आर्या ( भाग १५ )

     ( पाच वर्षानंतर )    सकाळी सकाळी श्वेता ची आवराआवर चालू असते. आठ वाजले असतात , ती जोरजोरात अनुराग ... अनुराग.. अनुराग अरे...उठा रे! किती रोज रोज त्रास देता मला तुम्ही तिघे ! प्रिन्सी आणि अनुराग जागे असतात , ते बेडवर झोपून राहिल्याची नक्कल करत असतात . दोघे ही हळूच डोळ्यांवरून ब्लँकेट खाली करून हसत असतात.अनुराग मुद्दाम हून श्वेताला चिडवण्यासाठी नाटक करत असे ! आणि नेहमीच प्रिन्सी त्याच्या प्रत्येक क्राइम मध्ये त्याची क्राइम पार्टनर म्हणून साथ देत असे!खरंतर आज नेहमी पेक्षा जास्त आरडा ओरड या साठी चालु होता कारण आर्या आज सहा वर्षांची होणार होती ! आणि प्रत्येक वर्षाप्रमाणे