सरताज... कथा वेड्या प्रेमाची - भाग 2

  • 198

भाग २रात्रीचे साडेअकरा वाजले होते.खोलीत फक्त टेबल लॅम्पचा पिवळसर प्रकाश होता. शर्वाणी लॅपटॉपसमोर बसली होती. स्क्रीनवर कालच्या निरीक्षणांच्या नोट्स होत्या.एकामागून एक कैद्यांची नावं. त्यांच्याबद्दलच्या नोंदी.वागणं.बोलणं.प्रतिक्रिया.सगळं व्यवस्थित.तिची नजर खाली सरकत गेली. आणि एका नावापाशी येऊन थांबली.कैदी क्रमांक ४१२ — सरताज सिंगपानावर फारसं काही नव्हतं. तीच गोष्ट तिला खटकत होती.दिवसभरात तिने दहा-बारा कैद्यांच्या मुलाखती घेतल्या होत्या.पण सर्वात जास्त वेळ तिच्या डोक्यात कोण राहिला होता?तो.....जो एक शब्दही बोलला नव्हता.शर्वाणी खुर्चीत मागे रेलली. ज्याच्याशी एक वाक्यही बोलणं झालेलं नाही...त्याच्याबद्दल एवढा विचार का करायचा? तिने लॅपटॉप बंद केला.पण झोपायला गेल्यावरही तिच्या डोळ्यांसमोर पुन्हा तेच दृश्य आलं.खिडकीतून येणारा उजेड.पुस्तक धरलेला हात.आणि काही क्षणांसाठी सावलीतून बाहेर आलेली