कोंदण पर्व एक - भाग 32

  • 1.7k
  • 669

ती उन्हाळी तास सुरु असताना शाळेत फक्त दहावीची मुले येत होती. त्यामुळे शाळा अशी मोकळी मोकळी वाटायची. जाडू आणि मी घरून एकत्रच निघायचो आणि घरी पण एकत्रच जायचो. दोन आठवडे झाले होते तास सुरु होऊन सकाळी साडे नऊला पाच दहा मिनिटे कमी असताना जाडू माझ्याकडे यायचा. मग मी त्याच्यासोबत निघायचे.त्यादिवशीही तो आला. पण एकटा नाही."सुने! ही श्वेता. आपल्या शाळेत यावर्षी ऍडमिशन घेतलंय. बाबांच्या ऑफिसमध्ये हिचे बाबा बदली होऊन आलेत. आपल्या घराजवळच आलेत हे सगळे रहायला. पहिला दिवस आहे म्हणून माझ्यासोबत आलीये. आणि हो.. आपल्या क्लास मधेच ऍडमिशन बरं का. आधी पण संस्कृत असल्यामुळे preference मिळाला तीला." जाडू सायकलवर बसून म्हणाला.मी श्वेताकडे