२९ जून २०६१ – काळरात्र

(49)
  • 158.6k
  • 10
  • 64.5k

२९ जून २०६१, बुधवार. सूर्य सिंह राशीत होता आणि त्याच्याभोवती फिरणारे सर्व ग्रह एकाच रेषेत आले होते. दर बारा वर्षांनी येतात तसे. थोडक्यात काय तर त्या दिवशी सिंहस्थ कुंभमेळा होता. अजून एक मोठी चमत्कारिक गोष्ट त्या दिवशी घडणार होती. हॅलेचा धूमकेतू त्या दिवशी पृथ्वीवरून जाणार होता. ‘कुंभमेळा’ आणि ‘धूमकेतू’ हे एकाच दिवशी आल्याने लोकांमध्ये संभ्रमाचे वातावरण होते. कारण भारतीय संस्कृतीत कुंभमेळ्याला (शाहीस्नानाला) खूप परमपवित्र आणि महत्वाचं मानलं गेलं आहे. याउलट धूमकेतू दिसणं म्हणजे अपशकुनी मानलं गेलं आहे. खगोलशास्त्रीय बाबींचा अभ्यास करणार्‍या व्यक्तींसमोर मोठा पेच पडला होता. कारण या घटनेचा नेमका परिणाम काय होईल हे कुणीच सांगू शकत नव्हतं. अशी परिस्थिती पहिल्यांदाच उद्भवली होती त्यामुळे ‘नशीब’ या शब्दाला आता जास्त किंमत येणार होती. म्हणजे आगामी दिवसांत घडणार्‍या घटनांना प्रयत्नांऐवजी नशिबाचा जोर लागणार होता आणि चांगलं किंवा वाईट यांवर नशिबाचा शिक्का मारून लोकं मोकळं होणार होते. “नशीब”, एक सरळ आणि सुटसुटीत कारण.....असो,

Full Novel

1

२९ जून २०६१ - काळरात्र - 1

या पुस्तिकेतील लेखनाचे सर्व हक्क लेखकाकडे सुरक्षित असून पुस्तकाचे किंवा त्यातील अंशाचे पुनर्मुद्रण व नाट्य, चित्रपट किंवा इतर करण्यासाठी लेखकाची लेखी परवानगी घेणे आवश्यक आहे. तसे न केल्यास कायदेशीर कारवाई होऊ शकते. This declaration is as per the Copyright Act 1957 read with Sections 43 and 66 of the IT Act 2000. Copyright protection in India is available for any literary, dramatic, musical, sound recording, and artistic work. The Copyright Act 1957 provides for the registration of such works. Although an author’s copyright in a work is recognized even without registration. Infringement of copyright entitles the owner to remedies ...Read More

2

२९ जून २०६१ - काळरात्र - 2

सक्षम आणि शौनक एकाच कंपनीत कामाला होते. सक्षम आणि आर्याचं लव्ह मॅरेज असतं. सक्षमला आर्या त्यांच्या एका नातेवाईकांच्या लग्नात असते आणि तिथून त्यांची लव्हस्टोरी सुरू होते. मग बर्‍याच वेळा घरच्यांना समजवल्यावर यांच्या लग्नाला होकार मिळून ते आता सुखाने नांदत असतात. आर्या एक निष्णात फार्मसीस्ट होती. ती ‘वर्ल्ड फार्मा टूडे’ नावाच्या मॅगझीन मध्ये लिहायची. त्याचप्रमाणे तिचा ड्रग्जवर सुद्धा खूप मोठ्या प्रमाणात अभ्यास होता. सक्षम आणि आर्याचा कोरेगांव पार्कला एक छान बंगला होता. आजची पार्टी तिथेच होती. “मृगजळ”मध्ये. हंसीका येण्याआधी तिथे नीलिमा आणि अनि पोहोचले होते. अनिचा रियल इस्टेटचा बिझनेस होता. त्याचा बिझनेस असल्यामुळे वेळेच्या बाबतीत तो अगदी फ्लेक्सिबल होता. ...Read More

3

२९ जून २०६१ - काळरात्र - 3

“ओह, अरे मी तुला सांगायला विसरले. चल.” असं म्हणत हंसीका शौनकला हॉलमध्ये घेऊन आली आणि तिचा फोन शौनकच्या हातात “ओह शिट, कसं झालं?” सक्षम म्हणाला. हंसीका बोलण्यासाठी तोंड उघडणार इतक्यात परत एकदा दारावरील बेल वाजली. नीलिमाने दार उघडलं. सारंग आणि रचना आले होते. ते दोघं घरात आले आणि सर्वांच्या चेहर्‍यावर एक समाधानाची झलक पसरली. निलीमाने भिंतीवरील घड्याळाकडे बघितले आणि म्हणाली, “साडेदहा, ओह माय गॉड साडेदहा..... सहा वाजता भेटणारे आठ लोकं साडेदहा वाजता भेटताहेत. चला आता लवकर करा.” “येस, चला आता. सर्वजण आले. जेवताना बोलूयात.” असं म्हणत आर्याने नीलिमाला दुजोरा दिला आणि ती किचनकडे वळली. ...Read More

4

२९ जून २०६१ - काळरात्र - 4

“तुला ही माहिती कुठून मिळाली?” हंसीकाने अनिला विचारलं. “माझ्या भावाने सांगितलं. तो केंब्रिज मधल्या ‘एमआयटी’ मध्ये क्वांटम फिजिक्सचा प्रोफेसर आहे.” अनिने सांगितलं. आता सर्वांच्या नजरा अनिनकडे वळल्या होत्या. टेबलवर ठेवलेला वाईनचा ग्लास हातात घेत अनि म्हणाला, “काहीही अकल्पित किंवा विचित्र घडल्यास त्याने मला कॉन्टॅक्ट करायला लावला आहे आणि सर्वांसाठी एक महत्वाची बातमी त्याने सांगितलं आहे, जी हंसीकाने आपल्याला सांगितली नाही, की या वेळी जो धूमकेतू पृथ्वीवरून पास होणार आहे, त्याचा केंद्रबिंदू हा पुणे आणि आजूबाजूचा परिसर आहे. एम आय राइट हंसीका?” “येस, ऑफकोर्स. मला तुमचा मूड खराब नव्हता करायचा. म्हणून मी काही बोलले नाही.” हंसीका मान डोलवत ...Read More

5

२९ जून २०६१ - काळरात्र - 5

सक्षमच्या हातात एक बॉक्स होता. चावीने बंद केलेला बॉक्स होता तो. अनि खूप संतापलेला वाटत होता. त्याच्या कपाळावर जखम होती आणि त्यातून रक्त येत होतं. सक्षमच्या हातातला बॉक्स बघून तो त्याच्या अंगावर धावून गेला आणि संतापात ओरडला, “तुला कुणी शहाणपणा करायला सांगितला होता? का उचललास तो बॉक्स?” सारंग आणि शौनक त्याला मागे ओढत शांत बसवू लागले. अनि असा अचानक अंगावर धावून आल्यामुळे सक्षम घाबरुन अक्षरशः खाली कोसळला होता. रचनाने त्याला उठवण्यात मदत केली. अनिचा असा रुद्रवतार बघून सर्वजण घाबरून गेले होते. शौनक अनिला एका बाजूला घेऊन गेला आणि तिकडे काय पहिलं? असं विचारलं. अनि काहीच बोलायला ...Read More

6

२९ जून २०६१ - काळरात्र - 6

अनिच्या ग्लास मधली वाईन संपली. त्याची अजून वाईन घेणायची इच्छा होती. पण काहीतरी आठवल्यासारखा तो हॉलमध्ये आला आणि हंसीकाच्या खुर्चीवर बसला. हंसीकाच्या समोर असलेल्या नोटबूक मधून त्याने शेवटचं पान फाडलं आणि काळ्या मर्करने काहीतरी लिहू लागला. तो इतक्या घाईत हॉलमध्ये का आला हे बघण्यासाठी सर्वजण त्याच्या मागोमाग आले. तो काहीतरी लिहितोय असं बघून आर्या म्हणाली, “अनि, तू काय करतोयस हे?” आपली नजर कागदावरच स्थिर करत अनि म्हणाला, “मला तिथं जायला हवं. ज्या अर्थी तिथं लाइट आहे, त्याअर्थी तिथे फोनला नेटवर्क असेल किंवा इंटरनेट कनेक्शन तरी असेल. मी त्यांच्या साठी एक नोट लिहितोय आणि ही नोट मी त्या घराच्या ...Read More

7

२९ जून २०६१ - काळरात्र - 7

सर्वजण सुन्न होऊन हंसीकाचं बोलणं ऐकत होते. तिने सर्वांच्या चेहर्‍याकडे बघितलं. त्यांची अजून ऐकण्याची उत्सुकता चेहर्‍यावर खूप मोठ्या प्रमाणात होती. हंसीका म्हणाली, “मला माहिती असलेल्या पैकी हे शेवटचं, काकभुशुंडी यांनी अकरा वेळा रामायण आणि सोळा वेळा महाभारत वेगवेगळ्या काळात ऐकलं आणि आश्चर्याची गोष्ट म्हणजे सर्व रामायण आणि महाभारत कथांचा शेवट एकमेकांपेक्षा पुर्णपणे वेगळा होता.” तिचं हे बोलणं ऐकताच आर्या आणि सारंग डोक्याला हात लावून बसले. कुणाला काहीच कळत नव्हतं. अनिने हंसीकाला विचारलं, “आता यावर काय उपाय? हे आपल्यासोबत का घडतंय? याची तुला काही कल्पना आहे का?” हंसीका म्हणाली, “नाही. पण मी अंदाज लावू शकते. आज आपल्या आकाशगंगेतले ...Read More

8

२९ जून २०६१ - काळरात्र - 8

“ह्या कागदावर माझ्या भावाच्या नोट्स आहेत. ज्या तो लेक्चरसाठी म्हणून काढून ठेवतो. यात त्याने डिकोहेरन्स आणि श्च्रोडिंगर्स कॅट बद्दल लिहिली आहे. तुम्हाला श्च्रोडिंगर्स कॅट बद्दल काही माहिती आहे का? जाऊ द्या, मीच सांगतो. बेसिकली तो एक थॉट एक्सपरिमेंट आहे. एका बॉक्स मध्ये एक मंजर ठेवलेली असते आणि तिच्या जगण्याची आणि मारण्याची शक्यता ही पन्नास – पन्नास टक्के असते. कारण त्या बॉक्समध्ये रेडियो अॅक्टिव्ह पदार्थ ठेवलेले असतात. या गोष्टीवर रेग्युयलर फिजिक्स असं म्हणतं की बॉक्समधली मंजर एकतर जगेल किंवा मरेल पण क्वंटम फिजिक्सच्या नियमानुसार असं नसतं. मांजराच्या जगण्याची किंवा मरण्याची शक्यता या दोन्ही गोष्टी एकाचवेळी अस्तीत्वात असतात. पण जेव्हा तुम्ही ...Read More

9

२९ जून २०६१ - काळरात्र - 9

“वेल, ते जर आपण असू तर ती चांगली गोष्ट नाही का? तो मला आपल्यापर्यंत पोहोचण्याचा एक रस्ता वाटतो. आपण म्हणत असतो की आपण आपल्या स्वतःशी बोलायला हवं. आपण स्वतःला आपल्यात शोधायला हवं आणि इथेतर आपल्याला एक आयती संधी चालून आली आहे, जिच्यात आपण आपल्या स्वतःला खरोखरच फिजिकली, मेंटली पाहू शकतो आणि जाणून घेऊ शकतो. देवा..... काय हे?” हंसीका उद्विग्नतेने म्हणाली. सक्षमने निलीमाला उठवलं आणि हॉलमध्ये घेऊन आला. तिला डायनिंग टेबलच्या एका खुर्चीवर बसवत म्हणाला, “एंजॉय यॉर पार्टी नीलिमा...” ती थॅंक्स म्हणत बसली आणि सर्वांच्या चिंताग्रस्त चेहर्‍याकडे बघू लागली. तिला त्यांच्या चेहर्‍यावर आधीसारखा उत्साह दिसत नव्हता. तोच तिचं ...Read More

10

२९ जून २०६१ - काळरात्र - 10

दुसर्‍या रियालिटीमध्ये पोहोचलेली फक्त हंसीकाच नव्हती. तिच्यासोबत सारंग, शौनक आणि रचनासुद्धा होते. कारण जेव्हा ते निळ्या ग्लोस्टिक्स घेऊन बाहेर होते तेव्हा सरांगला अनिचं घर दिसलं होतं आणि तिथून बाहेर आल्यावर लाल ग्लोस्टिक्स असलेले तेच त्यांना रस्त्याच्या पलीकडे दिसले होते. हे जेव्हा जिवाच्या आकांताने पळत आले तेव्हा परत एकदा त्या भयाण काळोखातून पास झाले होते आणि जेव्हा ते घरी आले तेव्हा हे घर दुसर्‍या रियालिटी मधलं होतं. शौनक, आर्या, नीलिमा, हंसीका आणि रचना हे किचनमध्ये होते. सारंग ब्लॅकमेलिंग नोट पाठवायला म्हणून दुसर्‍या घरात गेला होता. सर्वांना असं गुंतलेलं बघून अनि आणि सक्षम हळूच हॉलमध्ये येतात. अनि किचन आणि हॉलच्या ...Read More

11

२९ जून २०६१ - काळरात्र - 11

“तुझं बोलणं तसंच आहे. अगदी तसंच. कॉलेजमधल्या दिवसांतल. काहीच बदल झाला नाही तुझ्यात.” रचना परत शौनकच्या जवळ जात म्हणाली. “अच्छा, काय करणार आता?” शौनक निर्विकारपणे म्हणाला. शौनक आणि रचनाचं हे बोलणं किचनच्या एका कोपर्‍यातून आर्या ऐकत होती. रचना शौनकला मिठी मारण्याचा प्रयत्न करणार तोच अचानक आर्या किचन मधून हॉलमध्ये जाण्यासाठी निघाली आणि तिला बघून शौनक म्हणाला, “रचना प्लीज, यू आर क्रॉसिंग यॉर लिमिट्स....” रचना दूर झाली आणि किचनकडे जाण्यासाठी निघाली. आर्या हॉलमध्ये आली आणि हंसीका समोर बसली. तोपर्यंत आर्याने मैत्रिणीचं कर्तव्य म्हणून हंसीकाला शौनक आणि रचनाच्या गोष्टी सांगितल्या. रचना हॉलमध्ये आली आणि आर्याच्या बाजूला बसली. ...Read More

12

२९ जून २०६१ - काळरात्र - 12

तिने घाबरून शौनकची मिठी सोडली आणि त्याच्याकडे एकदम भेदरलेल्या नजरेने बघू लागली. त्याच्या चेहर्‍यावर प्रश्नार्थक भाव तसेच होते. हंसीका काय बडबडतेय असं त्याला वाटत होतं. हंसीका घाबरत उच्चारली, “तू... तुझ्याकडे असलेली ग्लोस्टिक दाखव.” त्याने खिशातून त्याची हिरव्या रंगाची ग्लोस्टिक काढली आणि हंसीका समोर धरली. ती ग्लोस्टिक बघून हंसीका खूप घाबरली. तिचे पाय लटलटू लागले. तिच्या तोंडातून शब्द फुटत नव्हते. तिला कळून चुकलं की ती जेव्हा गाडीकडे आली तेव्हा ज्या काळोखातून म्हणजे डार्क झोन मधून आली होती, तो समांतर विश्वात जाण्याचा रस्ता होता आणि जेव्हा जेव्हा त्यांच्यातलं कुणीही म्हणत होतं की ते एका काळोखातून गेले तोच हा समांतर विश्वात ...Read More

13

२९ जून २०६१ - काळरात्र - 13

“म्हणजे आपल्याला ते कुठेतरी लिहून ठेवावे लागतील असंच ना? कुठे लिहायचं? आपण एखाद्या कागदावर नावाखाली आपल्याला पडलेला फसा लिहून एखाद्या एन्व्होलोपमध्ये ठेवूयात.” रचना म्हणाली. “हो आपण तसंच करुयात. आपण एका बॉक्स मध्ये ठेऊ.” रचना म्हणाली. “सेम, एझॅक्टली.... त्यांनीपण असंच केलं होतं.” हंसीका हताशपणे फास्यांकडे बघत म्हणाली. “म्हणजे ते आपल्यापेक्षा पुढे आहेत तर.” शौनक म्हणला. “होय, त्यांनी बॉक्समध्ये काहीतरी युनिक वस्तु ठेवली होती. आपणसुद्धा तसंच करुयात.” रचना म्हणाली. “जर आपण काहीतरी वेगळं करत असू तर ते सुद्धा काहीतरी वेगळं करत असतील. हा... हा... हा...” असं म्हणून सारंग जोरजोरात हसायला लागला. ...Read More

14

२९ जून २०६१ - काळरात्र - 14

“अजून ऐक, अनि आणि सक्षम हे तिसर्‍या विश्वातले आहेत. त्याने आताच तुझा फोटो काढला. त्याचा फोन खराब नाहीये. तुला असेल आपण डिनर सुरू करतानाच त्याच्या फोनच्या स्क्रीनला प्रॉब्लेम झाला होता आणि फोन बंद झाला होता.” सारंगने हातातला वाईन ग्लास खाली ठेवला आणि गंभीर मुद्रेने हंसीकाकडे बघू लागला. “तुला तो काळोख म्हणजे डार्क एरिया आठवतोय का? ज्याच्यातून आपण पास झालो होतो, मला असं जाणवलं की त्या एरियामधून जो कुणीही पास झाला तो वेगळ्याच विश्वात पोहोचला आणि जो त्या काळोखातून पास झाला तो त्याच्या मूळ विश्वात कधीही परत जाऊ शकत नाही आणि मला असं वाटतं की आपण धूमकेतू ...Read More

15

२९ जून २०६१ - काळरात्र - 15

पाण्याचा भरलेला तो ग्लास हातात घेत सारंग खिन्नपणे हसतच हंसीकाला म्हणाला, “तुला माहितीये का? मी माझ्यासाठी काही चॉइस बनवल्या ज्यांच्यासोबत मी आता इथे अडकलोय. बघ, आता मी... मी ह्या चॉइस सोबत इथे अडकलोय. मी त्या मेलेल्या मांजरासारखा आहे. बरोबर ना? ही संपूर्ण रात्र आपण चिंता करतोय. आता मी इथे ह्या विश्वात अडकलोय आणि माझ्यासोबत तूसुद्धा. हे दुसर्‍या विश्वातले आपलेच लोकं बघ कसं वागताय? आपलं एक डार्क व्हर्जन असतं असं आपण म्हणतो आणि हे बघ....” त्याचं बोलणं सुरू असतानाच त्या दोघांना किचनमधून जोरजोरात आवाज यायला लागले. अनि निलीमाला मारत होता बहुतेक. तिच्या रडण्याचा आणि किंचाळण्याचा जोरात आवाज येत होता ...Read More

16

२९ जून २०६१ - काळरात्र - 16

असाच विचार करत असताना तिचं लक्ष आकाशाकडे गेलं. तिकडे पश्चिम क्षितिजाकडून एक प्रकाश येत होता. तो हळूहळू पूर्व क्षितिजाकडे होता, हाच तो हॅलेचा धूमकेतू होता. आता त्याची परत जाण्याची वेळ होती आणि महत्वाचं म्हणजे आता ज्या विश्वात जो कुणी असेल तो आयुष्यभरासाठी तिथेच अडकून राहणार होता. कारण यानंतर परत हॅलेचा धूमकेतू तब्बल ७५ वर्षानी फेरी मारणार होता. म्हणजे इसवी सन २१३६ मध्ये. तोपर्यंत या आठ जणांपैकी कुणीही जीवंत असण्याची शक्यता अगदीच नगण्य होती. हंसीका शुष्क आणि निर्विकार डोळ्यांनी त्या हॅलेचा धूमकेतूकडे बघत होती. हंसीकाने हॅलेचा धूमकेतू बघितला आणि जोरात धावायला सुरूवात केली. ती एकामागून एक विश्व पार करू ...Read More

17

२९ जून २०६१ - काळरात्र - 17 - अंतिम भाग

उपसंहार हा संसार आहे आणि प्रत्येक आणूत माझे अस्तित्व आहे, हे भगवान श्री कृष्णांनी अर्जुनाला सांगितलं आहे. अनंत ब्रह्मांडात एकाच वेळी उत्पत्ति, स्थिति आणि लय करण्याचा माझा रोजचा दिनक्रम असतो. असं देखील भगवान विष्णुंनी म्हटलं आहे. त्याच धर्तीवर ही कहाणी... कुणाचाही काहीही दोष नसताना केवळ नशीब म्हणून नशीब न मानणार्‍या लोकांसोबत नशिबाने किंवा काळाने खेळलेला हा खेळ... या खेळाचा निकाल मात्र नियंत्याच्या हातात. भाषण, लेख व नाटकादी साहित्यकृती यांच्या अखेरीस असलेला समारोपाचा मजकूर म्हणजे उपसंहार. नीतिपर कथेचे तात्पर्यवजा सार, नाटकाच्या शेवटी येणारे भरतवाक्य व तत्सदृश भाषण अशा विविध प्रकारांत उपसंहार आढळतो. तर ह्या उपसंहारची गरज होती आणि ...Read More