थंड झाल्यार खावचा - भाग 6

(47)
  • 1.1k
  • 1
  • 345

       थंड झाल्यार खावचा   भाग ६         तिने दोन दिवसानी ही गोष्ट ग्यानुच्या कानावर घातली नी   दुसाऱ्याच  दिवशी  हिंदमाता सिनेमा जवळ च्या  गल्लीतला  भट गाठून  ग्यानूने त्यांच  लग्न लावून दिलं. मात्र ठुमरी बाळंत होईतो ही गोष्ट  गुपित ठेवायची असं त्यानी ठरवलं.  त्याच  दरम्याने पारशी सोराबजीला   अर्धांगाचा  झटका आला नी  त्याचा डावा भाग लुळा पडला. त्याला जे जे मध्ये अ‍ॅडमिट केलं.त्याची बहिण मेहरू त्याच्याही  पेक्षा म्हातारी होती. ती वाळकेश्वरला रहायची.भगवानने  तिला  वर्दी दिली.           अलिकडे सोराबजीने धंद्याचा व्याप कमीच करीत आणलेला होता. पेढीवर फक्त दोन कारागीर कॉण्ट्रॅक्ट बेसवर काम करायचे. त्याना विचारून मेहरूने त्यांचा आर्थिक व्यवहार