समर्पण

(337)
  • 272.9k
  • 36
  • 135.4k

समर्पण -१ सब कुछ पा लिया जिंदगी मे फिर भी कुछ कमी सी है। दिल के एक हिस्से मे मेरे आज भी तु मौजूद है । २ वर्षांनंतर आज जेव्हा त्याला बघितलं तेव्हा वाटलं किती अपूर्ण आयुष्य जगत आहे मी. काय म्हणायचा तो " सोनु, हे सगळं आपण ठरवून थोडी केल, हे तर घडत गेलं." हो, बरोबर अगदी बरोबर, पण त्या नंतर त्यानी जे काही केलं ते मात्र ठरवून...मी काय केलं असेल, माझं काय झालं असेल याचा विचार न करता निघून गेला.....कायमचा.....आणि आज असा अचानक माझ्या समोर येऊन माझा सगळा भूतकाळ माझ्या डोळ्यासमोर आणुन ठेवला. जर देवाला त्याला माझ्या

Full Novel

1

समर्पण - 1

समर्पण -१ सब कुछ पा लिया जिंदगी मे फिर भी कुछ कमी सी है। दिल के एक हिस्से मे आज भी तु मौजूद है । २ वर्षांनंतर आज जेव्हा त्याला बघितलं तेव्हा वाटलं किती अपूर्ण आयुष्य जगत आहे मी. काय म्हणायचा तो " सोनु, हे सगळं आपण ठरवून थोडी केल, हे तर घडत गेलं." हो, बरोबर अगदी बरोबर, पण त्या नंतर त्यानी जे काही केलं ते मात्र ठरवून...मी काय केलं असेल, माझं काय झालं असेल याचा विचार न करता निघून गेला.....कायमचा.....आणि आज असा अचानक माझ्या समोर येऊन माझा सगळा भूतकाळ माझ्या डोळ्यासमोर आणुन ठेवला. जर देवाला त्याला माझ्या ...Read More

2

समर्पण - 2

समर्पण-२ मला वाचन आणि संगीताची खूप आवड. जेव्हा मी घरी एकटी असायची तेव्हा वाचन करायचं किंवा आवडीचे गाणे ऐकायचे माझा नित्यक्रम होता. अभय ला यापैकी काहीच आवडायचं नाही. तो त्याच्या कामातच इतका व्यस्त असायचा की त्याला यासाठी वेळच मिळायचा नाही. सुट्टीच्या दिवशी तो मात्र मला बाहेर घेऊन जायचा, खूप फिरायचो आम्ही पण बोलणं मात्र कामपूरतच व्हायचं आमच्यात. एकदा असच अभय ऑफिस मधून घरी लवकर आला आणि मला बोलला की त्याला पंधरा दिवसांसाठी बंगलोर ला जायचं आहे. मी आधीच खूप कंटाळली होती एकट राहून अन त्यात अभय पुन्हा घरी नसणार हा विचारच करवत नव्हता मला. मी बोलली त्याला, "अभय, किती ...Read More

3

समर्पण - 3

समर्पण-३ मिला था एक अजनबी, ना लगा वो अजनबी सा। रीश्ता तो बेनाम था, लेकीन प्यार दे गया वो सा। आपण आयुष्यात खूप नाते निभावत असतो, त्या नात्याना नावही असतात पण काही नाती निनावी असतात आणि ती फक्त निभावण्यासाठी बनलेली असतात. खूप कठीण असतं अशी नाती निभावणं आणि टिकवणं. मला वाटत नात टिकवणं सोप्पं असतं नात निभावण्यापेक्षा. नातं टिकवणं ही गरज असते तर नातं निभावण्यासाठी समर्पणाचा भाव लागतो. विश्वास असावा लागतो एकमेकांवर. मी आणि अभय केवळ बंधनात अडकलो होतो असच मी म्हणेल. मला नेहमी वाटायचं की अभय वाईट व्यक्ती नाही आणि तो नव्हताच. त्याला त्याच्या जबाबदाऱ्या कश्या पार पडायच्या ...Read More

4

समर्पण - ४

समर्पण-४ क्या कंहू तेरे इंतजार मे, रात कुछ ऐसे गुजरी, निंद का भी जवाब मिला, ईन आंखो मे मेरी किसीं और ने लेली। काही लोकांचं नुसतं बोलल्यानेही मनाला प्रसन्न वाटायला लागतं. त्यांचा आवाज ऐकल्यावरही खूप धीर मिळतो मनाला. माझ्या बाबतीतही असच घडत होतं. ती रात्र मला खूप मोठी वाटायला लागली. तस तर जागरण वैगरे माझ्याने व्हायचं नाही पण त्या रात्री मला झोपच लागली नाही. अस वाटत होतं की कधी एकदाचा दिवस उगवतो आणि कधी मी विक्रम शी बोलते. माझं मलाच नवल वाटत होतं की किती आतुरता आहे मला. एकदाची सकाळ झाली, मी भराभर काम आटोपली, अभय चा टिफिन, माझी ...Read More

5

समर्पण - ५

समर्पण-५ विक्रम ला गाण्याची फार आवड होती. त्याला खरं तर गायन क्षेत्रातच नाव कारायच होत अस नेहमी म्हणायचा तो जबाबदाऱ्या निभावता निभावता ते राहूनच गेलं. पण माझा त्याला नेहमी आग्रह असायचा की त्याने त्याची आवड जपावी. तो मला रोज एक गाणं म्हणुन दाखवायचा. त्याची ईच्छा होती त्याच्या एखाद्या कार्यक्रमात माझ्या समोर माझ्या डोळयांत बघून गायची. माहीत नव्हतं ही ईच्छा कधी पूर्ण होणार होती, पण त्या आधी त्याची मला भेटायची खूप इच्छा होती. खरं तर मला ही खूप ओढ लागली होती त्याला भेटायची पण काही वेळ च मिळत नव्हता. पण म्हणतात ना जर मनाने काही ठरवलं तर आपण ते करतोच. ...Read More

6

समर्पण - ६

समर्पण-६ आज मौसम सच मे सुहाना है, या ये तेरी सोहबत का असर है। मैं देख रही हूं जहाँ बस प्यार ही प्यार नजर आता है। खुप छान दिवस होता तो, आमची ती पहिली भेट त्यात पाऊस, सगळं काही अतिशय सुंदर. आज ही तो दिवस आठवला की कितीतरी तरंग उठतात मनात. संध्याकाळ झाली, खरं तर अंधारच पडला होता त्यादिवशी, पण गप्पा मारता मारता वेळेचं भानच राहील नाही आम्हाला, त्यामुळे मला थोडासा उशीरच झाला घरी पोचायला. मी बोलली विक्रम ला मी बसने किंवा ट्रेन ने जाईल पण ऐकेल तो विक्रम कसला. मला सोडायला आला माझ्या बिल्डिंग पर्यंत. थोडीशी लांबच उभी ...Read More

7

समर्पण - ७

समर्पण-७ तेरा ही नशा तेरी ही खुमारी, हर वक्त मुझपे छाये रहती है। तू ही तू मुझमे साँस लेने है, धडकने मेरी कहने लगी है । असच काहीस होत होतं मला आज काल. मला आनंद, दुःख, उत्साह, काहीही वाटत असेल तर मला आधी विक्रम आठवायचा. माझ्या मनात कुठलाही विचार येत असेल मला आधी विक्रम ला बोलावसं वाटायचं. आणि विक्रम च्या बाबतीत ही असच घडत होतं. मी तर म्हणेल की आमची एकमेकांशिवाय सकाळ ही होत नव्हती आणि रात्र ही सरत नव्हती. पण नेहमी मनात एक विचार असायचा की हे जे काही घडत आहे ते चूक आहे की बरोबर आहे. आमच्या ...Read More

8

समर्पण - ८

समर्पण-८ ना तुम मेरे बन सकते हो, ना मुझे किसिका बनने देते हो। किस कश्मकश्म में जी रही हूं ना तो डुबने देते हो ना उभरणे देते हो। खूप विचित्र परिस्थिती मध्ये अडकली होती मी. बुद्धीला हे पटत होत की अभय च वागणं त्याच्या जागेवर बरोबर आहे पण मनाला मात्र विक्रम ची ओढ होती. जेव्हा जेंव्हा बुद्धी आणि मनात द्वंद होतं तेंव्हा आपण मात्र मनाचच ऐकतो. माझं ही तसच होतं. मनाला खूप समजावून सांगितलं की विक्रम फक्त मित्र आहे आणि अभय माझं सर्वस्व आहे. पण जेवढं विक्रम ला स्वतःपासून लांब ठेवण्याचा प्रयत्न केला विक्रम तेवढ्याच जवळ येत होता माझ्या. ...Read More

9

समर्पण - ९

समर्पण-९ बिना तेरे साँस भी ना ले पाँऊ, इतनी है मेरे लिए अहमियत तेरी। मेरा प्यार भी तेरी परेशान जाये, क्यूँ करते हो इतनी शिकायतें मेरी। खूप जास्त विचार करायची माझी वाईट सवय आहे. एखाद्या गोष्टीचा अतिजास्त विचार करणं फक्त आपला त्रास वाढवतो. माझ्या साठी हीच सवय माझ्या दुःखाच कारण बनत गेली. विक्रम ने जरी ती गोष्ट मजाक म्हणून बोलली होती तरी माझ्या मनाला कुठेतरी हे वाटत होतं की मी खरंच खूप हक्क गाजवते का त्याच्यावर. मला नाही आवडत माझ्यामुळे कोणाला त्रास व्हावा आणि त्यात विक्रम तर माझ्या मनाच्या एवढ्या जवळ होता. मला हे वाटत होतं की जर खरंच ...Read More

10

समर्पण - १०

समर्पण-१० एक तुम्हारे ना होने से, सारा जहाँ विराणा हो गया। तुम आँखो से ओझल क्या हुए मेरा उजाला अंधेरा बन गया। विक्रमला न बघुन मी खूप घाबरली. मला कळत नव्हतं काय करू. आणि तेवढ्यात मला विक्रमचा आवाज आला, मी मागे वळून बघितलं तर विक्रम उभा होता, हातात गुलाबाचं फुल घेऊन. मी खूप चिडली पण मी दाखवलं नाही. विक्रम माझ्या जवळ आला आणि मला गुलाबाचं फुल देत बोलला, "तुला खरच ऐकायचं आहे, तू माझ्यासाठी काय आहेस?" "नाही मला काही ऐकायचं नाही, चल मला घरी सोड" आणि मी त्याच्याकडे पाठ फिरवून उभी झाली. माझ्या डोळ्यातुन अश्रू वाहत होते, विक्रम बोलला, ...Read More

11

समर्पण - ११

समर्पण-११ तेरे ईस प्यार का शुक्रिया लफ्जो मे करना नामुकीन है। ग़म लेकर भी ये एहसान चूँका पाऊँ यही भगवान से करते है। विक्रमने जरी त्याच्या भावनांना माझ्या साठी प्रेमाची उपमा दिली असली तरी माझ्यासाठी मात्र ते विक्रम चे उपकारच होते. खर तर जिथे प्रेम असतं तिथे उपकाराची भाषा करायला नको पण विक्रम ने त्याच्या जबाबदाऱ्या दूर सारून नेहमी मला मानसिक आधार दिला, माझं सगळं ऐकून घेतलं. आपण जर लोकांना आपलं काही देऊ शकतो तर तो आहे आपला मौल्यवान वेळ..आणि विक्रम ने त्याच्या आयुष्यातला खुप किमती वेळ मला दिला...त्याने मला नेहमीच जाणीव करून दिली की मी त्याच्या साठी खूप ...Read More

12

समर्पण - १२

समर्पण-१२ मेरे हर रोम मे बसर तुम्हारा है, कैसे खुद को किसी और को सोप दूँ। प्यार और फर्ज लड़ाई मे, फर्ज निभना ही है प्यार का दस्तुर। मी आणि विक्रम जेंव्हा जेंव्हा भेटलो आमचं बोलणं अभय आणि दिशा वर येऊन थांबायचं. आम्हाला दोघांनाही अभय आणि दिशा बद्दल खूप आपुलकी, काळजी वाटायची. आणि नेहमी आमच्या मनात एक अपराधीपणाची भावना असायची की जे काही आमच्या मनात सुरू आहे त्यात अभय आणि दिशा ची काय चूक आहे. पण एक गोष्ट जी आमच्या दोघांनाही माहीत होती की ती म्हणजे आम्ही आमच्या जोडीदाराला कधीच दुखवण्याचा विचार करू शकत नव्हतो. खुप वेळा मी आणि ...Read More

13

समर्पण - १३

समर्पण-१३ कैसे समझेगा कोई, तेरे मेरे रिश्ते कि गहराई । सिमटा है तू मुझमे ऐसे, जैसे हो मेरी परछाई माझ्या प्रत्येक अडचणीत विक्रम माझी सावली म्हणून उभा असायचा. आम्हाला एकमेकांची इतकी सवय झाली होती की कोणतीही छोटी गोष्ट आमच्या आयुष्यात घडली तर आम्ही बैचेन असायचो एकमेकांना सांगण्यासाठी. विक्रम ने मला माझं आणि अभय च नातं सावरण्यासाठी तर मदत केलीच पण माझ्या करीअर साठी पण मला तो खुप प्रोत्साहन द्यायचा. तो मला नेहमी बोलायचा, "सोनू तू इतकी हुशार आहेस, एवढ तुझं शिक्षण झालयं, तुझ्या करीअर वर लक्ष दे...घर, संसार या गोष्टी आयुष्यभर आहेतच पण तुझं स्वतःच अस्तित्व जप...तू कोणावरही अवलंबून ...Read More

14

समर्पण - १४

समर्पण -१४ किस्मत से हमसफर थे तुम, हमराज़ भी अगर बन जाते, सफ़र जिंदगी का आसाँ होता, रास्ते प्यार तय हो जाते । माझ्या आणि अभय च्या नात्यात एक असहजता होती, माहीत नाही का पण मी कधीच मला काय वाटतं किंवा माझा भावनिक कल्लोळ त्याच्या समोर मांडू शकली नाही.....आणि जेंव्हा सांगायची वेळ आली तेंव्हा तो समजू ही शकला नाही मला आणि मी समजवण्याचा प्रयत्न ही नाही केला..खरं तर काय आहे, अभय ला नेहमीच हे वाटायचं की मला कितीही पुस्तकी ज्ञान असेल किंवा मी कितीही जगात वावरली असेल तरी दुनियादारी मध्ये मात्र मी शुन्य आहे...त्याच्या मतानुसार मी कोणतेही व्यवहार करु ...Read More

15

समर्पण - १५

समर्पण-१५ अनक़हे अनसुने अनछ़ूए रहते है । कुछ रंग प्यार के अधुरे भी होते है। का बनतात अशी नाती थोड्या दिवसांच सुख पण आयुष्यभर पुराव्या इतक्या यातना देऊन जातात...हो...यातनाच...फक्त दुःख देऊन जातात अशी नाती..या फक्त सांगायच्या गोष्टी असतात की ज्या व्यक्यिवर प्रेम केलं त्याच्यासोबतचे आनंदी क्षण आठवा... दुःख करत बसू नका वैगरे वैगरे... पण खरं तर हे आहे की आपण जेव्हा त्या व्यक्तीचा विचार करतो किंवा त्याच्यासोबतचे आनंदाचे क्षण आठवतो त्यानंतर हे पण वाटत की काहीतरी कारणामुळे ती व्यक्ती सोबत नाही आणि याचंच दुःख जास्त होतं...त्यापेक्षा हेच वाटत की ती किंवा तो भेटलाच नसता किंवा नसती तर बरं झालं ...Read More

16

समर्पण - १६

समर्पण -१६ पास नही होते फिर भी, हमेशा साथ रहते है । जो खामोशी भी सूनले, वही तो रुहानी रीश्ते होते है । मी आणि विक्रम आमच्या कामात कितीही बिझी असलो तरी एकमेकांच्या डोक्यात मनात मात्र नेहमीच असायचो... अजूनही आहोतच...कधी कधी अस व्हायचं की कामाच्या व्यापात बोलणं व्हायचं नाही किंवा एखादा मेसेज करायला ही वेळ मिळायचा नाही, मग कधीतरी रात्री मेसेज यायचा त्याचा... तेंव्हा पण फार काही विशेष बोलणं व्हायचं नाही, एवढंच की, 'जेवली का' किंवा 'थकली असशील, आराम कर' पण एवढे छोटेसे मेसेज ही मन तृप्त करून जायचे...कधी कधी तर अस व्हायचं की मला खुप प्रकर्षाने वाटायचं की ...Read More

17

समर्पण - १७

समर्पण-१७ साथ छुटने की उम्मीद ना थी इसिलीये रीश्ता अधुरा रह गया। शायद यही वो एहसास था, जो हमारा पुरा कर गया। मला असं वाटत प्रत्येक नात्याचा काही अर्थ काढलाच पाहिजे हे महत्त्वाचं नाही. काही नाती खूप निखळ असतात, तशी नाती स्वार्थासाठी बनत नाहीत, ती फक्त एकमेकांना मानसिक आधार देण्यासाठी असतात, एकमेकांची सुख दुःख वाटून घेण्यासाठी असतात, त्यात आपल्याला काही मिळायला पाहिजे ही अपेक्षा कधीच नसते कारण त्यात स्वार्थ नसतो....माझं आणि विक्रमच ही नात असच होतं, आम्हाला एकमेकांकडून काही हवं हे कधीच वाटलं नाही आम्हाला, फक्त हवी होती ती साथ... खूप वेळ बीचवर बसुन होतो मी आणि विक्रम... एवढ्या ...Read More

18

समर्पण - १८

समर्पण-१८ जिंदगी की करवट भी, जानें क्या कमाल कर गई । आँखो से निंदे और निंदो से, उसके सपने उडा ले गई । काही वेळा आयुष्यात अश्या घटना घडतात ज्याचा विचार आपण स्वप्नातही केलेला नसतो, त्यामुळे त्यातून सावरायच कस हेही सहजासहजी अंगवळणी पडत नाही...'विक्रम' माझ्या आयुष्यातील अशीच एक घटना...किंवा अस म्हणायचं त्या एका घटनेत माझं आयुष्य समावल होतं...माझ्या आयुष्याने खुप जबरदस्त कलाटणी घेतली होती, त्यातून सावरता सावरता मी अश्या एकटेपनाच्या वळणावर येऊन पोचली जिथे फक्त मी आणि माझा एकांत होता....आणि अभय??....अभय ही होता सोबत, पण त्याने जे मला दुःख दिल होतं त्यापेक्षा मला माझा एकांतच चांगला वाटत होता...कारण त्याने ...Read More

19

समर्पण - १९

समर्पण-१९ हमारा ये सफर ऐसे मोड पे, खत्म होगा ये सोचा ना था । तुम्हारे जाने से आँखे ना तुम अजनबी ही बने रहते तो अच्छा होता। खूप वेळा प्रश्न पडतो मला, का विक्रमने माझ्या आयुष्यात यावं, का त्याच अस्तित्व मला माझं अस्तित्व वाटावं आणि का आम्ही एकमेकांसाठी इतकं व्याकुळ व्हावं... जर अश्याप्रकारे भेटून या वळणावर हे सगळं संपणार होतं तर आम्ही भेटलोच नसतो तर चांगलं झालं असतं... आज ही त्याची आठवण आली की असच वाटत तो अजूनही माझ्या आजूबाजूला आहे, त्याचे बोललेले शब्द आजही कितीतरी वेळ माझी झोप उडवून जातात....अभयला कदाचित माझी स्तिथी कळत असावी आता...कदाचित नाही, नक्कीच ...Read More

20

समर्पण - २०

फासले बढ़ जाने से, एहसास कम नही होते। ये दिल के रीश्ते है, आसानी से टूटा नही करते। खूप आहे माझ्या आणि विक्रम मध्ये...कदाचीत एवढा की या आयुष्यात तरी तो भरून निघणार नाही...आणि तशी काही अपेक्षा ही नाही...कस आहे ना, प्रत्येक गोष्टीची जशी एक वेळ ठरलेली असते तसच प्रत्येक नात्यासाठी ही एक काळ ठरलेला असतो...जर अस आहे तर मग कोणतं नात शाश्वत आहे??? पती पत्नीचं...? मला नाही वाटत त्याचीही शाश्वती आहे...हां म्हणजे दोन व्यक्ती ओळखीचे असूनही अनोळखी म्हणून सोबत जगू शकतात पण एकमेकांना खरंच का ते साथ देऊ शकतात??? नाही सांगू शकत याच उत्तर मी.....पण एवढं जरूर सांगेन की ...Read More

21

समर्पण - २१

तेरे इस मलाल और बेरूखी का, मुझपर कुछ ऐसा असर हुआ । यूँ लगा वजूद़ बचाने के लिए, रीश्ते गिरहे टूटना जरुरीसा हुआ। अभयच्या नजरेत मी केलेली चूक अक्षम्य होती....नाही.....कदाचित तो गुन्हा होता...असेलही... अजूनही नाही समजू शकत मी की खरच माझी 'ती' चूक होती का?? विक्रमच माझ्या आयुष्यात येणं, मला त्याच्यावर एक सखा म्हणून जिवापाड प्रेम होणं हा सगळा चुकीचाच भाग आहे...आणि हे सगळं का चुकीचं आहे कारण माझं लग्न झालं होतं...मी कोणाची तरी पत्नी होती...यामुळेच ती 'चूक' नसून एक अक्षम्य गुन्हा होता.....काय बोलला होता अभय मला, "नैना तुला एकनिष्ठ नाही राहता आलं.."....हं...'एकनिष्ठ' याची व्याख्या काय आहे, हे नाही ...Read More

22

समर्पण - २२

तेरे इंम्तेहान की हद अभी बाकी है जिंदगी। रुठने की अदा तुझमे है, हम इस खुबी से रूब़रु नहीं। आपल्या साठी कितीही खडतर झालं तरी ते असहनिय नक्कीच होत नसत.... आणि तो खडतर प्रवास ही नेहमीसाठी नसतोच... जस सुख टिकत नाही तशी दुःखाची ही वेळ ठरलेलीच असते, फक्त गरज असते स्वतःला सांभाळण्याची आणि संयमाची....पण हे सगळं सांगणं जितकं सोप्प असत ना, तेवढच महत्त्वाच असत त्या कठीण वेळेत याची अंमलबजावणी करणं...आणि ज्याला हे जमलं त्याची आयुष्याची नाव कधीच दुःखाच्या महापुरात बुडू शकणार नाही.... मला हे जमवायला खूप वेळ लागला. आणि मला हा वेळ यासाठी लागला कारण मी अपेक्षा करत होती ...Read More

23

समर्पण - २३

साथ छूटता गया, रीश्ता तुटता गया। सवाँरने की कोशिश मे, सब बिख़रता गया। कधी कधी सत्य परिस्थिती आपण जेवढ्या स्वीकारतो तेवढं चांगलं असत आपल्यासाठी...आणि ते बरोबर ही असतं...प्रत्येक घडणाऱ्या गोष्टीत भावनाविवश होऊन चालत नाही...सगळं माहीत असूनही उगाच भावनांच्या उंबरठ्यावर येऊन अश्रू गाळण्यात काही अर्थ नसतो....पण दुर्दैवाने आज हे जे मी बोलत आहे त्यावेळी ते पचवायला जमलंच नाही.....माझ्या समोर दोन पर्याय होते एक आहे ती परिस्थिती स्वीकारणं आणि दुसरा सगळं काही सोडून लांब जाणं...पण ती परिस्थिती मला स्वीकारायला जड जात होती आणि लांब जायचा विचार केला होता पण माझ्या नशिबाला ते मंजूर नव्हतं.... असं म्हणतात प्रेम ही जगातली सगळ्यांत सुंदर ...Read More

24

समर्पण - २४

रंगरेज़ मेरे, रंगाकर रुह़ को मेरे, रंग छूडाने की कोशीश ना कर । थक गया है सब्र इंम्तेहान देते हराकर इसे, मुझे शर्मिंन्दा ना कर। माझ्या आयुष्यात जे काही घडलं त्यातून एक गोष्ट मी नक्कीच शिकली, ती म्हणजे 'संयम'...पण सगळं घडून गेल्यावर काय फायदा त्या 'उशिराने शिकलेल्या संयमाचा'...माझ्या आयुष्याच गणित फारच अवघड दिसत होतं मला, असं वाटत होतं हातात काहीच उरणार नाही आणि जे उरेल ते मी स्वीकारणार नाही...आणि आहे ती गोष्ट लवकर मान्य करायची नाही हीच माझी सगळ्यांत मोठी चूक....विक्रम माझ्यासाठी फक्त एक गोड स्वप्न होतं, आणि माझा मूर्खपणा हा होता की मला त्या स्वप्नातून बाहेर यायचं नव्हतं...आणि ...Read More

25

समर्पण - २५

मूखतिर होते ग़म के निशानो को, समझलीया मैने खुशी की आहट। काश समझ लेते ख़ामोशी अगर, तो अधुरी ना हमारी चाहत। खूप सोप्प असतं ना व्यक्त होणं....! प्रत्येक गोष्ट शब्दांत उतरवुन पोहचवण्यासाठी मला नाही वाटत जास्त कष्ट लागत असतील, मग कठीण काय आहे??? शब्दांची मदत न घेता, मनातलं जाणून घेणं आणि ते मनापर्यंत पोहोचवणं.... अतिशय कठीण काम....आणि माझ्याबाबतीत अशी सगळीच कठीण कामं जमायची विक्रमला, कदाचीत आताही जमत असेल...हो, कळत असेल माझी शांतता पण विचरण्याच 'कठीण काम' मात्र तो आता करत नाही आणि मीही ती अपेक्षा करत नाही...स्वतःचं गऱ्हाणं कोणासमोर मांडण हा विक्रमचा स्वभावच नाही. जेंव्हा तो आनंदी असायचा तेंव्हा ...Read More

26

समर्पण - २६

शाम की तन्हाई सी मै, राह दिखाता तू सितारा। मंजिल पाऊँ भी तो कैसे खो गया सारा उजियारा। आयुष्यच्या आपल्याला खूप लोक भेटतात, कोणी आपलं होऊन थांबत तर कोणी अनोळखी होऊन निघून जात...जे आपलं म्हणून थांबतात, त्यांना आपण जीव लावतो, त्यांना आपल्या आयुष्यात थांबावं यासाठी किती तडजोड ही करतो, पण ही 'आपली' असलेली माणसं राहतात का शेवटच्या श्वासापर्यंत आपल्यासोबत?? अर्थात आपली खूप ईच्छा असते की अश्या लोकांची साथ आपल्याला नेहमी मिळावी पण ईच्छा आणि वास्तविकता खूप वेगळी असतात....खर तर आपल्या आयुष्यात काही माणसं स्वतःहून सोडून जातात, काहींना आपण सोडून देतो आणि काहींना परिस्थिती दूर घेऊन जाते...माझ्या आणि विक्रमच्या वाटा ...Read More

27

समर्पण - २७

कुछ खाली सी, बोझल सी, बिखरीसी, बैचेनसी ज़िंदगी। तेरा दिया दर्द पलकों पर, तेरे गम से आबाद ज़िंदगी। आपण ही किती स्वार्थी असतो ना ! म्हणजे बघा ना, जोपर्यंत आपण एकटे असतो तोपर्यंत आपल्याला ना आनंदाचा भास होतो ना दुःखाची जाणीव होते...म्हणजे कस एकदम 'तटस्थ' असतो, तेंव्हा माहीत असत की आपल्या भावनांना आपणच आवर घालायचा आहे, त्यावेळी भावनाविवश होऊन कोणत्याच गोष्टींचा विचार करत नाही आपण, आणि त्यामुळेच दुःखाला कुरवाळत बसण्यापेक्षा योग्य निर्णय घेऊ शकतो......आणि जर कोणी व्यथा ऐकुन घेणारा मिळाला तर??? इथेच तर चुकतो आपण... व्यथा ऐकून घेणारा मिळाला तर आपल्या व्यथा वाढत जातात, जे छोटे मोठे दुःख आपण ...Read More

28

समर्पण - २८ (अंतिम भाग)

एक किनारा उस पार, एक किनारा इस पार है। इतनीसी दुरी दरमियाँ और, न खत्म होनेवाला इंतजार है। कधी खूप जवळ असूनही ते जे थोडसं अंतर असत ना तेच गाठू नाही शकत आपण...आणि ते थोडसं अंतर खूप काही शिकवून जात आपल्याला...विक्रम आणि माझ्या मधात तेच 'थोडसं अंतर' आहे आता...माझ्या आयुष्यातले सगळ्यांत अनमोल क्षण दिलेत विक्रमने मला आणि त्या सोबत दिला न विसरता येणारा भूतकाळ....त्या भूतकाळाला पचवण्याची शक्ती हळूहळू मी आत्मसात केली, किंवा वेळेनुसार त्या जखमा भरत गेल्या आणि त्या जखमांचे व्रण ही मी झाकून ठेवण्यात यशस्वी झाली परंतू असा अचानक विक्रम गायब होईल याची कल्पना केली नव्हती कधीच मी...काय ...Read More