तोतया वारसदार पात्र परिचय – महादेवराव. – गोखले घराण्याचा मूळ पुरुष. वेळणेश्वर. कोकण. विनायकराव - महादेव गोखल्यांची सहावी पिढी - महादेवराव – सखाराम- भास्कर – वसंत – विनायक. - विनायक नागपूरला स्थायिक. धनशेखर – पोलिस इंस्पेक्टर भाग १ त्या दिवशी सकाळी १० वाजण्याच्या सुमारास सुशीलाने विनायकरावांच्या घराची बेल दाबली. चार वेळा बेल दाबल्यावर सुद्धा आतून काहीच उत्तर आलं नाही, हे बघून तिने घरं भोवती चक्कर मारली. कदाचित विनायकराव मागच्या अंगणात असतील या विचाराने ती घराच्या मागच्या अंगणात गेली. कधी कधी ते मागच्या बगीच्यात सकाळी सकाळी फिरायचे, पण आज ते तिथेही नव्हते. सगळं कसं शांत होतं. सशीलाला