शिवकालीन ऐतिहासिक प्रेमकथा

(26)
  • 72k
  • 12
  • 31.8k

भाग २ - भेट प्रस्तुत शिवकालीन ऐतिहासिक प्रेमकथा हि इतिहासातील काही सत्य घटनांना कल्पनेची जोड देऊन लिहिलेली आहे. काही चुका अथवा आक्षेपार्ह आढळल्यास निदर्शनास आणून द्यावे आणि अभिप्राय कळवावे हि विनंती. भापकर पाटील हा गावचा बडा आसामी. शिवरायांनी मंजूर केलेल्या सारा पट्टी पेक्षा जास्त सारा गावकाऱ्यांकडून वसूल करायचा. आसपासच्या चार पाच वाड्या वस्त्याही त्याच्या अमलात होत्या. खोटे दस्तावेज बनवून शेतकरी अन व्यापाऱ्यांकडून जास्त पट्टी वसूल करायचा. कुस्तीचा खूप नाद, चार पाच मल्ल त्याने पोसलेले. अन त्यासाठी स्वतःचा आखाडा बनवलेला. शिवरायांनी स्वराज्यात घालून दिलेल्या नियमानुसार कुणालाही स्वतःची घोडी वा फौज बाळगण्याची परवानगी नव्हती. तरीही पाटलांनी स्वतःची वीस पंचवीस घोड्यांची पागा ठेवलेली

Full Novel

1

शूरसेनापती मुरारराव घोरपडे

(इतिहासातील सत्य घटनांना कल्पनेची जोड देऊन कथेमध्ये मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे. काही चुका किंवा आक्षेपार्ह आढळल्यास आपल्या प्रतिक्रियांमध्ये सांगावे मोठ्या मनाने माफ करावे हि विनंती.) गरगर गर तलवार फिरे ही, गनिमांचे निर्दालन करण्या l सह्याद्रीचा मर्द मराठा, रक्षण्या अभिमान झुंजला l कर्नाटकातील पहिल्या स्वारीत माधवराव पेशव्यांनी सरदार पटवर्धन, सेनापती मुरारराव घोरपडे, सरदार विंचूरकर, नारो महादेव यांच्या साथीत हैदरचा दारुण पराभव केला. अनवडीच्या लढाईत घोरपड्यांनी पराक्रमाची शर्थ केली. हैदरच्या सैन्याची दाणादाण उडवली. मराठ्यांचा गनिमी कावा काय असतो आणि मराठे जेव्हा लढतात तेव्हा त्यांचा त्वेष, त्यांचा जोश आणि त्यांची जिद्द काय असते..! हे घोरपड्यांनी हैदरला पुन्हा एकदा दाखवून दिले. हैदर ...Read More

2

भेट - भाग २

भाग २ - भेट प्रस्तुत शिवकालीन ऐतिहासिक प्रेमकथा हि इतिहासातील काही सत्य घटनांना कल्पनेची जोड देऊन लिहिलेली आहे. काही अथवा आक्षेपार्ह आढळल्यास निदर्शनास आणून द्यावे आणि अभिप्राय कळवावे हि विनंती. भापकर पाटील हा गावचा बडा आसामी. शिवरायांनी मंजूर केलेल्या सारा पट्टी पेक्षा जास्त सारा गावकाऱ्यांकडून वसूल करायचा. आसपासच्या चार पाच वाड्या वस्त्याही त्याच्या अमलात होत्या. खोटे दस्तावेज बनवून शेतकरी अन व्यापाऱ्यांकडून जास्त पट्टी वसूल करायचा. कुस्तीचा खूप नाद, चार पाच मल्ल त्याने पोसलेले. अन त्यासाठी स्वतःचा आखाडा बनवलेला. शिवरायांनी स्वराज्यात घालून दिलेल्या नियमानुसार कुणालाही स्वतःची घोडी वा फौज बाळगण्याची परवानगी नव्हती. तरीही पाटलांनी स्वतःची वीस पंचवीस घोड्यांची पागा ठेवलेली ...Read More

3

कुस्ती - भाग ३

भाग ३ - कुस्ती प्रस्तुत शिवकालीन ऐतिहासिक प्रेमकथा हि इतिहासातील काही सत्य घटनांना कल्पनेची जोड देऊन लिहिलेली आहे. काही अथवा आक्षेपार्ह आढळल्यास निदर्शनास आणून द्यावे आणि अभिप्राय कळवावे हि विनंती. एका रात्री पारू या तिची जिवलग मैत्रीण चंदाला घेऊन शिवाच्या रानातील खोपटात रात्रीच त्याला भेटायला आली होती. बाहेर चंदाला लक्ष ठेवायला सांगून ती हळूच खोपटात शिरली. बाजेवर उघड्या अंगाचा शिवा, छताला पडलेल्या बिळातून चंद्राचा प्रकाश हातात घेत काहीतरी पुटपुटत होता. शिवाचं पिळदार सावळं रूप पारू डोळ्यांनीच पिऊ पाहत होती. ती त्याच्या डोक्याजवळ हळूच सरकली अन हातांनी शिवाचे डोळे झाकले. अचानक असा कोमल स्पर्श आपल्या डोळ्यांना कसा काय झाला म्हणून ...Read More

4

स्वराज्यकार्याची संधी - भाग ४

भाग ४ - स्वराज्यकार्याची संधी प्रस्तुत शिवकालीन ऐतिहासिक प्रेमकथा हि इतिहासातील काही सत्य घटनांना कल्पनेची जोड देऊन लिहिलेली आहे. चुका अथवा आक्षेपार्ह आढळल्यास निदर्शनास आणून द्यावे आणि अभिप्राय कळवावे हि विनंती. समोर धुरळा उडाला, शिवाला हे अनपेक्षित होतं. अन त्याच क्षणी त्याच्या कमरेला कुणीतरी विळखा घालून त्याला खाली पाडण्याचा प्रयत्न करू पाहत होतं. अन झालंही तसंच मावळ्याने शिवाला पायात पाय घालून जमिनीवर पालथा पाडला अन त्याच्या पाठीवर बसला. शिवाचे दोन्ही हात धरून त्याला पाठीवर कलवण्याचा प्रयत्न करू लागला. शिवाच्या नाका तोंडात माती जाऊ लागली. एक दोन वेळा मावळ्याने शिवाला फिरवण्याचा प्रयत्न केला. शिवाही जोर लावून त्याला प्रतिकार करत होता. त्याची ...Read More

5

राजगडावर आगमन - भाग ५

भाग ५ - राजगडावर आगमन प्रस्तुत शिवकालीन ऐतिहासिक प्रेमकथा हि इतिहासातील काही सत्य घटनांना कल्पनेची जोड देऊन लिहिलेली आहे. चुका अथवा आक्षेपार्ह आढळल्यास निदर्शनास आणून द्यावे आणि अभिप्राय कळवावे हि विनंती. रात्रभर पारू शिवाच्या कुशीत मुसमुसत होती. पहाट होऊ लागली होती. पारूची मैत्रीण पलीकडच्या बांधावर असलेल्या दगडावर पेंगत होती. शिवाच्या बाहुपाशातून स्वतःला सोडवत पारू अलग झाली. दोघांचेही डोळे पाण्यानं डबडबले होते. एकमेकांशिवाय एक दिवसही न राहू शकणारे शिवा पारू, आता पुनःभेटीसाठी किती दिवस लागतील, या विचाराने व्यतिथ झाले होते. पारुने पुन्हा शिवाला मिठी मारली अन हमसाहमशी रडू लागली. शिवाने तिच्या काळ्याभोर डोळ्यांमध्ये पाहिलं.हातांनी डोळे पुसले अन म्हणाला, "अगं वेडाबाई.. मी ...Read More

6

दुख्खद वार्ता - भाग ७

भाग ७ - दुख्खद वार्ता प्रस्तुत शिवकालीन ऐतिहासिक प्रेमकथा हि इतिहासातील काही सत्य घटनांना कल्पनेची जोड देऊन लिहिलेली आहे. चुका अथवा आक्षेपार्ह आढळल्यास निदर्शनास आणून द्यावे आणि अभिप्राय कळवावे हि विनंती. शास्ताखानाची मोहीम फत्ते झाली होती. चारपाचशे मुघल कापले गेले होते तर पाच पन्नास मावळे कामी आले होते. पण शास्ता खानाला जीवानिशी मारता आले नाही, म्हणून राजे जरा विचारात पडले होते. कारण, अजून जर खान थांबला तर मात्र स्वराज्यातील जनतेला होणार त्रास कसा थांबवावा? दुसऱ्या दिवशी जखम दरबारामध्ये खानाच्या छाप्यामध्ये कामी आलेल्या मावळ्यांची नावे वाचून दाखवली जात होती. शिवा पांढरेचं नाव ऐकताच येसाजी कंकांच्या डोळ्यांत अश्रू दाटले. पथकातील तरबेज ...Read More

7

शर्थ - भाग ८

भाग ८ - शर्थ प्रस्तुत शिवकालीन ऐतिहासिक प्रेमकथा हि इतिहासातील काही सत्य घटनांना कल्पनेची जोड देऊन लिहिलेली आहे. काही अथवा आक्षेपार्ह आढळल्यास निदर्शनास आणून द्यावे आणि अभिप्राय कळवावे हि विनंती. येसाजींनी घडलेला प्रसंग सान्गायला सुरुवात केली. 'येसाजींबरोबर असलेले पन्नास एक मावळे चारा भरलेल्या वीस पंचवीस बैल गाड्या घेऊन पुण्यात घुसले. अन मोक्याच्या ठिकाणी दबा धरून बसले. ठरलेल्या वक्ताला हर हर महादेव च्या आरोळ्या घुमू लागल्या. राजांपाठोपाठ येसाजी अन त्याचे मावळे, लाल महालात घुसले. एकच कापाकापी सुरु झाली. समोर येईल त्याला कापलं जात होतं. सगळीकडे आरडा ओरडा, गोंधळ अन पळापळ चालू होती. शिवा महालाखाली येणाऱ्या शत्रू सैन्याला सपासप कापून काढत होता. ...Read More

8

संकटांवर मात - भाग ९

भाग ९ - संकटांवर मात प्रस्तुत शिवकालीन ऐतिहासिक प्रेमकथा हि इतिहासातील काही सत्य घटनांना कल्पनेची जोड देऊन लिहिलेली आहे. चुका अथवा आक्षेपार्ह आढळल्यास निदर्शनास आणून द्यावे आणि अभिप्राय कळवावे हि विनंती. राजांच्या पायाला स्पर्श करणार तोच राजांनी त्याच्या खांद्याला पकडलं अन म्हणाले, शिवा ss .. अरे कुठे होतास तू? अन अशाही अवस्थेत तू गड चढून आलास. कशी रे ??? कशी एवढी हिम्मत येते तुमच्यात.? राजांनी शिवाला घट्ट आलिंगन दिले. हातातलं सोनेरी कडं काढलं अन शिवाच्या उजव्या मनगटात घातलं. राजं... जन्माचं सार्थक झालं बगा माझ्या... तुमच्या हातून ह्यो मानमरातब. आन तुम्ही या गरीबाला छातीशी कवटाळलंत... आणखी काय पायजे आमास्नी... तुमच्यासाठी एक काय ...Read More