स्वर आले जुळूनी - भाग 1

  • 750
  • 1
  • 180

                           स्वर आले जुळूनी         अहमदाबाद हायवेवरुन बिऱ्हाडाकडे परतताना बुवांचे शब्द ईश्वराच्या देवळातील धडाम् ss धुडूम् ss वाजणाऱ्या नगाऱ्यासारखे माझ्या कानात घुमत राहिलेले....! “कलेची साधनाम्हणजे मोठं दिव्य असतं.... खर्डेघाशी करण्याइतकी सवंग-सोपी गोष्ट नाही ती. एकवेळ गायकी जमेल. ईश्वराने गोड नरडं दिलेल असेल तर थोड्याफार प्रयत्नाने गायक बनणं फारसंअवघड नाही.... पण संवादिनीवर कब्जा मिळवणं भलतं जटिल... सगळ्या संवेदना कर्णपटलात केंद्रित करुन गायकाचा नेमका सूर अचूक पकडायचा आणि तो मनात साठवित बोटांच्या माध्यमातून संवादिनीच्या स्वरमंडलातून उमटवायचा म्हणजे बजवैया अष्टावधानी, सावधचित्त असावा लागतो. स्वराची दीर्घ-त्रोटक लांबी, तीव्रता बोटांच्या कसबाने नियंत्रित करायची असते. एककल्ली सराव करुन रागदारीची मांडणी अवगत होते. तालाची समज ही प्रयत्नाने साध्य होते