सह्याद्रीचे रक्तकुंड - 5

  • 6k
  • 1.6k

अध्याय ५नरकाचा तळदरीच्या त्या अनंत काळोखात पडताना वारं वेगाने अंगाला कापत होतं. आर्यन आणि सानिया एकमेकांचा हात धरून खाली कोसळत होते, पण नियतीला त्यांचा जीव इतक्या लवकर घ्यायचा नव्हता. खाली कोसळताना दाट झाडीच्या वेलींनी त्यांचा वेग थोडा मंद केला, पण फांद्या अंगात घुसत गेल्या. झाडांच्या फांद्यांना धडकत धडकत ते दोघेही खाली पडत होते. आर्यनचं शरीर आधीच भाल्याने विदीर्ण झालं होतं, प्रत्येक फांदी त्याच्या जखमेतून आरपार जात होती. एका फांदीचा झटका लागल्यामुळे त्या भाल्याचा जो लाकडी भाग होता तो तुटला, पण त्या भाल्याचे टोक तसेच त्याच्या पाठीत अडकले होते. अखेर ते एका चिखलाने भरलेल्या दलदलीत कोसळले.हा चिखल साधा नव्हता. हा **'काळदरीचा