गोपालकाला – विस्मृतीत गेलेला पारंपरिक स्वाद आमच्या लहानपणी आजी जेव्हा देवळात जायची, आणि येताना तिच्या हातातल्या द्रोणाकडे आमचं लक्ष लागलेलं असायचं. आजीनं किती द्रोण आणले – एक की दोन? हे पाहणं म्हणजे आमच्यासाठी मोठी उत्सुकता असायची.कारण येताना.. तिनं आणलेला गोपालकाला.फक्त प्रसाद नव्हता, तो एक स्वाद आणि संस्कृतीची आठवण होती. अमृताहूनही अधिक चविष्ट आणि मन तृप्त करणारा हा पदार्थ आजही जिभेवर रेंगाळतो. मात्र, आजच्या पिढीसाठी तो नवीनच आहे – कुठेही ऑनलाईन रेसिपी न मिळणारा, विस्मृतीत गेलेला एक अनमोल ठेवा!गोपालकाला – केवळ प्रसाद नव्हे, तर पौष्टिक आणि आनंददायक पदार्थगोपालकाला हा केवळ दहिकाला किंवा श्रीकृष्ण जन्माष्टमीसाठी केला जाणारा प्रसाद नाही, तर तो लो-कॅलोरी, हेल्दी आणि