राज - का - रण

(3)
  • 20.4k
  • 0
  • 6.2k

दारावे रायगड जिल्ह्यातील खाडी पट्यातील एक खेडेगाव, समुद्राच्या खाडीच्या किनारी असणाऱ्या गावांना खाडी पट्यातील गावे असे कोकणात म्हटले जाते,तीनशे-साडेतीनशे उंबरठ्याचे हे गाव, शेती आणि काहीसा समुद्र किनारा असल्याने मासेमारी हे इतकेच उदरनिर्वाहाचे साधन त्यामुळे बरेचसे लोक गाव सोडून मुंबईसारख्या शहरात तर कोणी तालुक्यात नोकरी-धंद्यानिमित्त स्थायिक झालेले. याच गावात गणपत नाचणे हा रहिवासी आपली वृद्ध आई, पत्नी आणि दोन मुले यांच्यासह राहत असे, लहान भाऊ सदानंद कुटुंबासह मुंबईत स्थायिक झालेला. गणपतचे शिक्षण नसल्याने त्याने गावी राहून कुटुंबाचे पालन पोषण करण्याचा पर्याय निवडलेला, कुटुंबाचे भागेल इतकी शेती आणि आठवडी बाजारात तालुक्याला सुकी मच्छी विकण्याचे काम करायचा.

Full Novel

1

राज - का - रण (खाडी पट्टयातील ढाण्या वाघ) भाग १

दारावे रायगड जिल्ह्यातील खाडी पट्यातील एक खेडेगाव, समुद्राच्या खाडीच्या किनारी असणाऱ्या गावांना खाडी पट्यातील गावे असे कोकणात म्हटले जाते,तीनशे-साडेतीनशे हे गाव, शेती आणि काहीसा समुद्र किनारा असल्याने मासेमारी हे इतकेच उदरनिर्वाहाचे साधन त्यामुळे बरेचसे लोक गाव सोडून मुंबईसारख्या शहरात तर कोणी तालुक्यात नोकरी-धंद्यानिमित्त स्थायिक झालेले. याच गावात गणपत नाचणे हा रहिवासी आपली वृद्ध आई, पत्नी आणि दोन मुले यांच्यासह राहत असे, लहान भाऊ सदानंद कुटुंबासह मुंबईत स्थायिक झालेला. गणपतचे शिक्षण नसल्याने त्याने गावी राहून कुटुंबाचे पालन पोषण करण्याचा पर्याय निवडलेला, कुटुंबाचे भागेल इतकी शेती आणि आठवडी बाजारात तालुक्याला सुकी मच्छी विकण्याचे काम करायचा. मोठा मुलगा रम्या(खरे नाव रमेश ...Read More

2

राज-का-रण (खाडी पट्टयातील ढाण्या वाघ) भाग-२

रम्या सिनियर कॉलेजच्या दुसऱ्या वर्षाला असताना विधानसभेची निवडणूक येऊन ठेपली, झेंडे साहेबांनी पक्षाचे पदाधिकारी आणि प्रमुख कार्यकर्त्यांच्या सभेला त्याला सभेत निवडणूक प्रचाराच्या कार्यक्रमसंबंधी चर्चा झाली खाडी पट्यात खूप कायकर्ते होते पण धडाडीने काम करणारा असा कोणी नव्हता तसा आमदार साहेब आणि तालुका प्रमुखांचे तिथे वर्चस्व होते पण गाफील राहून चालणार नव्हते कारण भाऊसाहेब विरुद्ध पक्षात गेल्यामुळे तिकडे गडबड करण्याची शक्यता होती. सभेत सगळ्यांना आश्चर्यचकित करणारी घोषणा तालुका प्रमुख राजे साहेबांनी केली " झेंडे साहेब आणि मी मिळून एक निर्णय घेतलाय, खाडी पट्यात विशेष कार्यशील कार्यकर्ता सध्या तरी जुन्यापैकी नाही म्हणून तरुण कार्यकर्त्याला संधी म्हणून रमेश नाचणे याला निवडणूक प्रचार ...Read More