अविवाहित आई - 3

  • 387
  • 147

भाग ३ अजित रावांच्या आलिशान ऑफिसमध्ये असलेल्या केबिनमध्ये बाहेरच्या गजबजाटाचा एकही आवाज पोहोचत नव्हता. अनघा समोरच्या लेदरच्या खुर्चीवर बसली होती, तिचे पाय उत्साहाने हलत होते. तिने काही दिवसांपासून प्लॅन केलेल्या माऊंट अबूच्या सहलीची बातमी बाबांना सांगण्यासाठी ती आत आली होती. तिच्या डोळ्यांत स्वप्नांची चमक होती."कोण, कोण जाणार आहे, तुझ्यासोबत?" अजित रावांनी फाईलवरची नजर न हटवता प्रश्न विचारला. त्यांचा आवाज नेहमीप्रमाणेच थंड आणि शिस्तबद्ध होता, ज्याने अनघाच्या उत्साहावर नकळत विरजण पडले."बाबा, माझा पूर्ण ग्रूप जाणार आहे. वैभवी, सौम्या, तरुण, किशोर, अमोल आणि मी," अनघाने शांतपणे पण आत्मविश्वासाने माहिती दिली.अनघा सगळ्यांची नावं घेते, तेव्हा अजित राव एक महत्त्वाची फाईल बघत असतात. पण ती