"जन्माला येताना श्वास होता पण नाव नव्हतं मरताना भलेही श्वास नसेल पण नाव मात्र प्रत्येकाच्या हृदयाच्या कोरलेलं असलं जगणं म्हणजे खरं जगणं "त्यांच्या बोलण्याचा तो शेवट होता आणि जणू माझ्या जीवनातील सुरुवात ....पहिल्याच नजरेत त्यांनी मला आपलसं करून घेतलं होत, त्यांचा तो गौर वर्ण , सिंहासम स्वाभिमानाने भरलेला तेजस्वी चेहरा ,त्यांच्या बोलण्यातील करारी बाणा , हिमालयासारखी उंची,चमकत्या डोळ्यातील कर्तृत्वाची धजग, बलशाली शरीर, वक्तृत्व तर असे जणू शब्दांचे निर्माते तेच असावेत.... त्यांच्या पहिल्याच lecture मध्ये मी मनोमन माझं सर्वस्व देऊन बसले होते माझा कुणी जीवन साथी असतील तर फक्त हेच त्यांना बघताच मला माझ्या “त्या स्वप्नाची” आठवण झाली.... जे मला रोज