नियती पुन्हा हाक देईपर्यंत.. - 8

  • 372
  • 84

Chapter 8 – अनपेक्षित क्षणदिवस नेहमीसारखाच सुरू झाला होता.ऑफिसमध्ये कामाचा नेहमीचा गोंधळ होता. कुणाचे फोन सुरू होते, कुणी ई-मेल्समध्ये व्यस्त होतं, तर कुणी deadline पूर्ण करण्यासाठी घाई करत होतं.ताराही आपल्या कामात गुंतलेली होती.पण तिच्या मनात एक गोष्ट मात्र शांतपणे चालू होती.ती स्वतःला बदलत होती.कालपर्यंत ज्या प्रत्येक गोष्टीत तिला ध्रुवची आठवण यायची, त्याच गोष्टींकडे आता ती थोड्या वेगळ्या नजरेने पाहत होती.त्याची आठवण अजूनही होती.कमी झालेली नव्हती.पण त्या आठवणीने तिचं आयुष्य थांबवणं तिने बंद केलं होतं.दुपारच्या वेळी स्नेहा तिच्या टेबलाजवळ आली."काय गं? आज खूप शांत आहेस."तारा हसली."मी नेहमी एवढी बोलते का?""तू बोलत नाहीस तेव्हाच जास्त कळतं की काहीतरी चाललंय."तारा काही क्षण शांत