रहस्य सप्तसुरांच

(183)
  • 177.7k
  • 31
  • 107.1k

रात्री १२ ची वेळ ..... अभिषेक त्याच्या बाईकवरून एकटाच येत होता. रस्त्यावरून कोणीही नाही.... फक्त आणि फक्त त्याचीच बाईक धावत होती रस्त्यावरून......... त्यात मुसळधार पाऊस कोसळत होता.... रस्त्यावरचे खड्डे चुकवत अभिषेक बाईक चालवत होता. रेनकोट घातलेला असला तरी पूर्णपणे भिजून गेलेला होता.... रस्त्यावरचे दिवे तर आतमध्ये पाणी गेल्याने काही ठिकाणी बंदच होते. अर्ध्या रस्त्यावर प्रकाश तर अर्ध्या रस्ता काळोखात बुडालेला.... वीजही मधेच कडाडत होती... त्यामुळे एक वेगळचं भीतीदायक वातावरण निर्माण झालं होतं.... तरीही अभिषेक घरी यायला निघाला होता.... उशीरच झाला होता त्याला.... कसाबसा अभिषेक त्याच्या एरियात पोहोचला. तिथेही काही वेगळ वातावरण नव्हतं... हवा सुटलेली... त्यात मुसळधार पाऊस ... वीज तर

Full Novel

1

रहस्य सप्तसुरांच ( भाग १ )

रात्री १२ ची वेळ ..... अभिषेक त्याच्या बाईकवरून एकटाच येत होता. रस्त्यावरून कोणीही नाही.... फक्त आणि फक्त त्याचीच बाईक होती रस्त्यावरून......... त्यात मुसळधार पाऊस कोसळत होता.... रस्त्यावरचे खड्डे चुकवत अभिषेक बाईक चालवत होता. रेनकोट घातलेला असला तरी पूर्णपणे भिजून गेलेला होता.... रस्त्यावरचे दिवे तर आतमध्ये पाणी गेल्याने काही ठिकाणी बंदच होते. अर्ध्या रस्त्यावर प्रकाश तर अर्ध्या रस्ता काळोखात बुडालेला.... वीजही मधेच कडाडत होती... त्यामुळे एक वेगळचं भीतीदायक वातावरण निर्माण झालं होतं.... तरीही अभिषेक घरी यायला निघाला होता.... उशीरच झाला होता त्याला.... कसाबसा अभिषेक त्याच्या एरियात पोहोचला. तिथेही काही वेगळ वातावरण नव्हतं... हवा सुटलेली... त्यात मुसळधार पाऊस ... वीज तर ...Read More

2

रहस्य सप्तसुरांच ( भाग २ )

दुसरा दिवस उजाडला.... छान झोप झाली होती. रात्री पार्टीही उशिरापर्यंत चालली होती आणि आज सुट्टीचा दिवस... रोज सकाळी लवकर अभी... आज सकाळी १० वाजता उठला... छान फ्रेश वाटतं होतं त्याला, सुट्टी असल्याने आणि वाढदिवस... मूड चांगला होता, कुठेतरी बाहेर जाऊया फिरायला असा त्याने मनात plan केला. अंघोळ करून तो तयार झाला. सगळ्या कुटुंबाला आपला plan सांगणार इतक्यात त्याचा mobile वाजला,पोलिस स्टेशन मधून call होता, " हेलो... बोला काय झालं ? " , अभिषेकने विचारलं, " हेलो सर.... प्रसिद्ध संगीतकार " सागर " यांचा खून झाला आहे.. तुम्हाला लवकर यावं लागेल... त्यांच्या घरी.. ", " ठीक आहे.. निघतोच मी." सगळा ...Read More

3

रहस्य सप्तसुरांच ( भाग ३ )

आणि अजून काही मिळालं का तुला तिकडे अभी.. , बाकी काहीच नाही... ना बोटांचे ठसे.... ना पुरावे... मिळालं ते letter आणि तोच मजकूर.... संगीतातले सात सूर कधीच वेगळे राहू शकत नाहीत... सप्तसुरांना मी एकत्र करणार... पुन्हा कश्यासाठी खून होत आहेत ते कळतच नाही आहे. सागरप्रमाणे रेशमा यांचाही खून त्यांच्या वाढदिवसाच्या आदल्या दिवशी झाला होता.... दोन्ही खुनात खूप साम्य होतं.... खून रात्रीचाच झाला होता, साधारण ३-४ च्या दरम्यान... CCTV बंद करून..... वाढदिवसासाठी आलेले पाहुणे, त्यातही कोणीच नव्हतं.. संशय घेण्यासारखं... एका महिन्यात २ प्रसिद्ध व्यक्तीची हत्या आणि अभिषेक व डॉक्टर महेश या दोघानाही आरोपीला पकडण्यात यश आलं ...Read More

4

रहस्य सप्तसुरांच (भाग ४)

रिपोर्ट काही वेगळा नव्हता... तीच वेळ खून करण्याची... पण यावेळेस तिथे मिठाईचा बॉक्स सापडला होता, काय सापडलं मध्ये.. ? , मिठाईत नाही, त्याच्यावर सापडलं.. , काय , मलाही तेच वाटत होतं कि पावडर मिठाईत mix करून दिली असणार... पण त्याने मिठाईवर पावडर टाकून त्यांना खायला दिली असेल.... , असं होय.... , बाकी काही मिळाला का पुरावा वगैरे.. , नाही रे... खूनी भलताच हुशार आहे... काहीच मागे ठेवत नाही.. , अरे हो... एक सांगायचं राहून गेलं तुला. तसा महेश उठला आणि एक पेन घेऊन आला.. हे काय ? ...Read More

5

रहस्य सप्तसुरांच ( भाग ५)

पहिली गोष्ट... खून हा रात्रीचाच होतो, ३ ते ४ दरम्यान... आरोपीला science ची चांगली माहिती आहे. Plaster of Paris दुधात किंवा दुधापासून बनवलेल्या पदार्थात mix केलं कि त्याचं slow poison तयार होते, हे त्याला माहित आहे. तेच देऊन तो लोकांना मारतो, त्यानंतर त्यांच्याच पिस्तुल मधून गोळीही मारतो.... दुसरी गोष्ट, आरोपी ओळखीचाच असणार.. कारण येवढ्या रात्रीचा एखाद्याच्या खोलीत जाणार... तेही दरवाजाचा lock न तोडता... मग तो ओळखीचाच असणार... शिवाय कोणतेही फिंगर प्रिंट्स मिळत नाहीत. याचा अर्थ तो कुठेही स्पर्श करत नसणार किंवा हातात glove घालत असणार.... कोणतेच पुरावे मागे ठेवत नाही,CCTV कॅमेरे बंद करतो. म्हणजेच त्याला पोलिसांची आणि ते ...Read More

6

रहस्य सप्तसुरांच ( भाग ६)

त्यादिवशी त्याला करमतच नव्हतं. रात्रीही तो तळमळतच होता. किती वाजता झोप लागली माहित नाही, परंतु त्याला जाग आली ती रिंगमुळे... त्याला माहित होतं कि call कसला असणार.... आणि तोच call होता... हेलो अभी... .... पण या वेळेस महेशचा call होता... हा महेश... बोल.. , आपला अंदाज चुकला रे.. , कसा काय ? , तुला इतिहास संशोधक धनंजय माहित आहेत ना... , हो.. , त्यांचा खून झाला आहे... त्या बातमीने अभीची झोपच उडाली... तू पोहोच तिथे, मी येतो लगेचच... ,अभीने फोन कट्ट केला आणि तसाच झटपट तयारी करून घटनास्थळी पोहोचला... ...Read More

7

रहस्य सप्तसुरांच ( भाग ७)

अरे... तो नीरज पेन आणि वही इकडेच विसरून गेला. महेश म्हणाला... आता काही खरं नाही madam ची वही आणि पेन इकडेच विसरला लेकाचा.. तसे दोघे हसायला लागले.. खूप दिवसांनी हसत होते दोघे मिळून. ... चल... आता खूप रात्र झाली आहे, घरी जाऊया. महेश बोलला, हो.. हो…चल.. असं म्हणत त्याने टेबलावरचे सगळे कागदपत्र, फोटो .. त्याच्या bag मध्ये टाकले. अरे, त्या madam ची वही आणि पेनाच काय करायच.. अभीने विचारलं... जा घेऊन घरी... तुझ्या भावाला उपयोगी पडेल ते.... कदाचित तोही लेखक होईल.. हसतच महेश बोलला, तसं अभीने सगळं घरी आणलं.. ...Read More

8

रहस्य सप्तसुरांच ( भाग ८)

त्याला जर या सर्वांचे खून करायचे असते तर त्याने इतकी घाई केली नसती, म्हणजेच त्याला सगळ्यांना एका वर्षातच मारायचे पहिला खून जुलै महिन्यात झाला... म्हणजेच येत्या जूनपर्यंत त्याला नीलम यांना माराव लागेल... पण त्यांचा वाढदिवस कधी असतो ते कळलं तर बर होईल आपल्याला.... , अभी... त्या कोण आहेत हे सुद्धा माहित नाही, त्या कशा दिसतात हे माहित नाही. मग तू कसा वाचवणार त्यांना ? , मला वाटते , आपण वृत्तपत्र संपादकांना याबद्दल विचारायला हवं, त्यांना १२ वर्षापूर्वीची माहिती असेलच ना.. तसे ते दोघेही एका वृत्तपत्र कार्यालयात पोहोचले आणि त्याच्या संपादकाला भेटले. ...Read More

9

रहस्य सप्तसुरांच ( भाग ९)

काय रे काय झालं एवढं... ? लगेचच महेशने त्याला पेनाची रिफील दाखवली. तू म्हणत होतास सवय कोणतीही असो .... एकदा लागली कि लागली.... आणि हि रिफील सुद्धा तशीच कट केली आहे. , याचा अर्थ ? खून त्या लेखिका करत आहेत ? त्यांचाच पेन आहे ना , काही कळत नाही… पण त्या तर बोलल्या काही मदत लागली तर contact करा ..... मग त्या कश्या खून करू शकतील ? , आता काय करायचं ... पुण्याला जायचं का ? , ते नंतर..... कारण शेवटची व्यक्ती नीलम कोण आहेत ते तरी कळलं पाहिजे ...Read More

10

रहस्य सप्तसुरांच ( भाग १०)

महेश .... तू आत जाऊन madam ला बाहेर घेऊन ये.. त्यांना सुरक्षित ठिकाणी घेऊन जाऊया... महेश धावतच आत.. अचानक महेशचा आवाज आला, अभी लवकर आत ये.. अभिने नीरजची कॉलर पकडली आणि त्याला आत घेऊन आला.. समोर बघतो तर सुप्रिया यांचा खून झाला होता.. अभिने नीरजला एका खुर्चीवर बसायला सांगितले... नीरज निमूटपणे जाऊन बसला... महेश आणि अभी , दोघेही हताशपणे मृत शरीराकडे पाहत होते... Well Done , inspector अभिषेक आणि तुला सुद्धा शाबासकी Doctor महेश... तुम्हा दोघांबद्दल खूप ऐकलं होतं.. आज त्याचा अनुभवसुद्धा घेतला... नीरज म्हणाला... Shut up ... अभी रागातच म्हणाला... ...Read More