आदर्श शिक्षक

  • 1.6k
  • 492

आदर्श शिक्षक या पुस्तकाविषयी        आदर्श शिक्षक ही माझी कादंबरी. ही कादंबरी शिक्षक दिनालाच साकार झालेली असून साहित्यातील एक वेगळाच वलय व अनुभव घेवून आलेली कादंबरी आहे. यात पुरस्कार कसा मिळू शकतो. याचं उहापोह करणारं कथानक या कादंबरीत आहे. आदर्श शिक्षक पुरस्कार हे आदर्श शिक्षकांना मिळणारच. परंतु खरा आदर्श शिक्षक कोण? हे या कादंबरीतून नक्कीच समजून येवू शकतं.          या कादंबरीतील कथानक थोडंसं वेगळंच असून यात काही भावनाप्रधान दृश्यांचा समावेश करण्यात आलेला आहे. हेच भावनाप्रधान दृश्य वा कथानक वाचकांना खिळवून ठेवू शकतील. कधीकधी रडवूही शकतील, ते दृश्य त्यांनाच रडवू शकेल की जे खरंच मूळरुपात भावनाप्रधान आहेत.