प्रेम भावनेचा मृदू रंग भरणारा व्हायरस

(16)
  • 67.2k
  • 3
  • 23.6k

प्रेमभावनेचा मृदू रंग भरणारा व्हायरस १. प्रथम गणपती बाप्पाला नमस्कार करणे आणि मगच अॉफीसमध्ये पाऊल टाकणे.त्यासाठी खासकरून स्वागत कक्षातूनच जायचे. अॉफीसमध्ये जाऊन कंप्युटर चालू करायचे आणि थेट प्रोडक्शन लाइनवर जाऊन कामगारांची मिटींग घ्यायची. मिटींगमध्ये अदल्या दिवशीचा लेखाजोखा मांडायचा. त्यातील चुका टाळून कामात सुधारणा करून दिलेलं टार्गेट पूर्ण करण्यासाठी काय करता येईल हे सांगायचं आणि एखाद्या दिवशी त्यांनी दिलेले टार्गेट पूर्ण केलेच, तर दिलेल्या टार्गेटच्या पुढे आणखी प्रोडक्शन कसं वाढवता येईल, यासाठी मार्गदर्शन (?) करायचं. मी दिलेल्या मार्गदर्शनावर आजपर्यंत कधी कुणाच्या डोक्यात कसलाच प्रश्र्न किंवा विरोध निर्माण झाला नाही. त्यामुळे मी स्वतःवरच खूष होऊन अॉफीसमध्ये येऊन बसायचो. त्यानंतर संध्याकाळी रिपोर्ट जमा

Full Novel

1

प्रेम भावनेचा मृदू रंग भरणारा व्हायरस - 1

प्रेमभावनेचा मृदू रंग भरणारा व्हायरस १. प्रथम गणपती बाप्पाला नमस्कार करणे आणि मगच अॉफीसमध्ये पाऊल टाकणे.त्यासाठी खासकरून स्वागत कक्षातूनच अॉफीसमध्ये जाऊन कंप्युटर चालू करायचे आणि थेट प्रोडक्शन लाइनवर जाऊन कामगारांची मिटींग घ्यायची. मिटींगमध्ये अदल्या दिवशीचा लेखाजोखा मांडायचा. त्यातील चुका टाळून कामात सुधारणा करून दिलेलं टार्गेट पूर्ण करण्यासाठी काय करता येईल हे सांगायचं आणि एखाद्या दिवशी त्यांनी दिलेले टार्गेट पूर्ण केलेच, तर दिलेल्या टार्गेटच्या पुढे आणखी प्रोडक्शन कसं वाढवता येईल, यासाठी मार्गदर्शन (?) करायचं. मी दिलेल्या मार्गदर्शनावर आजपर्यंत कधी कुणाच्या डोक्यात कसलाच प्रश्र्न किंवा विरोध निर्माण झाला नाही. त्यामुळे मी स्वतःवरच खूष होऊन अॉफीसमध्ये येऊन बसायचो. त्यानंतर संध्याकाळी रिपोर्ट जमा ...Read More

2

प्रेम भावनेचा मृदू रंग भरणारा व्हायरस - 2

क्रमशः-२.विठ्ठल- " आमच्या गावाकडं एक म्हातारी वारली, तर तिचा मुलगा,सुन नातवांडं यांना डायरेक्ट तिला अग्नी द्यायला जाऊन दिलं नाही. त्यांना गावातल्या सरकारी दवाखान्यात चेक करायलं नेलं आणि नंतर अग्नी द्यायला जाऊन दिलं. तेही सगळ्यांनी तोंडावर रुमाल बांधले तेव्हा."मी- " तुझं गाव कुठलं ?"विठ्ठल- " सातारा जिल्ह्यात पाटण तालुका."मी- " खेड्यातल्या लोकांच्यात अगोदरच अडाणीपणा असतो म्हणा ! व्हायरस चेक कसा करणार ? खेड्यात टेस्टींगच्या सुविधा उपलब्ध असतात का ?"विठ्ठल- " सर, व्हायरस चेक करायच्या सुविधा नसतील, पण प्राथमिक तपासणी केली जाते. जसं, घरात कुणी आजारी आहे का? , मागच्या पंधरा दिवसांत परदेश दौरा केला आहे का? , घरातील कुणी आजारी ...Read More

3

प्रेम भावनेचा मृदू रंग भरणारा व्हायरस - 3

क्रमशः-३.हा हा म्हणता दोन आठवडे निघून गेले. जसजसे दिवस जात होते, तसतशी भारतात, त्यातल्या त्यात पुण्यात या व्हायरसच्या रूग्णांची वाढलेली बातम्यांत पाहायला मिळत होती. ताळाबंदीचा कालावधी अजून वाढण्याच्या शक्यता बातम्यांत वर्तवल्या जात होत्या. आता मात्र घरच्यांच्या आणि गावाकडच्या इतर आठवणींने एक एक दिवस आभाळा एवढा मोठा जाणवू लागला. पुण्यात रूममध्ये बंदिस्त होतो, पण कुणीतरी भल्या मोठ्या दगडाखाली आपलं काळीज बंदिस्त केलंय असं जाणवत होतं. जीव घुसमटायला लागला होता. आण्णाभाऊ साठेंच्या 'फकिरा' कादंबरीत त्यावेळी साथीचा रोग पसरल्यानंतर त्या समाजाची दैनीय अवस्था, पसरलेल्या रोगराईमुळे गावंच्या गावं ओसाड पडलेला प्रसंग, त्यामुळे गावांच्या झालेल्या भकास अवस्थेचे चित्रण प्रत्यक्ष अनुभवायला मिळेल, असे कधी स्वप्नातही ...Read More

4

प्रेम भावनेचा मृदू रंग भरणारा व्हायरस - 4

क्रमशः-४. तो पुढे बोलायच्या आतच मी बोललो, " हा बोल विठ्ठल."तो- " कोण विठ्ठल ? आरे मित्रा, मी सतीश ! सतीश कांबळे ! ओळखलं का ? २०११ ला आपण पुण्यात एकाच कंपनीत काम करत होतो आणि मी तुझा रुमपार्टनर होतो."मी - " हा, बोल ना सतीश. किती दिवसांनी फोन केलायस जवळजवळ आठ नऊ वर्षे होऊन गेली. इतक्या दिवसांनी कशी काय आठवण काढलीस ?"सतीश- " आरे, खूप जुन्या डायरीतून तुझा फोन नंबर शोधून काढला. फोन लागतोय का न्हाय याची धाकधूक होती, पण लागला. कुठं आहेस ? तब्येत पाणी ठिक आहे ना ?"मी- " पुण्यातच आहे. आज २० दिवस झाले रूमवरच पडून ...Read More

5

प्रेम भावनेचा मृदू रंग भरणारा व्हायरस - 5

क्रमशः५.मी - " हा बोल भाऊ, दादांच्या फोनवरून कसा काय फोन केलास ?."भाऊ - " आरं... दादास्नी दवाखान्यात घेऊन माझ्या हातातला घास कधी गळून पडला, समजलंच नाही. क्षणार्धात अंगातून वारं निघून जावं, अशी माझी अवस्था झाली. तोंडातून शब्द फुटत नव्हता. पुन्हा तोच बोलला, " खेराडला आलोय. सरकारी दवाखान्यात."मी - " का ? काय झालंय ? "भाऊ - " दुपारपासून पोटात दुखत होतं. गावातल्या क्लिनिकमध्ये चार वाजता इंजेक्शन करून आलो. दोन तीन बरं वाटलं आन्‌ परत दुखायला लागलं. "मी - " आरं, मग खेराडला कशाला जायाचं ?"भाऊ - " आपल्या गावात कुठं दवाखाना आहे ? "मी - " एवढं मोठं ...Read More

6

प्रेम भावनेचा मृदू रंग भरणारा व्हायरस - 6

क्रमशः-६.भाऊ- " तोंडातून आवाज येत नाही. पोट फुगलंय. गाडीत डोळे झाकून गप्प पडून आहेत. बर त्या मेडीकलवाल्या बाई आल्या आता मेडीकल उघडायचं चाललंय. गोळ्या घेतो. आता ठेव फोन आणि काळजी करू नकोस. सगळं ठिक होईल. मी तुला घरी गेल्यावर फोन करतो." असे म्हणून त्याने फोन ठेवला. रात्री जेवण करायला बसलो होतो, ते जेवणाचं ताट तसंच पडून होतं. जेवनाचा खरकटा हात धुवायचं देखील भान विसरून गेलो होतो. पुन्हा जेवायची इच्छा नव्हती. दादांच्या काळजीनं पोटात सतत कालवाकालव होतं होती. मन शांत बसत नव्हतं. झोप तर केव्हाच उडाली होती. पुन्हा अर्ध्या पाऊण तासाने भाऊला फोन केला, पण आत्ता त्याचा फोन बंद लागायला ...Read More

7

प्रेम भावनेचा मृदू रंग भरणारा व्हायरस - 7 - अंतिम भाग

क्रमशः-७.क्षणार्धात माझं अशांत मन शांत झालं. क्षणभर वाटले, की मी इतकं करतोय, पण अशा कठीण प्रसंगात ना मी कामी ना माझा पैसा. फक्त पैसा नव्हे तर माणूसकीच माणसांच्या उपयोगी पडते याची जाणीव झाली. ओमिनी कार चालवणारा आण्णा काहीही विचार न करता जिकडे बोलेल तिकडे पैशाचा विषय न काढता आला. मेडीकलवाल्याने स्वतः त्या गावात नसतानाही इतक्या अंधारात आपल्या बायकोला अनोळखी लोकांसाठी मेडीकल उघडायला पाठवले आणि त्या माऊलीनेही आपल्या जीवाला धोका निर्माण होऊ शकतो याची जाणीव असतानाही रात्रीचे एक वाजता अंधारात येऊन मेडीकल उघडून माणूसकी दाखवली. दोन दिवसांत अनेकांनी फोन करून माझी खूशाली विचारली होती, पण सर्व जण स्वत:च्या स्वार्थासाठी फोन करत ...Read More