नको चंद्र तारे, फुलांचे पसारे....

(30)
  • 42
  • 10
  • 51k

नको चंद्र तारे, फुलांचे पसारे.... (1) तालुक्याला सोपानचे आरशे विकायचे दुकान होते. धंदा जोरात चालू होता. हाताखाली दोन तीन कामगार होते. तरीही स्वतः सोपान काम करायचा. त्याला ते आवडायचं. वेगवेगळ्या आकाराचे, नक्षीदार आरशे बनवायचा. चौकोनी, त्रिकोणी, पंचकोनी, गोलाकार, अंडगोलाकृती, कापणीच्या आकाराचे असे विविध प्रकारचे आरशे त्याच्या दुकानात होते. शिवाय, ग्राहकांच्या इच्छेप्रमाणे तो हवे तसे आरशे तो त्यांना बनवून देई. त्याच्याकडे शहरातून आरशाच्या काचा यायच्या. तसेच, जुने विकलेले आणि भंगारातून मिळालेले. काहीशे तुटलेले पण चांगल्या स्थितीतले आरशे तो व्यवस्थित कापून त्यांना वापरण्यायोग्य बनवायचा. दर दोन तीन महिन्यात जुन्या समानांचा ट्रक येत असे. त्यातून वापरण्यायोग्य समान सोपान घेत असे. एकदा एका टेम्पो मधून

Full Novel

1

नको चंद्र तारे, फुलांचे पसारे.... - 1

नको चंद्र तारे, फुलांचे पसारे.... (1) तालुक्याला सोपानचे आरशे विकायचे दुकान होते. धंदा जोरात चालू होता. हाताखाली दोन तीन होते. तरीही स्वतः सोपान काम करायचा. त्याला ते आवडायचं. वेगवेगळ्या आकाराचे, नक्षीदार आरशे बनवायचा. चौकोनी, त्रिकोणी, पंचकोनी, गोलाकार, अंडगोलाकृती, कापणीच्या आकाराचे असे विविध प्रकारचे आरशे त्याच्या दुकानात होते. शिवाय, ग्राहकांच्या इच्छेप्रमाणे तो हवे तसे आरशे तो त्यांना बनवून देई. त्याच्याकडे शहरातून आरशाच्या काचा यायच्या. तसेच, जुने विकलेले आणि भंगारातून मिळालेले. काहीशे तुटलेले पण चांगल्या स्थितीतले आरशे तो व्यवस्थित कापून त्यांना वापरण्यायोग्य बनवायचा. दर दोन तीन महिन्यात जुन्या समानांचा ट्रक येत असे. त्यातून वापरण्यायोग्य समान सोपान घेत असे. एकदा एका टेम्पो मधून ...Read More

2

नको चंद्र तारे, फुलांचे पसारे.... - 2

नको चंद्र तारे, फुलांचे पसारे.... (2) चार पाच दिवस सोपान दुसऱ्या कामात व्यस्त होता, त्यामुळे त्याला बबनरावांच्या कामाला हात वेळ मिळाला नाही. मात्र, जेव्हा त्यांचा फोन आला तेव्हा सोपानला ते काम हाती घ्यावंच लागलं. सोपानने दोन तीन दिवस मेहनत करून अगदी हुबेहुन तसाच दिसणारा आरसा बनवला. बाकीचे कामगारही वाह वाह करू लागले. आज बबनरावांना फोन करून आरसा पाठवून देतो म्हणून सोपान सांगणार होता. कामगार आरसा ठेवण्यासाठी लाकडी फळ्यांचं एक पॅकिंग बनवत होते. बॉक्स बनवून झाल्यावर सोपानने तो व्यवस्थित असल्याची खात्री केली आणि आरसा आतमध्ये ठेवायला सांगितलं. बॉक्स मध्ये आरसा ठेवला गेला. फोन करण्यासाठी तो आपल्या काउंटरकडे जाऊ लागला, तोच ...Read More

3

नको चंद्र तारे, फुलांचे पसारे.... - 3

नको चंद्र तारे, फुलांचे पसारे.... (3) बाहेर काळाकुट्ट अंधार पसरला होता. चंद्रही नव्हता, फक्त चांदण्यांची लुकलूक. आज शनिवार, निता दिवस मोजत होती. आणखी सात आठ दिवसांनी लग्न होतं. कानात हेडफोन लावून ती तिच्या होणाऱ्या नवऱ्याबरोबर फोनवर गप्पा मारत होती. बेडच्या समोरच लावलेल्या आरश्यात पाहत ती केसांशी खेळत होती. खिडकीतून मंद गार वारा येत होता. तिच्या गालाला हलकेच स्पर्शून जात होता. ती लाजत होती, हळूच हसत होती. हॉलमधल्या दोलकाच्या घड्याळात अकराचे टोले पडत होते. अचानक खिडकीतून येणार वारा शांत झाला. वातावरणात एक गूढ शांतता पसरली. ती शनिवारची रात्र होती. अमावस्या! रूममधील नाईट बल्ब लुकलुकू लागला. समोर आरश्यात नंदाची प्रतिमा धूसर ...Read More

4

नको चंद्र तारे, फुलांचे पसारे.... - 4

नको चंद्र तारे, फुलांचे पसारे.... (4) ढवळेपाटील वाडीतील बडे प्रस्थ. आपल्या वाडवडिलांपासून चालत आलेली पाटीलकी. दुमजली ऐसपैस चौसोपी वाडा. म्हणून पंचक्रोशीत ओळख होती. आजबाजूच्या वाड्यावस्त्यांमध्ये पाटलांचा नावलौकिक होता. दरारा होता. पाटलांचा स्वभाव प्रेमळ. त्यामुळे लोकांना ते हवेहवेसे वाटायचे. पंचक्रोशीतील भांडण तंटा सोडवण्यात आणि न्यायनिवाडा करण्यात पाटील एकदम वाकबगार. लोकं तालुक्याच्या कचेरीत जाण्यापेक्षा पाटलांकडेच यायची. तालुक्याहून एके शनिवारी अमावस्येच्या रात्री माघारी येताना घाटात झालेल्या अपघातात वडीलांचा अकस्मात मृत्यू झाला. सारी जबाबदारी वीस बावीस वर्षांच्या सुभानरावांवर आली. अशाही परिस्थितीत सुभानरावांनी आपल्या वडिलांइतकीच कीर्ती मिळवली. भारदस्त व्यक्तिमत्व, उंचपुरे आणि आवाजातली धार पाटलांना शोभत असे. मृत्यूसमयी वडिलांच्या इच्छेखातर मित्राच्या मुलीशी कुसाबाईशी पाटलांना ...Read More

5

नको चंद्र तारे, फुलांचे पसारे.... - 5 - अंतिम भाग

नको चंद्र तारे, फुलांचे पसारे.... (5) सांगता सांगता त्या म्हाताऱ्याच्या डोळ्यांतून अश्रू ओघळू लागले. ऐकून सगळे सुन्न झाले होते. डोंगराआड जाऊ लागला होता. म्हातारा उठला. देवळात समई पेटवली. माठातील थंडगार पाणी प्यायला. सगळ्यांना पाणी दिलं. आणि पुढं सांगू लागला."चार महिनं झालं व्हतं. सारा गाव हळूहळू इसराय लागला. पुन्हा शनी अमावस्येच्या रात्री म्या एकदा झोपायच्या आधी आरश्यात बगत हुतो. तोच वाहिनीसाचा चेहरा आरश्यात दिसला. म्या लय घाबारलो. गप जाऊन झोपलो पर झोप लागली न्हाई. सारखं सारखं त्यो आरसा दिसायचा आणि वाहिनीसावर होणारा अत्याचार. म्या आरश्यात बगायचं बंद केलं. घर सोडलं आन हिकडं देवळात येऊन राहायला लागलू. पर दर शनी अमावस्या ...Read More