मी सुंदर नाही

(14)
  • 51.5k
  • 5
  • 24k

सुहास नोकरीसाठी एका हॉटेल मध्ये गेली होती. तीने तोंडावर मास्क लावला होता.तीचा मास्क खाली घसरला. तो तिने पुन्हा नाकावर चढावला. हॉटेलवाल्याने तिला विचारले तुला काय काय बनवता येते.? मला सगळं करता येते. जेवण बनवते, चहा बनवते मिसळपाव बनवते, चायनीज पदार्थ बनवते. शांतादुर्गा म्हणाली...बोलता बोलता तिने तोंडावरचा मास्क काढायला हात घातला एवढ्यात हॉटेलचा मॅनेजर बोलला. कृपया मास्क काढू नका. कोरोना रोगाचा धोका अजून गेला नाही.

Full Novel

1

मी सुंदर नाही - १

सुहास नोकरीसाठी एका हॉटेल मध्ये गेली होती. तीने तोंडावर मास्क लावला होता.तीचा मास्क खाली घसरला. तो तिने पुन्हा नाकावर चढावला. हॉटेलवाल्याने तिला विचारले तुला काय काय बनवता येते.? मला सगळं करता येते. जेवण बनवते, चहा बनवते मिसळपाव बनवते, चायनीज पदार्थ बनवते. शांतादुर्गा म्हणाली...बोलता बोलता तिने तोंडावरचा मास्क काढायला हात घातला एवढ्यात हॉटेलचा मॅनेजर बोलला. कृपया मास्क काढू नका. कोरोना रोगाचा धोका अजून गेला नाही. पण मी तर ऐकलंय की कोरोना रोग आता गेला म्हणून. कमी झाला म्हणून. सुहास बोलली. तुम्ही ऐकलंय ते ठीक ऐकलेय .पण तो आजार पूर्णपणे नष्ट झालेला नाही .कारण कोरोना रोगाचे जंतू अजूनही हवेमध्ये आहेत आणि ते ...Read More

2

मी सुंदर नाही - २

सुहासची आणि विजयची मैत्री होती. विजय तिच्या कॉलेजमधला मित्र होता. मनातून सुहास विजयवर मरायची. विजयला समजेल अशा अर्थाने तिने वेळा विजयशी वर्तन सुद्धा केले होते. मात्र विजय कडून तिला अजिबात प्रतिसाद मिळाला नव्हता. एकदा तर विजयने तिला सांगून टाकले सरळ-सरळ स्पष्टपणे. सुहास तुझ्या मनात माझ्याबद्दल काय आहे हे मला समजते. पण तु दिसायला अशी आहेस. त्यामुळे तू मला अजिबात पसंत नाहीस. हां आता आपली मैत्री आहे म्हणून मी तुझ्याशी बोलतो आहे. परंतु माझ्या मनात तुझ्याबद्दल काहीच भावना नाहीत. त्या दिवसापासून सुहासने विजयला प्रेम नजरेने पाहायचे सोडून दिले. ती त्याच्याशी निखळ मैत्री प्रमाणे त्या दिवसापासून त्याच्यासोबत वागू लागली. खरंतर तिला ...Read More

3

मी सुंदर नाही - ३

तसं पहायला गेलं तर सुहास दिसायला गोरीपान होती. तिच्या चेहऱ्यावर काळे पणाचा जराही मागमूस नव्हता. तिचे दात वेडेवाकडे बाहेर आलेले नसते.तर सुहास छान दिसली असती. सुहास तशी दिसत असल्यामुळे अनेकांनी तिचा गैरफायदा घेण्याचा प्रयत्न केला. अगदी ताजा प्रसंग सांगायचा तर... आठ दिवसापूर्वी रस्त्याने जाताना. एका माणसाने तिला समोरून धडक दिली. तिच्या गालाला अस्पष्ट स्पर्श केला. मात्र सुहास सावध होती. त्यामुळे पुढचा प्रसंग टळला होता. ती तशी दिसत असल्यामुळे त्याने तो प्रसंग केला होता. ती त्याला एकदमच वेंधळी वाटत होती. आपण असे केले तर ती काही करणार नाही असेही त्याला वाटत असावे. अशा अनेक प्रसंगाला सुहास सामोरी गेली होती. मात्र ...Read More

4

मी सुंदर नाही - ४

परिस्थितीमुळे अनेकांना मनाविरुद्ध वागावे लागते. अनेकांची अनेक स्वप्ने असतात. परंतु परिस्थिती ती पूर्ण करू देत नाही. सुहास बाबतीत तसेच काहीसे दिसत होते. तिला तिच्या जवळच्या मैत्रिणीने सुद्धा पाठ फिरवली होती. तिला फर्निचरवाली असे तिच्या मैत्रिणीम्हणायच्या. मला असं का म्हणतेस .तिने मैत्रिणीला विचारलं अगं तुझे दात पुढे आहेत ना. मग त्याला फर्निचर . असं म्हणतात. हे कुणी ठरवलं. त्याला कशाचा काही आधार आहे.नुसते दात पुढे आहे म्हणून फर्निचर कसं काय ते झालं.कोण कशाला ठरवेल. पण तसे म्हणतात. तसं म्हटलं की समोरच्याला कळतं की तो माणूस कशाबद्दल बोलतोय. म्हणजे ही एक प्रकारची चिडवाचिडवी झाली होय ना. होय अगदी तसंच ‌. पण काय ...Read More

5

मी सुंदर नाही - ५

सुहासला काय करावे कळत नव्हते. मात्र ती गोंधळली नव्हती किंवा स्वतःशीच त्रागा करत नव्हती. तीची मनस्थिती काबूत होती आणि एकदम शांत होती. सुहास कुरूप नव्हती. ती फार उद्धट सुद्धा नव्हती. मात्र ती तशी दिसते. त्याचे खापर लोक तिच्या जन्माला देतात. ही गोष्ट मात्र तिला खूपच खटकत होती. तिच्या मनात विचार येत होते. लोकं कशी असतात ना... अनेकांना दृष्टी नसते, ते दृष्टीहीन असतात .अनेक लोकं मुकी असतात. ते बोलू शकत नाहीत. एखादा बुटका असतो. तर कुणी एखादी उंच असते. उंच मुलीला जिराफ म्हणून चिडवलं जातं. कुणी जाड असेल, कोणी किरकोळ असेल, तर एखाद्या जाड्याला जाडा. किरकोळ मुलीला कडकी असं म्हणतात. ...Read More

6

मी सुंदर नाही - ६ - अंतिम भाग

सुहास स्वतःच्या दिसण्या बाबत उदासीन झाली होती. ती तिच्या सौंदर्या बद्दल फारच बेफिकीर झाली होती. तिच्या दातांमुळे तीचा उत्साह मावळून गेला होता. तिचे दात पिवळे पडू लागले होते. तिच्या दातावर रक्ताचे डाग सुद्धा दिसू लागले होते. सुहासला भीती निर्माण झाली की आपल्याला 'पायोरिया' नावाचा दातांचा आजार झाला तर नसावा. 'पायोरिया' नावाचा आजार हिरड्या आणि दात अगदी कमकुवत करतो आणि त्याच्यामध्ये पू निर्माण करतो. त्यामुळे तोंडाला दुर्गंधी येते.हिरड्या कमकुवत झाल्यामुळे दात सैल होऊन ते वेडेवाकडे दिसतात. तरीसुद्धा सुहास स्वतःचे दात दिवसातून तीन-चार वेळा घासत होती. तीच्या दातांनी तीचं हसं करून सोडले होते.तरीसुद्धा ती निराश झाली नव्हती. तिचे दात असे लाल-पिवळे ...Read More