पण कुणी नवशिका, येरा गबाळा असेल तर सरळ नाही म्हणायचे.काही भजनी बुवा तर मृदंग वाजवावा अशा आवेशात पेटीच्या सुरांवर खडा-खडा बोट मारायचेअसल्या वाजप्यांच्या हाती सोन्यासारखं हत्यार सोपवायला भाऊ राजी नसत. आम्हा पोराबाळांची तर पेटीला हात लावायची बिशादच नव्हती. सातवीला पी.एस्सी – केंद्राची परीक्षा व्हायची. त्यावेळी या परीक्षेला मोठी प्रतिष्ठा. चार-पाच शाळांसाठी एक केंद्र असायचं. पी.एस्सीला ६८%गुण मिळवून मी केंद्रात पहिला आलो. हेडमास्तर पडवळ रिझल्ट घेऊन आल्यावर मुद्दामआमच्या घरी माझ कौतुक करायला येऊन गेले. पेळप केंद्रात पावणे दोनशे मुलांमध्ये मीपहिला आलो. गुणांच्या टक्केवारीत तालुका स्तरावर माझ्यापेक्षा चार गुण अधिक मिळविणारी देवगडची कुणीतरी मुलगी पहिली आणि माझा नंबर दुसरा आला. पडवळ गुरुजी चहा