आमचं लव्ह कम अरेंज मॅरिज.. म्हणजे आम्ही दोघांनी घरी आमचं आहे हे सांगितल्यावर एक बारीकसा विरोध करण्याचा उभयपक्षांकडून हलकासा प्रयत्न झाला तसा मी माझ्या घरच्यासमोर डोक्याला लाल बावटा बांधून बंडखोर झालो. त्यांच्या प्रत्येक प्रश्नाला झुरळाला मारतात तसं कधी बेगॉन तर कधी पॅरागॉन अशा अस्त्रांनी नामोहरम करत हरवले. माझ्या विभावरीने पापा की परीवाली व्याकुळताभरी भूमिका तिच्या पप्पांसमोर घेत त्यांना पहिल्यांदा राजी केले. तिच्या आईचा पण सुरुवातीला विरोध होता पण, "तुम्ही आणि तुमची लेक काय ते बघून घ्या, उगाच माझ्यावर नंतर कसलं बालंट नको." असे म्हणून तिच्या इच्छेला नकळत पाठिंबा दिला. आमच्याकडून फार काही नातेवाईकांचे लुडबुड करणारे लटांम्बर नव्हतेच. त्यामुळे ती अडचण माझ्या वाट्याला