थंड झाल्यार खावचा - भाग 5

  • 3.3k
  • 1
  • 1.8k

                                  थंड झाल्यारखावचा   भाग ५          दिसायला उंचापुरा नी मजबूत पिळदारअंगकाठी च्या  भगवानाला बघूनच  त्याच्या ताकतीचा अंदाज  बांधून एक तगडा शीख  पैलवान पुढे आला. पाच रुपये टाकून तो समोर बसला.पंच ग्यानी सेठनी दोघांचे हात एकामेकांच्या हातात दिले नी लढत सुरु झाली. दोन तीनमिनिटं  कोणीच  रेसभरही  चळला नाही. बघ्यानी  टाळ्या  नीशिट्ट्या वाजवीत , चलो भाई .... जोर लगा.. वाहे गुरु  .... डगमग़ाने  लगे क्या   ओरडत  गिल्लाकेला.... भग्याने समोरच्या भिडूला  पुरता  अजमावला नी ‘ हरा  रा रा म्हादेव’ असा गजर करीत  समोरच्या शिखाचा हात दबवीत विरुद्ध दिशेला टेकवला.  हरलेला शीख घामाने  डबडबला नी  डाव्या हाताने उजव्या हाताचे ननगट  मनगट चोळीत मान खाली