अनु लगबगीने मुख्य रस्ता ओलांडून रिक्षा स्टॉप पाशी पोहोचली. संध्याकाळची वेळ असल्यामुळे वातावरणात सुद्धा तितकीच लगबग जाणवत होती. सूर्यास्ताची वेळ जवळ आल्याने पक्षी आपापल्या घरट्यांकडे परतण्यास उत्सुक होते; अगदी त्याचप्रमाणे शाळेतून घरी परतणारी मुले, दिवसभर ऑफिसमध्ये कामाच्या ओझ्याखाली दबून गेलेली सर्वजण सुद्धा आपापल्या घराकडे तितक्याच लगबगीने परतत होते. कोणी बस तर कोणी गाडी असे करत मार्गक्रमण करत होते. परंतु अनुला मात्र घरी परतण्याची घाई अजिबात नव्हती. उलट तीच घरातून लगबगीने बाहेर पडली होती आणि तिला वेळ अजिबात दवडायचा नव्हता. त्यामुळे तिने रिक्षेला प्राधान्य देत ती इथे आली होती. “सहारा हॉस्पिटल कडे घ्या” असे रिक्षेवल्याला बसता क्षणी तिने सांगितले. तिची लगबग आणि हॉस्पिटल असे ऐकताच रिक्षावाल्याने सुद्धा तितक्याच लगबगीने रिक्षा चालू करून रस्त्यावरच्या रहदारीत घातली.

Full Novel

1

नभांतर : भाग - १

भाग - १ संध्याकाळी साधारण 5 ची वेळ... अनु लगबगीने मुख्य रस्ता ओलांडून रिक्षा स्टॉप पाशी पोहोचली. वेळ असल्यामुळे वातावरणात सुद्धा तितकीच लगबग जाणवत होती. सूर्यास्ताची वेळ जवळ आल्याने पक्षी आपापल्या घरट्यांकडे परतण्यास उत्सुक होते; अगदी त्याचप्रमाणे शाळेतून घरी परतणारी मुले, दिवसभर ऑफिसमध्ये कामाच्या ओझ्याखाली दबून गेलेली सर्वजण सुद्धा आपापल्या घराकडे तितक्याच लगबगीने परतत होते. कोणी बस तर कोणी गाडी असे करत मार्गक्रमण करत होते. परंतु अनुला मात्र घरी परतण्याची घाई अजिबात नव्हती. उलट तीच घरातून लगबगीने बाहेर पडली होती आणि तिला वेळ अजिबात दवडायचा नव्हता. त्यामुळे तिने रिक्षेला प्राधान्य देत ती इथे आली होती. “सहारा हॉस्पिटल कडे ...Read More

2

नभांतर : भाग - २

भाग - २ प्रत्येक माणसाच्या आयुष्यात त्याला २ प्रश्न नक्की पडलेले असतात, “माझा जन्म कशासाठी झाला ?” “माझा मृत्यू केंव्हा होईल ?” पहिल्या प्रश्नाचे उत्तर शोधण हे आपल्याला गरजेच वाटत नसत. दुसऱ्या प्रश्नाच उत्तर शोधण्यासंदर्भात आपण काहीच विचार करत नाही. परंतु जीवनातील त्या एका क्षणाला आकाश ला त्याची उत्तर शोधण गरजेच बनल; कारण जीवन आणि मृत्यू याच्या संघर्षामध्ये त्याचे काउंट डाऊन सुरु झाले होते. त्याच्याकडे आता दोनच पर्याय होते एक म्हणजे शेवटच्या श्वासापर्यंत मृत्यूशी लढा देणे आणि दुसरा हसत हसत मृत्यूला सामोरा जाणे अगदी निर्भयी कर्णाप्रमाणे. त्याला कुणाला तरी दिलेले वचन पाळायचे होते. त्याच्या हातात खूपच कमी वेळ ...Read More

3

नभांतर : भाग - ३

भाग – ३ दुसऱ्या दिवशी चहा पिताना सर्वांची गप्पांची मैफिल रंगली. कुणालाही कसलीही गडबड नव्हती त्यामुळे सगळे निवांत बसले होते. थोडेच पाहुणे उरले होते मात्र तरीसुद्धा गप्पांना ऊत येत होता. सर्वांच्या चर्चेचे एकच केंद्र होते ते म्हणजे हे लग्नकार्य ! “अगदी आदर्श म्हणाव इतक छान झाल ! ना वारेमाप पैसा खर्च केला, ना अन्नाची नासाडी केली. पण भाऊजी तुम्हाला सुचल तरी कसं हो एवढ परफेक्ट ?” तसे आकाशचे बाबा म्हणाले, “ह्या मागच सगळ डोक याचच आहे !” आकाश कडे हात दाखवत ते म्हणाले. “व्वा ! पोरग भारी हुशार निघाल तुमचं !” असे कौतुकाचे बोल कानी आले. “मग कालची ...Read More

4

नभांतर : भाग - ४

भाग – ४ सहा सात वर्षापूर्वी....... असाच तो गॅलरी मध्ये एकटाच बसला होता. तसा तो असायचा. पण आज त्याला एकटेपणाची जाणीव होत होती. झालेले प्रसंग एखाद्या चित्रपटाप्रमाणे त्याच्या डोळ्यासमोरून जात होते आणि विशेषकरून त्यातील मन दुखवणारे प्रसंग तर हल्लीच्या मालिकांमध्ये जसे एका विशिष्ट प्रसंगी एकच शॉट ३ – ४ वेळा कॅमेराचा अँगल बदलून दाखवतात त्याप्रमाणे “ते” विशिष्ट प्रसंग २ – ३ वेळा त्याच मन त्याला दाखवत होत. तो खूप प्रयत्न करत होता हे सर्व विसरण्याच पण.. हा पण जिकडे येतो ना तिकडे सगळ पणाला लावायला लावतो.. पण त्याला ते विसरता येण अशक्य होतं. सानिका पुन्हा असं वागेल ...Read More

5

नभांतर : भाग - ५

भाग – ५ प्रत्यक्ष बोलून तोडगा काढलेला बरा म्हणून त्याने “मला महत्वाच बोलायचं आहे तुझ्याशी, उद्या कॉलेज थांब लगेच जाऊ नकोस.” असा मेसेज पाठवला... डिटेकटिव्ह सिनेमे आणि मालिका बघून, तशी पुस्तके वाचून तयार झालेलं याच गुप्तहेर डोक यातील खोच शोधात होता.. नेमक काय झाल आहे हे शोध घेण्याचा प्रयत्न करत होता आणि हे केवळ सानिकाच सांगू शकत होती आणि म्हणून तिच्या उत्तराची वाट बघत बसला..... थोड्या वेळाने मेसेज आल्याची रिंग वाजली. आकाश च लक्ष नव्हत सुरवातीला तो त्याच्याच तंद्रीत होता, मग अचानक त्याला मेसेज आल्याचे कळले तसा तो पटकन उठला आणि चार्गिंग ला लावलेला मोबाईल घेण्यासाठी धावला, ...Read More

6

नभांतर : भाग - 6

भाग – ६ ----------------********---------------- “अहो, कॉफी घेणार का ? मी मला करणार आहे” .. सानिका त्याला विचारात पण त्याचे लक्ष नव्हते. “काय हो, कसल्या विचारात आहे एवढ्या...” सानिकाने त्याला परत हटकले तसा तो “अम्म, काय म्हणालीस का ?” असे म्हणत आकाश भानावर आला. “मी म्हणाल कॉफी घेतोस का ? मला करणारच आहे.” सानिकाने त्याला पुन्हा विचारले. “हो हो कर, मी तुला सांगणारच होतो.” आकाश तिला म्हणाला. तशी ती गोड हसून आत कॉफी करण्यासाठी निघून गेली. आकाश तिचे हसणे डोळ्यात साठवून घेत होता.. ----------------********---------------- कितीही नाही म्हटल तरी आकाश ला सनिकाची आठवण येतच होती. त्या दिवशी सुध्दा तो आपल्या ...Read More

7

नभांतर : भाग - 7

भाग – 7 पल्लवीच्या बोलण्याचा आकाश विचार करत होता आपल्याच तंद्रीत हरवून. पल्लवी त्याला म्हणाली, “कॉफी घे होतेय बघ...” ----------------********---------------- “अरे ऐकतोयस ना... कॉफी घे ना गार होतेय.” सानिका त्याला त्याच्या विचारांमधून बाहेर काढत म्हणाली. “हो हो घेतो..” अस म्हणत आकाश ने कॉफीचा मग उचलला. कॉफीचा एक घोट त्याने घेतला... “व्वा, १ नं. उत्कृष्ट... सानिका, तुझ्या हातच्या कॉफीला अजूनही तीच चव आहे !” आकाश तिला म्हणाला. यावर “My Pleasure ! नशीब असल तरच मिळते हो अशी कॉफी !” सानिका त्याला टोमणा मारत म्हणाली. “खरय तुझ ! नशीब ! केवळ आणि केवळ नशीब आहे म्हणून तू मिळालीस मला आणि ...Read More

8

नभांतर : भाग - 8

भाग – 8 आज सानिकाचा हात हातात घट्ट धरून आकाश आणि सानिका एकमेकांच्या जवळ बसले होते. सानिकाने तर आकाशच्या डोळ्यात पाणी आले होते. “रडतोयस का ?” सानिकाने त्याला विचारले. “काही नाही ग असच...” त्याने विषय टाळण्याचा प्रयत्न केला. “मला माहितीय तू का रडतोयस ते, तू त्या जुन्या आठवणींमध्येच रमला आहेस ना ? किती वेळा सांगितलंय तुला कि ते वाईट प्रसंग परत परत नको आठवूस म्हणून.. आता आहे ना आपण एकत्र.” आकाश ला आश्चर्य वाटले कि तिला कसं काय कळाल असेल मनातल. “मला एक प्रॉमिस कर कि, इथून पुढे कोणताही प्रसंग घडला तर मनात कसलेही विचार येण्यापूर्वी तू माझ्याशी ...Read More

9

नभांतर : भाग - 9

भाग – 9 अनु व आई बाबा गेल्यानंतर सानिका तिथेच बाहेर बसली होती. तिच्या मनात विचारांचे मंथन होते - कशा काही क्षुल्लक गोष्टींमुळे - कारणांमुळे इतके छान नाते तुटले, इतक्या वर्षांची मैत्री तुटली. का ? तर निव्वळ गैरसमजातून ? गैरसमज ! हं, कोणतेही नाते टिकवण्यासाठी त्यातील विश्वास महत्वाचा असतो तरच ते नाते मजबूत राहते परंतु गैरसमजामुळे मनात थोडी जरी शंका आली तरी ते नाते कोलमडायला सुरुवात होते आणि शेवटी तिथेच ते संपते. परंतु आमच्या बाबतीत बघायचे झाले तर नाते घट्ट होते फक्त थोडासा विश्वास कमी पडला होता त्याचाच कोणीतरी फायदा घेऊन आम्हाला असे जाणून बुजून वेगळे केले. पण ...Read More

10

नभांतर : भाग - १० (अंतिम)

भाग – 10 दुसऱ्या दिवशी ठरवल्याप्रमाणे प्रमाणे अनु आली ! सोबत मंदार सुद्धा होता. ते दोघेही एकमेकांबरोबर छान दिसत होते. अर्थातच अनु आणि आकाश च्या आनंदाला पारावर राहिला नव्हता ! जरी आकाश बरा झाला होता तरी तो झोपूनच त्याच्याशी बोलत होता. इतक्या वर्षांनी सर्वांच्या मनातील मळभ दूर झाली होती. सर्वांची माने स्वच्छ झाली होती. आता उरले होते ते फक्त निखळ मैत्रीचे नाते ! तो संपूर्ण दिवस आकाश - अनु - सानिका एकमेकांसोबत खूप बोलत होते, कोणालाच वेळेचे - खाण्यापिण्याचे कशाचेच भान राहिले नव्हते. शेवटी रात्र होत आली तसे अनु व मंदार जायला निघाले. आकाश ने सर्वाना येणाऱ्या १५ ...Read More