दूधाचा थेंब - 1 - वादळ

(96)
  • 2.7k
  • 963

निवेदक: मीरा -बाहेर रात्रीचं काळाभोर चांदणं पडलय. माझ्या डोळ्यांसमोर मात्र लख्ख उजेड.माझ्या नशिबाचे टाके....एकामागून एक निखळून पडतायत. आणि मी? मी नुसती उघड्या डोळ्यांनी तो खेळ पाहतेय.बाजूला रत्नाकर. माझा नवरा. कसा शांत, निवांतपणे झोपलात. त्याचा श्वास कसा लयीत येतोय. त्याची पाठ वर-खाली होतेय... तो आपला त्याच्याच जगात आहे. तिकडे पाळण्यात तो छोटा आयुत. त्याचं ते इवलंसं अस्तित्व. ते सुद्धा झोपलय. आणि मी? मी त्याच्या विचारांत सगळं विसरून चाललेय. कोणाच्या? श्रीयुतच्या.नुसतं नाव घेतलं तरी काळजात कसं लख्ख होतं. मी आई आहे, कुणाची तरी बायको आहे—हे सगळं खरं. मग हे मन इतकं बेताल का व्हावं? किती नेटाने संसार केला मी इतके दिवस, पदर परकारात घट्ट खेचून,