शापित गर्भ : जन्म की मृत्यू लेखन : अविनाश शांताबाई भिमराव ढळे : एक अश्वस्थामा भाग - १रात्रीचे नेमके दोन वाजून सतरा मिनिटे.भिंतीवरच्या जुन्या घड्याळाचा काटा पुढे सरकत होता. प्रत्येक टिक... टिक... टिक... त्या घराच्या शांततेला जखम करत होती.पाऊस नुकताच थांबला होता. खिडकीबाहेरून ओलसर वाऱ्याची झुळूक आत येत होती. घरभर मातीचा गंध पसरला होता. दूरवर एखादा कुत्रा अधूनमधून भुंकत होता आणि पुन्हा सगळीकडे शांतता पसरत होती.आर्यनला झोप लागत नव्हती.गेल्या सात दिवसांपासून त्याची झोप हरवली होती.तो पुन्हा एकदा उठला. स्वयंपाकघरात जाऊन पाण्याचा ग्लास भरला. थंड पाणी घशातून खाली उतरलं, पण मनात उसळणारी अस्वस्थता काही कमी झाली नाही."हे फक्त तुझ्या मनाचे