Mr. Money - भाग 7

  • 153

मुखीने मिस्टर मनीच्या साम्राज्यात पाऊल ठेवल्याला आता दोन महिने झाले होते. या दोन महिन्यांत तिने आपल्या अफाट बुद्धिमत्तेच्या, कौशल्याच्या आणि भाषेवरील प्रभुत्वाच्या जोरावर मनीच्या आंतरराष्ट्रीय व्यवसायाला एका नव्या उंचीवर नेले होते. दुबईचे सोने व्यापारी असोत, बँकॉकचे शस्त्रास्त्र पुरवठादार असोत की रशियन माफिया, मुखीने प्रत्येक क्लायंटशी अत्यंत चोख आणि फायद्याच्या डील्स करून दिल्या होत्या. रोहित आता तिच्या कामावर पूर्णपणे विसंबून राहू लागला होता, आणि विक्रमसारखा संशयी बॉडीगार्डही तिच्या उपस्थितीला सरावला होता.मनीच्या त्या अभेद्य किल्ल्यात राहून मुखीने आपले खरे कामही अत्यंत हुशारीने सुरू ठेवले होते. तिच्या पर्समध्ये, घड्याळात आणि पेनमध्ये लपवलेले गुप्त ट्रान्समिटर्स आणि हॅकिंग उपकरणांच्या मदतीने ती मनीच्या साम्राज्याची माहिती, त्याचे