सह्याद्रीचे रक्तकुंड - 7

  • 1.4k
  • 598

अध्याय ७अंतिम नरसंहारगुहेच्या त्या अंधाऱ्या कोपऱ्यातून जो सावलीसारखा माणूस बाहेर आला, तो दुसरा तिसरा कोणी नसून त्या गावातील तोच म्हातारा होता ज्याने सुरुवातीला आर्यन आणि त्याच्या मित्रांना इशारा दिला होता. पण त्याच्या हातात मदत नव्हती, तर एक लांब आणि वक्र 'नरबळीचा' सुरा होता. त्याच्या डोळ्यात आता दया नव्हती, तर एक अघोरी चमक होती."मी तुला सांगितलं होतं बाळा... काळदरी कुणालाच सोडत नाही, आता तुझ्या रक्ताचा अभिषेक आज काळदरीला शांत करेल" म्हातारा एका खोल, भयावह आवाजात पुटपुटला.आर्यनने पाहिलं की त्या म्हाताऱ्याच्या अंगावरही त्याच नरभक्षक जमातीच्या खुणा होत्या. तो गावाचा प्रतिनिधी नव्हता, तर या नरभक्षक साम्राज्याचा 'बाहेरचा दूत' होता, जो प्रवाशांना फुसलावून इथे