शापित गर्भ : जन्म की मृत्यू लेखन : अविनाश शांताबाई भिमराव ढळे : एक अश्वस्थामा ----------------------------------------- भाग २ : आरशाच्या पलीकडचं सत्यमागील भागात...जुन्या बंगल्यात पहिली रात्र घालवत असताना आर्यनला आरशात स्वतःचं प्रतिबिंब वेगळं वागताना दिसलं. वरचा मजलाच नसलेल्या घरातून लहान मुलाच्या पावलांचा आवाज ऐकू आला. एका जुन्या छायाचित्रामागे लिहिलेला इशारा त्याच्या मनात घर करून बसला, "त्याला कधीही आरशासमोर एकटं सोडू नका." आणि शेवटी... आरशात एक अनोळखी गर्भवती स्त्री दिसली. त्याच क्षणी मोबाईलवर संदेश आला—"तुझी पत्नी तीन तासांपूर्वी या पत्त्यावर आली आहे..."-----------------------------------------आर्यनचा श्वास जणू छातीतच अडकला.मोबाईलच्या स्क्रीनवर तो संदेश अजूनही चमकत होता."तुझी पत्नी