आहे." "माझ्याकडे?" "ऐक. नीट लक्ष देऊन ऐक." "होय गुरूजी." "मी कालच सुटलो.. तिकडून सुटलो नि तडक इकडे आलो." "सुटलात? कुठून गुरूजी?" "त्या बाजूला तुला ठाऊक आहे. रामगढ गाव आहे. ...Read More

22

दिलदार कजरी - 22

२२. कजरीशी संवाद रात्री समशेर आणि दिलदार दोघेही बसलेले. दोघेही आपापल्या विचारात. मास्तरांनी सांगितलेले समशेरला ही पटत होते, पण रासवट आणि दांडगाईला चटावलेल्या सगळ्या डाकूगणांना शरणागतीची कल्पना एकाएकी सांगणे कठीण. एकतर त्यांना ते कळणार नाही. दुसरे, त्यातून काही जण तरी तडक सरदार संतोकसिंगास जाऊन खबर देतील. त्यानंतर तर हे सगळे अशक्य होईल. तरीही शरणागतीची कल्पना समशेरला आवडली. म्हणजे गुरुदासपूरच्या गीता बरोबर धागा जुळवता येईल, हा त्यातला मोठा फायदा. दिलदारच्या प्रेमकथेत नि प्रेमप्रकरणात त्याला हल्ली जास्त गंमत वाटू लागलेली. जिच्यासाठी जीव ओवाळून सारे काही पाठी सोडायला तयार व्हावे अशी कोणी मिळाली तर तिची ओढ आणि त्यासाठी करावी लागणाऱ्या धडपडीतील गोडी ...Read More

23

दिलदार कजरी - 23

२३. कजरीचे निशा दर्शन! हरिनामपुरात आज सकाळ सकाळीच गडबड दिसत होती. एरवी अजगरासारख्या सुस्त असलेल्या गावात काहीतरी गजबज दिसत मातीचे रस्ते होते पण ते झाडलोट करून स्वच्छ केलेले दिसत होते. जागोजागी पोलिसांची गस्त दिसत होती. ते पाहून समशेर सावध झाला. "दिलदार, मागच्या रस्त्याने जाऊ. काहीतरी गडबड दिसतेय .." तो म्हणाला नि दोघांनी रस्ता बदलला. मास्तरांच्या घराजवळ जाणारा एक पाठचा रस्ता त्यांनी पकडला. त्यांच्या घराजवळ आले तर तिथेच गाड्यांचा ताफा उभा होता. मास्तरांच्या घरात कुणीतरी आलेले दिसत होते. "बहुतेक सरकारी गाडी आहे. गुरूजींकडे कशी?" "पोलिस बघ किती आहेत.. त्या खिडकीतून बघ.. हळूच. कोण कोण आहेत..?" समशेर जवळच्या झाडावर चढून वरच्या ...Read More

24

दिलदार कजरी - 24

२४. नदी किनारी भेट कजरीशी कजरी आज उठली ती खुशीतच. स्वतःशीच खुदकन हसत. दिलदार दिलवर बनून तिच्या दिलावर राज्य होताच. सकाळ नि दुपार त्याला भेटण्याची वाट पाहण्यात, संध्याकाळी त्याच्याशी बोलण्यात नि रात्र ते सारे आठवून त्यात रमण्यात जायची. पण रात्री दिलदार चक्क स्वप्नातच आला. खिडकीतून आला म्हणे! झाडावरून खिडकीतून? पण खरोखरच आला असता तर? चंबळनदीच्या किनारी तो मोठा खडक त्यांच्या प्रेमकथेचा साक्षीदार होता. त्याच्या पायथ्याशी ती जाऊन बसली. नदीचा हा भाग निर्जन होता आणि तिथे खडकावर बसून दिवसेंदिवस स्वप्ने पाहणे हाच तिचा छंद होता. आज तिथे जाऊन ती बसली, दिलदारची वाट पाहात. काल तो हरिनामपुरात गेलेला, गुरूजी काय म्हणाले ...Read More

25

दिलदार कजरी - 25

२५. शरणागतांची शरणागती सकाळी सकाळी टीव्हीच्या आजूबाजूला सगळे टोळीकर जमून ऐकत होते. मोठया आवाजात बातम्या ऐकू येत होत्या. दिलदार त्या ऐकू लागला. हरिनाथ मास्तरांच्या घरी पाहिलेला पांढऱ्या शुभ्र कपड्यातील नेता मुलाखत देत होता. मोठया खुशीत आणि स्वतःवर खुश होत तो तावातावाने बोलत होता, "आमच्या सरकारच्या प्रयत्णाने या ठिकाणी आम्ही चंबळच्या एका मोठ्या डाकूनच्या टोळीला शरन येन्यास भाग पाडले आहे. आमच्या मानणीय आनि आदर्नीय मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वाखाली आपले राज्य दहशत मुक्त करण्याचा वसा आम्ही या ठिकाणी घेतला होता. त्या अणुषंगाने आमच्या मानणीय आनि आदर्नीय मुख्यमंत्र्यांच्या मार्गदर्शणाखाली आनि आमच्या अथक प्रयत्णांना यश येऊन चंबळमधील एक मोठी टोळी आपली शस्त्रे टाकून शरन येणार ...Read More

26

दिलदार कजरी - 26

२६. एक पाऊल अजून पुढे! शेवटी एकदाचे मास्तर भेटलेच. पहाटे पहाटे समशेर आणि दिलदार मास्तरांच्या घरी पोहोचले. गेल्या काही खूप काही घडून गेलेले. त्यानंतर मास्तरांची ही भेट.. "नमस्ते गुरूजी." "अरे वा! या! काय नवीन बातमी? कजरीबेटीबद्दल असणार तर गोडच असणार. आणि तुझी भगवद् गीता.. पारायणे सुरू केलीस की नाही समशेर?" "काय तुम्ही गुरूजी .." "अरे लाजू नकोस. एका डाकूला लाजणे शोभत नाही समशेर .." "डाकू? आमची शरणागती.." "अरे ठाऊक आहे.. गंमत थोडीशी." "आम्ही दोनवेळा येऊन गेलो गुरूजी." "असणार. थोडा व्यस्त होतो." "तुम्ही सरदारांशी बोललात गुरूजी .. त्यादिवशी आम्ही आलो तर.." "अरे, एखादी डाकूंची टोळी शरण येणे काही साधी गोष्ट ...Read More

27

दिलदार कजरी - 27

२७. पूर्वतयारी! कजरीच्या घरी दिलदारचे आचार्य बनून जाणे थोडे दूरवर गेले, कारण पुजारीबुवाच आपल्या दूरच्या गावी काही दिवसांसाठी निघून आता त्यांची वाट पाहाणे आले.. नदीकिनारी कजरीला दिलदार सांगत होता, "तुला सांगू, प्रियेची वाट पाहणारा प्रियकर असेल पण आपल्या सासऱ्याची आतुरतेने वाट पाहणारा मीच एक असणार जगात." "का? म्हातारा आचार्य बनायची इतकी हौस आहे?" "नाही. तुझा हात पकडून बसायची आहे.. तू अशी बसलीयेस नि मी हात पाहून भविष्य घडवतोय.." "ज्योतिषीबुवा, भविष्य सांगतात .." "असतील ही. आम्ही घडवतो .. तर मी भविष्य घडवेन.. मग तुझ्या डोळ्यांत डोळे घालून प्रत्यक्ष तुझ्याच घरी बसेन. सर्वांसमोर.. चेहरा वाचन करत! काय छान कल्पना आहे!" "छान ...Read More

28

दिलदार कजरी - 28

२८. पुन्हा आचार्य! मौर्या पुजारीबुवा आरती संपवून घरी परतले आणि दरवाजावर थाप पडली.. "प्रणाम!" "आपण आचार्य? वा! या या.." संदेसा आया. चले आए." "अलभ्य दर्शन. अलभ्य लाभ. तुमची आठवण काढली होती हल्लीच. आपल्यासारख्यांचे चरण आमच्या घराला लागले.. " "पांव तो लगे आपके घर, पर वह तो हमारे हाथोंमें नहीं. देवीका इशारा हुवा तो जहां भी हो चले जाते हैं. आज रात संदेसा आया. मौर्यागुरूजी जैसे पुण्यशील व्यक्तिके घर जाने के लिए. चले आए." "बहुत शुक्रिया. रसीलाबेन.. आचार्यजी आए हैं. दूध आणि केळी आणा.." आतून रसीलाबेन बाहेर आल्या. मागच्या वेळी कपभर दूध होते. यावेळी मोठा प्याला भर! दिलदारला दुधाचे वावडे.. ...Read More

29

दिलदार कजरी - 29

२९. जोरका झटका धीरेसे.. कजरीचा हात हातात ठेवत बारकाईने पाहात दिलदार म्हणाला, "इतनी भाग्यशाली कन्या है आपकी. इससे आपके नया प्रकाश आया है. तरक्की होगी तो इसी कन्या की वजहसे. इसके हाथकी रेखा कहती हैं कि इसकी बडी बहनका भी उत्कर्ष इसीकी वजह से है.. इन दोनोंका भविष्य एक दूसरेसे ऐसा जुडा हुवा है जैसे दीया और बाती, फूल और सुगंध, डाकू और बंदूक!" शेवटच्या उदाहरणानंतर दिलदारने जीभ चावली. लगेच पुढे म्हणाला, "इतना गहराईसे संबंध है कि दोनोंकी शादी एकही दिन एकही जगह होना तय है.." "काय? आचार्य, दोघांचे लग्न एकाच वेळी. म्हणजे ही कजरी लग्नाची होईपर्यंत थांबावे लागेल ...Read More

30

दिलदार कजरी - 30

३०. भैरवलाल! "या या. भैरवलाल." पुजारीबुवांनी स्वागत केले नि दिलदारच्या काळजाचा ठोका चुकला. भैरवलाल! मागे कोणीतरी म्हणालेले, या जन्मातील फळ या जन्मीच भोगावे लागते.. ते खरे होणार की काय? समशेर ह्याला भेटलाच नाही की काय? या भैरू पैलवानासमोर बचाव कसा करावा? तो या अवतारात ओळखेल? नाही ओळखले तर काम सोपे, पण तो ओळखल्यावाचून रहायचा नाही. तरीही त्याने ओळखले की नाही ओळखले हे दिलदार कसा ओळखणार होता? मौर्या गुरूजी तोंडभरून स्वागत करत म्हणाले, "काय योगायोग भैरवलाल पंडित. तुमचे गुरूजी ही इथेच आहेत.." भैरवलाल दिलदारला त्या अवतारात पाहून थबकला, मग घाबरला. काही महिन्यांपूर्वी डाकूंच्या टोळीने केलेले अपहरण आठवून त्याला घाम फुटला. ...Read More

31

दिलदार कजरी - 31

३१. गंगेत घोडे न्हाले! दिलदारला परतल्यावर समशेरला पाहून प्रश्न पडला.. हा भैरवलालला भेटला? की नाही भेटला? आणि का नाही भेटला असेल तर भैरवलालची येण्याची हिंमत झाली नसती. "समशेरा, आज कजरीच्या घरी या आचार्यास कोण भेटावा?" "कोण?" "तू सांग?" "मी? मी काय सांगणार? मला कोण भेटले विचार." "कोण?" "तू सांग.." "आधी मी विचारलेय.. समशेर." "मग आधी तू बोल.." "भैरवलाल! भैरवलाल येऊन उभा राहिला. नशिबानं शेवटीशेवटी आला नाहीतर काही खरं नव्हतं. तू भैरवलालकडे गेलाच नाहीस?" "मी? अरे राहिले. मला गीता भेटली.. कशी ते विचार .." "म्हणून. म्हणून तुझं लक्ष नाही दिसत. भैरवलाल आचार्यासमोर, म्हणजे माझ्यासमोर. मला वाटलं सपलं सारे.. पण वेळ ...Read More

32

दिलदार कजरी - 32 - अंतिम भाग

३२. सुखांत काही दिवसातच मंदिरात मंडप घातला गेला. अगरवाल आणि अगरवाल धान्याचे होलसेल व्यापारी, या दुकानाचे मालक देवचंद अग्रवाल. एकमेव सुपुत्र केशव नि ईश्वरलाल मौर्या गुरूजींची ज्येष्ठ कन्या लीला यांचा विवाह संपन्न झाला. पाठोपाठ संतोकसिंग ठाकूर यांचे पुत्र दिलदारसिंग आणि मौर्यागुरूजींची द्वितीय कन्या कजरी हिचा. अर्थात एकूण परिस्थिती पाहून हा दुसरा विवाह पहिला पार पडल्यावर लावला गेला. अगरवाल व्यापारी म्हणजे गावातील मोठे प्रस्थ. त्यांचे दुकान दोन वेळा संतोकसिंगच्या टोळीने लुटलेले. त्या संतोकसिंग पुत्राशी कजरीचा विवाह एकाच वेळी होणे अशक्य. तेव्हा तडजोड केली गेली. लीलाची बिदाई झाली. तिची दूरची एक बहीण पाठराखीण म्हणून पाठवली गेली. नि त्यानंतर दिलदारसिंग संतोकसिंग ठाकूर ...Read More