जाणता अजाणता

  • 255
  • 75

मानस..?मानस!! काय करतोयस?" मानस बसलेला दिसला कॉलेज समोरच्या गवतावर, म्हणून त्याच्याकडे गेले. सतत काही ना काही करत असतो. तो तसं करताना कित्ती तल्लीन असतो. एकदम स्वयंमग्न. आणि तल्लीन असताना त्याच्या चेहऱ्यावर असणारा गंभीर भाव आणि कपाळावर मध्ये तानलेली शीर.. उफ्फ काय रुबाबदार दिसतो त्यामुळे. पुन्हा त्याचे ते मऊ केस. कसे हलक्या वाऱ्यावर हलत कपाळावर घुटमळत असतात. थंडीतल्या कोवळ्या उन्हाने पण चेहरा  लाल झालाय. मला राहवतच नाही अशावेळी. मी सरळ त्याला जाऊन डिस्टरब करते. तो सुद्धा कधीच माझ्यावर रागवत नाही तसं करण्यान. उलटं माझ्या प्रश्नांना किती समंजस पणे स्वतःची एकाग्रता न ढळू देता उत्तरे देतो."काही नाही गं.. रेवदंडे सरांनी उद्याच्या व्याख्याणासाठी