“मर्यादा जपणारे हात”“बाबा हिटलर नव्हते… ते काळजीचं दुसरं नाव होतं!”आजकाल सकाळी पेपर उघडायचीही भीती वाटते…कारण पहिल्याच पानावर एखादी अशी बातमी असते, जी मनाला अक्षरशः हादरवून टाकते…कुठे एखाद्या मुलीचं शोषण…कुठे एखादी फसवणूक…कुठे एखादं आयुष्य अर्धवट संपलेलं…आणि मग नकळत मन काही वर्षं मागे धाव घेतं…त्या बालपणात…जिथे आयुष्य खूप साधं होतं, पण सुरक्षित होतं…आम्ही लहान होतो ते दिवस…बाबांचा आवाज म्हणजे घरातला कायदा होता!“संध्याकाळी सहाच्या आत घरी यायचं!”“कोणाच्या घरी गेलात तर आधी सांगायचं!”“कोणाशी जास्त गोड बोलायचं नाही!”आणि त्या सगळ्या नियमांमध्ये आम्हाला एकच गोष्ट दिसायची —बंधने!कधी कधी राग यायचा…मित्र-मैत्रिणी उशिरापर्यंत बाहेर खेळत असायचे…त्यांना कोणी काही विचारत नव्हतं…आणि आम्ही मात्र घड्याळाच्या काट्यांवर जगत होतो…तेव्हा आम्ही मनातल्या