"सर! हे कसं जोडतात? मला माहित नाहीये. तिथे कुणीच नाहीये सांगायला? प्लिज सांगता का?" हातामध्ये ओरिजिनल ड्रॉईंग आणि ब्लु प्रिंट पेपर घेऊन पूर्वा उभी होती.मी रेकॉर्ड रूममध्ये काही ओरिजिनल ड्रॉईंग्स घ्यायला आलो होतो. मी इकडे तिकडे पाहिले. रेकॉर्ड डिपार्टमेंट पूर्णच रिकामं होतं. सगळे चहा घ्यायला गेले असावेत. " चल दाखवतो." असं म्हणून तिला अमोनिया प्रिंटिंग मशीनकडे घेऊन आलो. तिचे दोन्ही पेपर घेतले. तिला कुठल्या बाजूने जुळवतात ते दाखवले. नीटपणे ब्लु प्रिंट घेऊन ती फोल्ड कशी करायची ते ही शिकवले. सेपिया प्रिंटिंग तिला माहित नव्हते ते ही करुन दिले. तिचा संपूर्ण सेट रेडी झाला. ती उजळली." सर!! खूप thanks! 3 दिवस झाले