नर्मदा परिक्रमा

(50)
  • 134k
  • 25
  • 65.1k

नर्मदा परिक्रमा भाग १ रेवा, अमरजा, मैकलकन्या अशी नावे धारण करणारी ही उत्तर भारत व दख्खन पठार यांच्या सीमेवरील खचदरीतून पश्चिमेकडे वाहणारी नदी. लांबी १,३१० किमी. व जलवाहन क्षेत्र ९८,४२० चौ. किमी. ही मध्य प्रदेश राज्यातील मैकल पर्वतश्रेणीच्या अमरकंटक पठारावर, सु. १,०५७ मी. उंचीवर एका झऱ्यातून उगम पावून त्या राज्यातून१,०७८ किमी. वाहते. नंतरचे ३२ किमी. ती मध्य प्रदेश व महाराष्ट्र आणि त्यानंतरचे ४० किमी. महाराष्ट्र व गुजरात राज्यांची सीमा बनते. शेवटचे १६० किमी. ती गुजरात राज्यातून जाऊन भडोचजवळ अरबी स

Full Novel

1

नर्मदा परिक्रमा - भाग १

नर्मदा परिक्रमा भाग १ रेवा, अमरजा, मैकलकन्या अशी नावे धारण करणारी ही उत्तर भारत व दख्खन पठार यांच्या सीमेवरील पश्चिमेकडे वाहणारी नदी. लांबी १,३१० किमी. व जलवाहन क्षेत्र ९८,४२० चौ. किमी. ही मध्य प्रदेश राज्यातील मैकल पर्वतश्रेणीच्या अमरकंटक पठारावर, सु. १,०५७ मी. उंचीवर एका झऱ्यातून उगम पावून त्या राज्यातून१,०७८ किमी. वाहते. नंतरचे ३२ किमी. ती मध्य प्रदेश व महाराष्ट्र आणि त्यानंतरचे ४० किमी. महाराष्ट्र व गुजरात राज्यांची सीमा बनते. शेवटचे १६० किमी. ती गुजरात राज्यातून जाऊन भडोचजवळ अरबी समुद्राच्या खंबायतच्या आखातास मिळते. दख्खन पठारावरील इतर नद्या सामान्यतः पूर्वेकडे वा आग्नेयेकडे वाहतात. परंतु तापीप्रमाणेच नर्मदाही पश्चिमवाहिनी आहे. तिच्या मार्गात अनेक ...Read More

2

नर्मदा परिक्रमा - भाग २

नर्मदा परिक्रमा भाग २ नर्मदा परिक्रमा म्हणजे नर्मदा नदीला प्रदक्षिणा घालणे. या परिक्रमेची सुरुवात परंपरेनुसार दरवर्षी चातुर्मास संपल्यावर म्हणजेच एकादशी झाल्यावर होते. रामायण,महाभारत तसेच पौराणिक ग्रंथांमधे नर्मदा नदीचे वर्णन आले आहे. या नदीच्या किनारी असलेल्या तीर्थक्षेत्रांना भेटी दिल्याने मानवाला पुण्य मिळते अशी श्रद्धा हिंदू धर्मात प्रचलित आहे. ही नदी कुमारिका स्वरूपात आहे अशी धारणा आहे. परिक्रमा धार्मिक अंगाने केली जात असली तरी वाटेत पावलोपावली भेटणारा निसर्ग परिक्रमावासीला अंतर्मुख होण्यापलीकडेही बरंच काही शिकवून जातो. या भूतलावर नर्मदा परिक्रमा ही मोठी प्रदक्षिणा आहे. श्री काशी क्षेत्राची पंचकोस, तर अयोध्या-मथुरा यांची चौऱ्याऐंशी कोस. नैमिपारण्य- जनकपुरी या सर्वाहून मोठी परिक्रमा म्हणजे नर्मदा नदीची ...Read More

3

नर्मदा परिक्रमा - भाग ३

नर्मदा परिक्रमा भाग ३ परिक्रमेची सुरुवात कुठूनही करता येते पण परिक्रमेची विधिवत सांगता करण्यासाठी ओमकारेश्वरला जावे लागते म्हणून साधारण परिक्रमावासी परिक्रमेची सुरुवात तिथूनच करतात. अमरकंटक पासून परिक्रमा सुरु करणाऱ्यांची संख्या सुद्धा भरपूर आहे . देवळात प्रदक्षिणा घालताना जसे आपण देवाला उजव्या हाताला ठेवून प्रदक्षिणा घालतो, तसेच परिक्रमेत सुद्धा मैय्या आपल्या उजव्या हाताला ठेवून परिक्रमा पूर्ण करायची असते. परिक्रमेत असताना कोणत्याही परिस्थिती मध्ये मैय्या ओलांडायची नसते. तसे केल्यास परिक्रमेचा भंग होतो आणि परत पहिल्यापासून परिक्रमा सुरु करावी लागते. परिक्रमा सुरु करण्याआधी आणि पूर्ण झाल्यानंतर क्षौर-म्हणजेच डोक्यावरचे केस आणि दाढी काढायची असते. तसेच परिक्रमेच्या काळात दाढी, केस आणि नखे कापणे वर्ज्य ...Read More

4

नर्मदा परिक्रमा - भाग ४

नर्मदा परिक्रमा भाग ४ नर्मदेच्या दक्षिण तटावरील राजघाट ते अंकलेश्र्वर दरम्यानच्या दीडशे किलोमीटर टापूतील शूलपाणीची तसेच उत्तरतटावरील गरुडेश्वर ते कोटेश्वर दरम्यानची जंगल-झाडीची वाट नर्मदेच्या तटानंच पार करतात . ह्या वाटेनं जाणाऱ्या परिक्रमावासींना त्या परिसरातील भिल्ल केवळ लुटतंच नाहीत तर अक्षरश: नागवतात. परंपरावादी लोकांच्या मते असं लुटवून घेणं हा परिक्रमेदरम्यानच्या वाटचालीतील अटळ-अपरिहार्य भाग असल्यानं तो अनुभव प्रत्येक परिक्रमावासीना घेण अगत्याच आहे. खरं तर हे भिल्ल लुटारू नाहीत ! ह्या परंपरेमागचं खरं कारण असं की, नर्मदा-परिक्रमा करत असताना परिक्रमावासीयांनी मोह, माया, आसक्ती, लोभ इत्यादींचा त्याग करणं अभिप्रेत आहे नि ते तसं सहजा-सहजी घडत नसल्यामुळे हा धडा गिरवण्याची नर्मदेच्या तटी अशी ‘सोय’ ...Read More

5

नर्मदा परिक्रमा - भाग ५

नर्मदा परिक्रमा भाग ५ श्रद्धापूर्वक नर्मदा परिक्रमा करीत असताना वारंवार असा अनुभव येतो की नर्मदा माता कायम आपल्या सोबत .अनेक संकटातून ती आपल्यला तारून नेत असते .अनेक लोकांनी केलेल्या परिक्रमेतील अनुभव आपल्यला थक्क करतात . एकदा चालायला सुरवात केल्यावर मनाचा कणखरपणा दाखवावा लागतो . रोज कमीतकमी ३५ किमी चालले तरच हा टप्पा तीन महिन्याच्या अवधीत पूर्ण होतो आणि तुम्ही निर्धारित वेळेस निर्धारित ठिकाणी पोचू शकता . प्रथम प्रथम रोज इतके चालण्याची सवय नसल्याने पायाला फोड सेप्टिक वगैरे होऊ शकते . रात्रीची जागा मिळेल तिथे, अंधारात, मंदिरात, उघडय़ावर, पारावर झोपावे लागते . हळू हळू वातावरणाशी समरसता होत जाते. तेथील वातावरण ...Read More

6

नर्मदा परीक्रमा - भाग ६

नर्मदा परिक्रमा भाग ६ परीक्रमेदरम्यान वेगवेगळ्या गावात असणार्या मंदिरांची आणि घाटांची त्याबद्दल असणार्या धार्मिक कथाची ओळख होत जाते. बारा घाट आहेत.सर्व घाट खुप साफ व सुंदर आहेत . नदीचे पाणीही सगळीकडे निर्मळ आहे . नर्मदा परिक्रमा चालू केली की नर्मदेला मैय्या असे संबोधले जाते . ओमकारेश्वरला जाताना वाटेत मुक्ताईनगर मध्ये संत मुक्ताबाईंचे मंदिर आहे .मुक्ताबाई त्या ठिकाणी कडाडणाऱ्या वीजेसोबत लुप्त झाली अशी आख्यायिका आहे . नेहेमी आपल्याला दत्त त्रिमूर्ती स्वरूपात दिसतो पण बडवानी येथे एकमुखी दत्ताचे मंदिर आहे . शहादा येथून पुढे जाताना वाटेत प्रकाशा येथे पुष्पदन्तेश्वर म्हणजे महादेवाचे देऊळ आहे . या ठिकाणी शिवमहिम्नाची रचना केली गेली आणि ...Read More

7

नर्मदा परिक्रमा - भाग ७ (अंतिम भाग)

नर्मदा परिक्रमा भाग ७ परिक्रमा तीन प्रकारे करता येते ,एक म्हणजे पैसे सोबत घेऊन वहानाने ,दुसरी अर्धी पायी अर्धी किनार्यांने आणि तिसरी म्हणजे पूर्ण पायी . पूर्ण पायी करताना सदाव्रत म्हणजे डाळ ,तांदूळ व शिधा भिक्षा मागून शिजवून खाणे . हे सदाव्रत नर्मदा किनार्यावरील शेतकरी आदिवासी व नावाडी बांधव देतात,ज्यांना स्वतःला उद्याची भ्रांत असते . दरवर्षी साधारण एक लाख भर लोक परिक्रमा करतात . त्यातील वीस ते पंचवीस हजार पायी परिक्रमा करतात . ही एकच यात्रा अशी आहे जी तुम्ही एक पैसाही सोबत न घेता करता येते . तुमच्या सर्व खर्चाची तरतूद मार्गातील ग्रामस्थांकडून केली जाते . पुन्हा कधी ...Read More