सुनी त्यावर्षीची आमची वार्षिक परीक्षा दहावीच्या परीक्षेचा पाया होती. माझा नववीचा अभ्यास नीट उरकल्यामुळे मला पेपर परीक्षेत उत्तम गेले. यावेळी तर गणितात पैकीच्या पैकी पडतील असा माझा आत्मविश्वास होता. आमचे निकाल लगेचच लावण्यात आले. यावेळी मी तिसरी आले होते आणि रामदास दुसरा. जाडू परत अव्वल आला होता.. सचिनने खूप अभ्यास करतं आणि ठरवलेले गुण मिळवत सरपंच तालीम संघाच्या शिष्यवृत्तीसाठी स्वतःला पात्र केले होते. त्यावर्षी कोणीही कुठेही जाणार नव्हते कारण, दहावीचे उन्हाळी वर्ग सुरु झाले होते.बालपण संपून आम्ही सगळे आता किशोरवयाकडे वाटचाल करत होतो. शारीरिक आणि मानसिक बदलाबरोबरच सगळेजण आता आपलं आपलं ध्येय गाठण्यासाठी धावायला सुरुवात करणार होते. हो.. मी सुनी.आतापर्यन्त आमचं सगळंच जाडूच्या