प्रस्तावना:नमस्कार, आज आपण झपूर्झा ह्या कवितेचे रसग्रहण करूयात. ही कवी केशवसुतांची म्हणजेच कृष्णाजी केशव दामले ह्यांची एक प्रसिद्ध कविता आहे. आजच्या काळातल्या लयबद्ध गीतांना लाजवेल अशी सुंदर लय व ताल ह्या कवितेला आहे. केशवसुतांना आधुनिक मराठी कवितेचे जनक म्हटले जाते. त्यांच्या कवितांनी मराठी साहित्य क्षेत्राला नवी दिशा दिली. माझ्या आवडत्या कवितांपैकी असलेल्या ह्या कवितेने मी ह्या मालिकेला सुरूवात करणार आहे. कुठल्याही काव्याला गद्य रूपात आणल्यावर त्याची तीव्रता कमी होऊ शकते व जे म्हणायचे आहे त्याचा अर्थ बदलू शकतो, हा धोका लक्षात घेऊनच मी माझे रसग्रहण मांडतो आहे.© मंदार कुळकर्णी, 2026सुरूवात:कवितेच्या शीर्षकापासून सुरूवात करूयात. मराठी, प्राकृत अथवा संस्कृत ह्यांपैकी कुठल्याही भाषेच्या