पाहता पाहता 4-5 वर्षांचा काळ लोटला होता. माझंही एका सुस्वभावी परिसोबत जमून उरकलं. मी माझ्या खाजगी आयुष्यात विरघळून गेलो. पूर्वाच्या लग्नानंतर काही महिने ती कॉन्टॅक्ट मध्यें होती. नंतर तिचे डिपार्टमेंट शिफ्ट झाले होते. त्यामुळे आमचं एकमेकांना दिसणं जवळ जवळ बंद झालं आणि नंतर तर ती तिच्या संसारात गुंतली असावी. कॉल्स.. Mails वैगरे सगळंच बंद होत गेलं. माझी सुमितशी बोलण्याची इच्छा होत नव्हती. त्याने internal job opportunity घेऊन दुसरीकडे बदली करुन घेतली. आता फक्त अपर्णा दिसायची. तिचही वर्षभरात लग्न झालं. ती मात्र ओळख द्यायची, बोलायची.एकदा तिच्याकडून कळाले की पूर्वाने कम्पनी सोडलीये आणि ती दुसरीकडे निघाली आहे. मग मात्र मला कॉल करावाच लागला.