काळ आला होता पण वेळ नाही आली होती

(37)
  • 55.3k
  • 10
  • 21.4k

हे ब्रम्हदेव मी आजपर्यंत विधात्यांच्या मर्जीप्रमाणे कार्य करत आलो आहो, आणि ते मी कधीच विसरलो नाही. सर्व मानवलोक माझ्या या कार्याने थर - थर कापतात. पण आता मला या कार्याचा कंटाळा आला आहे. म्हणुन माझी अशी मागणी आहे की किमान ६ जणांचे मृत्यु हे मला माझ्या पद्धतीने घेता यावे यासाठी मी तुमच्याकडे आलो आहे मला फक्त या ६ जणांची मृत्यु कशी घ्यायची हे ठरवु दया त्यामध्ये विधात्याची काहीही दखल नको किंवा वेळेचा बंधन नको. मला ज्या वेळेला वाटेल आणि ज्या प्रकारे वाटेल त्या प्रकारे मी त्यांचा मृत्यु निश्चित

New Episodes : : Every Tuesday

1

काळ आला होता पण वेळ नाही आली होती - 1

हे ब्रम्हदेव मी आजपर्यंत विधात्यांच्या मर्जीप्रमाणे कार्य करत आलो आहो, आणि ते मी कधीच विसरलो नाही. सर्व मानवलोक माझ्या कार्याने थर - थर कापतात. पण आता मला या कार्याचा कंटाळा आला आहे. म्हणुन माझी अशी मागणी आहे की किमान ६ जणांचे मृत्यु हे मला माझ्या पद्धतीने घेता यावे यासाठी मी तुमच्याकडे आलो आहे मला फक्त या ६ जणांची मृत्यु कशी घ्यायची हे ठरवु दया त्यामध्ये विधात्याची काहीही दखल नको किंवा वेळेचा बंधन नको. मला ज्या वेळेला वाटेल आणि ज्या प्रकारे वाटेल त्या प्रकारे मी त्यांचा मृत्यु निश्चित ...Read More

2

काळ आला होता पण वेळ नाही आली होती - 2

त्या क्रूर आणि भयंकर हास्याने कार्तिक आणि पंकज ने एकमेकांकडे पाहिले दोघांच्या पण नजरा बोलल्या मग हळूहळू दोघेही जवळ बोललेपंकज = "काही ऐकलं का कार्तिक भाऊ?"कार्तिक ने मान हलवत हो म्हटलं ."आता इथे जास्त वेळ थांबन बरोबर नाही आपल्याला लवकरात लवकर गाव गाठावे लागते." समोर हातात कुर्‍हाड घेऊन विशाल ,मागे मुकेश हातात सत्तुर घेऊन, त्यामागे नितेश दोन्ही हात खिशात टाकून ,राहुल ,कार्तिक आणि पंकज हातात काड्या धरून आजूबाजूचा कानोसा घेत सामोर वाढत होते. सायंकाळची वेळ झाली होती .सर्व एकापाठोपाठ चालत होते .मध्येच एखादे हरिण किंवा ससा रानात पळत सुटत होते .सर्वत्र आज शांतता होती .आज निसर्गाने ...Read More

3

काळ आला होता पण वेळ नाही आली होती - 3

भाग ३तो शांत जमिनीवर पडला होता. नुकत्याच झालेल्या त्या द्वंदचे निशान जमिनीवर होते. त्याच्या शरीरावर जागोजागी जखमेचे निशान होते शरीर रक्ताने माखले होते पण त्याचे डोळे आपल्या पराक्रमाची साक्ष देण्यास उघडे होते .मित्रांचे प्राण वाचवण्यासाठी त्यांच्या लाडक्या वाघाने काळराजाच्याही नाकी नऊ आणले होते .सर्वांचे डोळे पाणावले होते. आपल्या मित्राची अशी करुन अवस्था पाहून सर्वांना गहिवरुन आले .थोडावेळ कोणालाही काहीच कळेना कि काय म्हणावे आणि काय बोलावे.अचानक भयानक शांतता तिथे पसरली होती. सुई पडेल तर त्याचाही आवाज येईल अशी नीरव शांतता तिथे पसरली होती आणि कोणीच कोणाशी बोलत नव्हते. फक्त सर्व एकमेकांकडे पाहत होते आणि एक नजर विशालच्या पार्थिव देहाकडे ...Read More

4

काळ आला होता पण वेळ नाही आली होती - 4

4काळ आला होता पण वेळ नाही आली होती भाग 4 कळत नकळत आमच्या आणखी एका मित्राला आमच्यापासून हिरावून घेतले होते.आणि आम्ही फक्त मूक दर्शक बनून पहात राहिलो होतो. राहुलचे कोणीच नसल्यामुळे मीच त्याचा अंत्यसंस्कार केला.गावात पुन्हा एकदा शोकांतिका पसरली कारण राहुल जरी पिणारा असला तरी कधी कोणाला तो वाईट बोलला नाही किंवा कधी कुणाशी वैर नाही. उलट तो कोणाच्याही मदतीला तयार असायचा आणि त्याच्या याच गुणामुळे तो आज आमच्या हयात नव्हता. एकेक करून आम्ही सगळे घरी परतलो. आज सगळे शुन्यातच होते.कुणालाही काहीच सुचत नव्हते.मी बिछान्यावर पडुन झालेल्या दोन्ही घटनाक्रमावर थोडा विचार केला पण काहीही ...Read More

5

काळ आला होता पण वेळ नाही आली होती - 5

काळ आला होता पण वेळ नाही आली होती भाग 5 रात्रीचे साडेआठ वाजले होते. दरवाज्यावर थाप मी समजून गेलो कार्तिक भाऊच असेल.म्हणून मी उठून दरवाजा जवळ गेलो.कडी उघडली तर समोर एक वयोवृद्ध मनुष्य उभा होता. त्याची दाढी खूप वाढली होती आणि पांढरीशुभ्र होती. तसेच डोक्यावरील केस जटे प्रमाणे बांधले गेले होते.वृद्ध असून सुद्धा त्याच्या चेहर्‍यावर विलक्षण तेज होते. पण त्यांना या आधी गावात पाहिले नव्हते. कोण हा व्यक्ती?इतक्या रात्री माझ्याकडे का आला? असे प्रश्न त्याला पाहताच मला पडले. मी काही विचारणार तोच तो वृद्ध व्यक्ती उद्गारला. " भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे. येणारे काही दिवस खूप ...Read More

6

काळ आला होता पण वेळ नाही आली होती - 6

काळ आला होता पण वेळ नव्हती आली भाग ६ मिनी आपले कोरडे वस्त्र एका ठेवून ती आंघोळीला गेली.नकळत माझी नजर त्या पोकळी वर गेली आणि त्यातून आंघोळ करणारी मिनी मला अर्धवट दिसू लागली.पहिल्यांदाच माझ्या मनाला एक हुरहुर जाणवली. मी तो नजारा एकटक बघू लागलो.पण मनात असे काही नव्हते बस पाहत होतो. नकळत माझ्या हृदयाचे ठोके जोराजोरात वाढू लागले आणि मी मंत्रमुग्ध झालो.मिनीच्या आवाजाने मला भाण आली. मला माझीच लाज वाटली. मला स्वतःवर क्रोध अाला मी हे काय करतोय. ती एक साधवी आहे. याशिवाय ती माझ्या मित्राची प्रेयसी पण होती आणि तिच्यासाठी माझ्या मनात ...Read More

7

काळ आला होता पण वेळ नाही आली होती - 7

काळ होता पन वेळ नाही आली होती भाग 7 चौकीदाराने जीपमधून सोडल्यानंतर मुकेश आणि कार्तिक त्यानंतरचा प्रवास पायी सुरू केला दुपारची वेळ झाली होती दोघांना पण खूप जोराची भूक लागली होती त्यांनी आपसात ठरवून भरून आणलेली शिदोरी खाण्याचे ठरवले मुकेश जाऊन बाटलीमध्ये जवळच असलेल्या तलावातून पाणी घेऊन आला आणि त्यांच्या गोष्टी सुरु झाल्या,मुक्या:- आर तुले रस्ता त माईत हाय न सामोर?कार्तिक:- व्हय व्हय त्याची काडजी नग करु मले समद माईत हाय पर फकस्त गडाच्या पायथ्या परत त्याच्या सामोर नाई.मुक्या:- ते बगु सामोर काय कराच त आदी तित परत पोचू मग पावू .कार्तिक:- व्हय चाल आटप लवकर . ...Read More