"मी नाही पाहिलंय कोणाच्याच घरी असं.. आपल्या इथंच काये रे हे बाबा... असं कोणी करतं का?" सान्वी आलोकला विचारत होती.आठ नऊ वर्षांच्या चिमुरडीला काय उत्तर द्यावं याची जुळवाजुळव आलोकला अजूनही करता येत नव्हती. दोघे कार मध्यें बसून घरी येत होते. तिला तिच्या आजी आजोबांच्या घरून आलोक घेऊन येत होता.सान्वीचे प्रश्न संपत नव्हते आणि आलोकची निरुत्तर अवस्था देखील. शेवटी आता कसं समजवावं सान्वीला याचा विचार करत आलोक चमकला. एक कल्पना त्याला सुचली. "सानू तुला मी एक story सांगू?" त्याने तिचे बोलणे मधेच अडवत विचारले."स्टोरी? Wow!! सांग कि बाबा." सान्वी उत्साहात म्हणाली. लहान मुलांच्या उत्साहाचा प्रवाह किती सहज वळवता येतो."तर... एका झाडावर ना