ज्याचं कोणी स्वप्नही पाहू शकणार नाही असं आहे माझं घरकुल. माझ्या प्रेमाने आणि वात्सल्याने मी माझ्या घरात शांतता आणि सुखाचा झरा निरंतर वाहत राहिल याची काळजी घेते. माझं माझ्या घरावर अगदी बारीक लक्ष असतं. इथली सजावट, स्वच्छता आणि दुरुस्ती अगदी वेळच्या वेळी व्हायला हवी याकडे माझं सजगपणे लक्ष असतं. आपला निवास नेहमी आपल्या मनाला तजेला देणारा असावा असं मला वाटतं. मला घरात घाण केलेली बिलकुल नाही खपत. सगळ्या वस्तू कशा जागेवर आणि नीट ठेवलेल्या असल्या पाहिजेत असं माझं म्हणणं आहे. मी तशी वागते आणि घरातल्याना पण तसंच वागायला सांगते. ऐकतात ते माझं. ऐकावंच लागतं. नाहीतर या बाबतीतला माझा रुसवा त्यांना