अर्धवट - भाग 6

  • 660
  • 249

सकाळचे सात वाजलेले. लोकं भक्तीगीतानी, भूपाळ्यांनी उठतात. मी फोनच्या रिंगने उठलो. पूर्वा होती." हा बोल पूर्वा. " मी म्हणालो. " विराज!! संपलय सगळं. माती झाली सगळी. " ती रडत रडत म्हणू लागली." काय झालं? अगं तू ठीकेस ना? आहेस कुठे तू? " मी काळजीने विचारू लागलो.तिने मला सांगितलेली हकीकत ती अशी.'रितेश आणि अपर्णाला तिने एका सुट्टी मध्यें त्यांच्या गावी नेले होते. हे मला माहित नव्हतं. तिथे त्याला अजित भेटला होता. जो पूर्वाच्या अत्याचा मुलगा होता. पूर्वा त्याची क्रश होती. त्याला वाटायचं मामाची मुलगी म्हणजे आपलीच बायको. त्याला तसं घरात पण चिडवायचे. पण त्याच करियर वैगरे काही नव्हतं. उनाडक्याचं करायचा तो पण.