मेड फॉर इच अदर

(148)
  • 101.7k
  • 48
  • 56.5k

"अग आई.., लवकर दे ग चहा, मला उशीर होतोय ऑफिससाठी." "हो हो देतेय ग. हा घे चहा आणि तुझा टिफिन." ही मनस्वी सावंत. साधी सरळ आणि मध्यम वर्गीय मुलगी. मनस्वी दिसायला सावळी, पण तेवढीच सुंदर.., ते बोलतात ना सावळ्या मुली जरा जास्तच रेखीव असतात. तिचे बदामी डोळे आणि त्या नजरेत एक वेगळीच जादु होती. तिच्या बोलण्यात नेहमी दिसणारा आत्मविश्वास लोकांना भुरळ पडायचा. कमी बोलणंच ती पसंद करायची. पण एकदा काय एखाद्याला आपलस केल की, दिलखुलास बडबड करणारी. कुरळे काळेभोर लांबसडक केस. नेहमी हसुन बोलणारी अशी ही मनस्वी. घरात आई बाबा आणि दोन बहिणी. एक मोठी आणि एक लहान. अस साध

Full Novel

1

मेड फॉर इच अदर - १

"अग आई.., लवकर दे ग चहा, मला उशीर होतोय ऑफिससाठी." "हो हो देतेय ग. हा चहा आणि तुझा टिफिन." ही मनस्वी सावंत. साधी सरळ आणि मध्यम वर्गीय मुलगी. मनस्वी दिसायला सावळी, पण तेवढीच सुंदर.., ते बोलतात ना सावळ्या मुली जरा जास्तच रेखीव असतात. तिचे बदामी डोळे आणि त्या नजरेत एक वेगळीच जादु होती. तिच्या बोलण्यात नेहमी दिसणारा आत्मविश्वास लोकांना भुरळ पडायचा. कमी बोलणंच ती पसंद करायची. पण एकदा काय एखाद्याला आपलस केल की, दिलखुलास बडबड करणारी. कुरळे काळेभोर लांबसडक केस. नेहमी हसुन बोलणारी अशी ही मनस्वी. घरात आई बाबा आणि दोन बहिणी. एक मोठी आणि एक लहान. अस साध ...Read More

2

मेड फॉर इच अदर - २

"मानस तू चुकीचा वागलास आज मला नाही पटल तुझं वागणं..," प्राची मॅम मानस वर ओरडल्या. "अहो मॅम.., मी गंमत केली माझा हेतू तिला दुखवायचा मुळीच नव्हता." "हो पण आज जे झाल ते नाही व्हायला हव होत मनस्वी नवीन आहे आणि तुझ्या मस्करीची सवय तिला नाहीये. चल तिला कॉल कर आणि सॉरी बोलून माफी माग तिची कळल का..?? उद्या आल्या वर तुमच्यात मला मैत्री हवी कळल का." त्यांनी त्यांचं बुण संपवलं. "हो मॅम." मानस ही मान खाली घालून गप्पपणे उभा होता. तो निघत होता की, प्राची मॅम बोलल्या, "नंबर नको का हा घे तिचा नंबर आणि उद्या येताना सगळं ...Read More

3

मेड फॉर इच अदर - ३

कसे बसे स्वतः कडच पाणी पुरवत शेवटी गडावर पोहोचले. तिथल्या काही लोकांनी वर पाण्याची टाकी आहे असं सांगितल. मग काय स्वारी निघाली टाकी शोधायला. चालून चालून पाय चांगलेच थकले होते आणि आता जवळचं पाणीही संपत आलेल. इकडे तिकडे शोधल्यावर त्यांना एका ठिकाणी टाकी दिसली पण आजु बाजुचा परिसर अस्वच्छ दिसत होता. गाईज टाकी तर आहे पण आजु-बाजूचा परिसर किती अस्वच्छ आहे." मनस्वी आजूबाजूला बघत बोलली. पण जवळच पाणी संपल्याने त्यांच्याकडे दुसरा ऑपशन ही नव्हता.. मग काय आमिर आणि मानस त्या टाकीच्या जवळ जाऊन पाणी आपल्या बॉटल मध्ये भरू लागले. मग वर येऊन तिघांनी पाणी पिल. पण पाणी स्वच्छ आणि गोड होत, ...Read More

4

मेड फॉर इच अदर - ४

तिने मोठा श्वास घेत डोपे बंद केले.. आणि बोलायला सुरुवात केली..., "म्हणजे कुठुन सुरुवात करू कळत नाहीये.., पण जेव्हा आपण चांगले मित्र झालोय तेव्हा पासून मला तु आवडायला लागला आहेस." कस बस तिने एकदाच सांगुन टाकल. हे ऐकुन मानसच्या चेहऱ्यावर बारा वाजले होते.. मनस्वी मी तुझ्या या बोलण्याचा मान ठेवतो.. पण मला माफ कर. कारण मी आई-बाबा ठरवतील त्याच मुलीशी लग्न करेन अस ठरवल आहे." त्याच्या या बोलण्याने तिला खुपच वाईट वाटलं. सगळे होते म्हणून तिने स्वतःला सावरलं. पण डोळे मात्र पाणावले होते नकाराने. पिकनिक वरून आल्यावर तिला खूप वाईट वाटत होत. आता मानस माझ्याशी बोलेल की, नाही हे देखील ...Read More

5

मेड फॉर इच अदर - ५

हळुहळू वेळ पुढे ढकलत होता आणि तिचा बर्थडे जवळ येत होता. मानसने मनस्वीचा बर्थडे कधी असतो हे सोशिअल मीडिया नोट करून ठेवला होता. पुढच्या वीकमधे तिचा बर्थडे येत होता आणि तो त्याला स्पेशल कराचा होता. तसा त्याने प्लॅन ही केलेलाच म्हणा. आता वाट बघत होता तो त्या दिवसाची. आज तिचा वाढदिवस होता. "वाढदिवसाच्या खुप साऱ्या शुभेच्छा," घरच्यांनी तिला विश केल. पण तीच अर्ध लक्ष होत ते मोबाईलकडे अजून त्याने तिला विश केल नव्हत ना....! "त्याला म्हाहित तरी असेल का आज माझा बर्थडे आहे ते, बहुदा नसेल जाऊदे झोपुया." स्वताच्या मनाशी विचार करून ती झोपी गेले. मानस आज जरा जास्तच लवकर आलेला ...Read More

6

मेड फॉर इच अदर - ६

"काय मॅडम उद्याचा काय प्लॅन...?" "माझा कसला प्लॅन मी बाबा तु सांगशील ते ऐकेल." "बघ हा मी तिकडे याव लागेल तुला चालेल का..?" त्याने डोळा मारत विचारल. तिने मानेनेच होकार दिला. "तुझ्यासोबत कुठेही यायला मी नेहमीच तय्यार आहे." ती ही काही हमी नव्हती. "बर बर उद्या सकाळी लवकर तय्यारी करून रहा घ्यायला येतो स्टेशन ला." "ओके डन." रात्री कॉल करून त्याने तिला विश केला. थोड बोलून उद्या भेटायचं ठरवुन त्यांनी कॉल कट केले. तिला तर झोपच लागत नव्हती. उद्या मानस काय सरप्राईज देईल याने तिच्या डोळ्याला डोळा लागत नव्हता. कुस बदलत शेवटी ती निद्रेच्या स्वाधीन झाली."आई चल निघते हा ...Read More

7

मेड फॉर इच अदर - ७

चहा पाणी घेऊन मानस निघाला. या डेंग्यूमुळे मानस अजूनच मनस्वी च्या जवळ आलेला. गोळ्यांच्या प्रभावामुळे ताप कुठच्या कुठे पळाला त्या गोळ्या खुप स्ट्रॉंग होत्या आणि त्याचा परिमाण म्हणून की काय मनस्वी चे केस गळायला लागले होते. तिला खूप अशक्तपणा आलेला. चेहेऱ्या वरचा ग्लोव कमी झालेला. ती ठीक होत होती पण त्या स्ट्रॉंग मेडिसिनमुळे तिच्या शरीरात बदल होत होते. काही दिवसांनी ती ठीक झाली. आता मानस रोज घरी येऊ लागला होता. छान सर्वांसोबत मिक्स झालेला. असाच एक दिवस तो आलेला तिला भेटायला. मला आज मॅगी खावीशी वाटतेय, तिने मानस ला सांगितले. ते छोट्या बहिणीने ऐकले. आई मनूला ला मॅगी हवीये ...Read More