"विराज!! खूप मोठी चूक झाली रे माझ्याकडून.. मी तिला खूप शिव्या दिल्या.. नाही तसलं बोललो. खूप त्रास होतोय रे मला.." तो नशेत बरळत होता. रात्रीचे साडेबारा झालेले.. त्याने मला कॉल केलेला." सुम्या? अरे.. काय?? कुठयस तू? पिलायस की काय? " मी विचारलं."अरे तीन beer फक्त.. पिलो नाय काय... पण.. तू म्हणालेलेला.. ना.. की क्लिअर करुन घे.. ते.. खरं होतं भावा.. तो.. तिला घेऊन... गेला... गेला आणि.." पिल्यामुळे त्याची वाचा लोळत होती "तिला धमकवून रितेशने तुला कॉल करायला लावला. म्हणजे ती तुझ्याकडे येते हे ठाऊक झालं त्याला. हे सुद्धा तिने रितेशपासून लपवून ठेवलेलं. मूर्ख आहे ही पूर्वा. उद्या बघतो तिला. " मी