अभूनव नाय नाय अनुभव

  • 948
  • 300

अभूनव नाय नाय.. अनुभव.. म्हंजी आपण जे काय बगितलं आन ते बघितलेलं लक्षात ठेवलं तर तेला म्हन्तेत अभूनव.. नाय नाय अनुभव.... आजी म्हणती का तिनी लय काय काय बगितलं.. तीला लय अभूनव.. नाय नाय अनुभव हाय.. आमच्या घरात तिचं सगळ्यात मोठी हाय..मी पिकू.. म्हंजी आधी व्हतो.."आताचा..?! असू द्या नावात काही नाहीये.. .. लहान असताना सगळे पिकू म्हणायचे. तेव्हाचा एक अनुभव सांगावा वाटला म्हणून पिकूला ती जबाबदारी दिलीये.""तं माझा काका.. संतू काका..मला लय आवडाचा..कारण त्यो सायकलवर कुठून बी आणि कितीबी लांबून एका तासाच्या आत यायचा. पण त्योच संतू काका मला सोबत सायकल वर घेतलं कि बऱ्याचदा कुठबी पडायचा. पडल्यावर स्वतःला अन मला