" Yeah Mike!! Yeah.. Yeah.. Right.. That memory of incident is still as fresh as a dew drop man.. "....Give my regards to Kevin and Martha.And Happy new year to you guys.. Enjoy the party !!..take care.. C ya!!"एवढं बोलून मी call कट केला. आम्ही जवळजवळ पंधरा मिनिटे बोलत होतो. मला Mike ने त्याच्या कामाबद्दल फॅमिली बद्दल..आत्ताच होऊन गेलेल्या ख्रिसमसबद्दल भरपूर अपडेट्स सांगितले. दोन मिनिटे त्याची बायको मार्था आणि विशितला मुलगा केविनसुद्धा माझ्याशी बोलले. " कोण होतं? " गॅलरीत येत बायकोने विचारलं."Mike!" मी म्हणालो." तो अमेरिकन ? अरे हो !! आज 31 डिसेंबर नाही का? दर वर्षी आज call करतोच Mike."