अर्धवट - भाग 1

(16)
  • 6.2k
  • 3.6k

ही कथा पूर्णपणे काल्पनिक असायला हवी होती खरंतर. कारण उगाच दोन जीवांची ताटातूट. त्यातून आलेली उदासीनता... आणि शेवटी अधुरं राहिलेलं एक स्वप्नं जे दोघांनी पाहिलेलं... अनेक उतार आणि चढावांनी भरलेलं आयुष्य.. असं सगळं त्यांच्या नशीबी आलं नसतं. कथा तशी साधी आहे. तुमच्या आमच्या सारख्यांच्या आयुष्यात अगदी सहजपणे कुणाच्याही बाबतीत ऐकू येणारी. त्यात माझा सहभाग..? एक मित्र म्हणून होता. यात प्रामाणिकपणे जमेल तितकी मदत करण्याचाच माझा मानस होता..पण..****पूर्वा तिच्या आईबाबांसोबत तिचं राहण्याचं ठिकाण बघायला आली. तिला या मोठ्या शहरात तिचं गाव सोडून राहायची पहिलीच वेळ होती. त्यामुळे भाड्याची खोली मिळवण्यासाठी तिचे आईवडील तिच्यासोबत आले होते. एका मोठ्या कपंनीमध्ये तिला ट्रेनी म्हणून