आपले तारण हे आपल्या चांगल्या कार्यामुळे ( कर्म) नव्हे किंवा आपण किती धार्मिक आणि चांगले आहोत ह्यामुळे झालेले नाही तर , ते प्रभू ख्रिस्ताच्या पवित्र रक्तामुळे झालेय.तुमच्यातील बहुतेकांना हे सर्व आठवण करून देण्याची गरजच नाही . पापाची क्षमा ही फक्त एकाच गोष्टीने होते , आपल्याला बर्फासारखे शुभ्र म्हणजेच शुद्ध आणि पवित्र करणारी एकच गोष्ट आहे .ते म्हणजे प्रभू ख्रिस्ताचे रक्त.....देवाच्या दयेमुळे आणि त्याच्या अनुग्रहामुळे आपले तारण झालेय, नाही की आपली धार्मिकता, आपले चांगले कृत्य किंवा दान पुण्य....जर आपल्या धार्मिकतेमुळे किंवा चांगल्या कृत्यामुळे, दाण धर्मामुळे आपले तारण झाले असते तर,...प्रभू येशूला क्रुशावरती आपले प्राण अर्पण करण्याची काहीच गरज नसती...लोक आपल्या कृत्यांनी